Homeमुंबई स्पेशलकागदपत्रे, पुरावे देऊनही...

कागदपत्रे, पुरावे देऊनही १४२ झोपडीधारक अपात्र!

मुंबईतल्या कांदिवली पूर्व श्री समर्थनगर गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए प्रकल्पातील झोपडीधारकांना विकासक व प्रशासनाने गेल्या पंधरा वर्षांपासून बेघर करून अपात्र केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. झोपडीधारकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ५९८ घरापैकी १४२ घरे अजूनही अपात्र आहेत. याविरोधात संस्थेचे  शिष्टमंडळ म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांना नुकतेच भेटले. त्यांनी  अधिकाऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत पुरावे पाहून सर्व झोपडीधारकांना पात्र करण्याचे निर्देश  दिले. त्यामुळे अपात्र झोपडीधारकांना दिलासा मिळाला आहे.

विकासक दिनेश बन्सल यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे झोपडीधारकांना घरापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप रहिवाशांचा आहे. संस्थेने या झोपडीधारकांना न्याय देण्यासाठी अनेक वेळा निवेदने देऊन पाठपुरावा केला. पुरावे सादर केले. परंतु त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. ते घरापासून वंचित तर आहेतच, परंतु त्यांना एसआरए योजनेअंतर्गत विकासकाकडून भाडेसुद्धा मिळालेले नाही. यामधील काही लोक श्रमजीवी आहेत तर काही महिला धुणीभांडी करून उपजीविका करणाऱ्या आहेत. त्या सर्व सभासदांना त्रास होत आहे. त्यामुळे ते  हतबल झालेले आहेत.

या संदर्भात त्यांनी संस्थेशी आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क करून न्यायाची मागणी केलेली आहे. त्यामुळे संस्थेने म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र तत्पूर्वीच मनसेचे बाळकृष्ण पालकर, आरपीआयचे हरीश मुत्तराज , राष्ट्रवादीचे विष्णू पवार, दिव्या विचारे, प्रकाश चव्हाण, व्यापारी असो.चे अध्यक्ष ओमप्रकाश जोशी, प्यारेलाल यादव, उमेश सिंग ठाकूर, मनोज आवटे, विजया रेड्डी नाथन, पुष्पा रेड्डी, अर्चना पोसवाल, सावित्री दुबे, या शिष्टमंडळाने मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

बोरीकर यांनी तातडीने म्हाडा अधिकाऱ्यांना पाचारण करून अपात्र झोपडीधारकांचे कागदपत्रे तपासून योग्य असल्यास पंधरा दिवसाच्या आत पात्र करा असे निर्देश दिले. यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय मी खपवून घेणार नाही आणि माझ्याकडे पुन्हा अशा तक्रारी नकोत असे म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. झोपडीधारकांनी आपले पुरावे सादर करताना फोटो काढून ते आपल्याकडे ठेवावेत. जर त्यावर कार्यवाही झाली नाही तर पुन्हा आपण माझ्याकडे या असे सांगून त्यांनी शिष्टमंडळाचे समाधान केले. आता अधिकारी कशाप्रकारे कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content