Homeमुंबई स्पेशलशिवसेनेच्या ठाकरे गटाचे...

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून आज सकाळी लोकसभेसाठी १७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार चंद्रकांत खेरे यांना पुन्हा एकदा पसंती देण्यात आली आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याचे कळते. मात्र ही नाराजी प्रत्यक्षात काय रूप घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

त्याचप्रमाणे या यादीत सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस काय भूमिका घेते याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ही जागा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्यासाठी ससोडावी, असा आग्रह काँग्रेसने धरला होता. आजही त्यांचा हा आग्रह कायम आहे. मात्र, ठाकरे गटाकडून परस्पर ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आज जाहीर झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे-

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content