Sunday, September 8, 2024
Homeबॅक पेजसोमवारी राष्ट्रपती देणार...

सोमवारी राष्ट्रपती देणार 19 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, 22 जानेवारी 2024 रोजी विज्ञान भवन येथे होणाऱ्या पुरस्कार समारंभात असामान्य कामगिरीसाठी 19 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2024 प्रदान करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी 2024 रोजी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्यासमवेत त्यांच्या संबंधित श्रेणींमधील असामान्य कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करतील आणि या बालकांशी संवाद साधतील.

कला आणि संस्कृती (7), शौर्य (1), नवोन्मेष (1), विज्ञान आणि तंत्रज्ञान (1), समाजसेवा (4) आणि क्रीडा (5) या क्षेत्रातील असामान्य कामगिरीसाठी देशातील सर्व प्रदेशांमधून निवडलेल्या 19 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2024 प्रदान केले जातील. 2 आकांक्षी जिल्ह्यांसह 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पुरस्कार विजेत्यांमध्ये 9 मुले आणि 10 मुली यांचा समावेश आहे.

बालकांच्या असामान्य कामगिरीसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार केन्द्र सरकार प्रदान करते. 5 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना त्यांच्या उत्कृष्टतेसाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. पी. एम. आर. बी. पी. च्या प्रत्येक पुरस्कार विजेत्याला पदक आणि प्रमाणपत्र दिले जाते. या वर्षी महिला आणि बालविकास मंत्रालयाने प्रादेशिक वृत्तपत्रे आणि सर्व प्रमुख राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन नामांकने वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल नामांकनांसाठी 9 मे 2023 ते 15 सप्टेंबर 2023 या दीर्घ कालावधीसाठी खुले ठेवण्यात आले होते. माध्यमातील यासंदर्भातील  माहितीची चाचपणी आणि पडताळणी करण्यासाठी  गेल्या 2 वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात होता. पात्र उमेदवारांची शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची (एन. सी. पी. सी. आर.)देखील निवड करण्यात आली.

जिल्हा दंडाधिकारी आणि क्षेत्र तज्ञांसह अनेक स्तरांद्वारे दाव्यांचा खरेपणा तपासण्यात आला आणि पडताळणी करण्यात आली, त्यानंतर विविध शाखांमधील तज्ञांचा समावेश असलेली छाननी समिती स्थापन करण्यात आली.

संगीत नाटक अकादमी, केंद्रीय राखीव पोलीस दल, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग, भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्था आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यासारख्या विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय स्तरावरील स्वतंत्र तज्ञांनी, पडताळणी समितीच्या बैठकीनंतर निवडलेल्या माहितीची पुन्हा तपासणी केली. राष्ट्रीय निवड समितीने अंतिम निवडीसाठी निवडलेल्या बालकांच्या कामगिरीची तपासणी केली.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content