HomeArchiveसागर सरहदी यांचा...

सागर सरहदी यांचा `बाजार’ २४ सप्टेंबरला!

Details
सागर सरहदी यांचा `बाजार’ २४ सप्टेंबरला!

    20-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
प्रसिद्ध दिग्दर्शक सागर सरहदी यांच्या गाजलेल्या `बाजार’ या चित्रपटाचे सादरीकरण मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट येथे होईल. रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या सदस्यांना यावेळी प्राधान्याने प्रवेश दिला जाईल.
 
 
एक अबोल, घुसमटलेली व्यथा. एका घराची, एका कुटुंबाची नव्हे, तर एका समाजाची, एका शहराचीच! ‘बाजार’ या व्यथेला वाचा देण्याचा प्रयत्न करतो. हैदराबाद संस्थान भारतीय प्रजासत्ताकात विलीन झालं. निजामी गेली, नवाबी गेली. निजामाने कुचकामी करून अजगरासारखं सुस्त बनवून ठेवलेल्या कामचुकार लोकांनी आपल्याकडे असलेली संपत्ती आळसात राहून, ऐशारामात बेजबाबदार खर्च करून संपवली आणि मग उरलेल्या पुंजीत दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत यांना पडली. हातापायाला अन् स्वभावाला कामाची सवय नाही आणि त्याचवेळी पोटालाही भुकेची सवय नाही, अशी कधी विचार न केलेली समस्या या लोकांसमोर ‘आ’ वासून उभी राहिली.
 
 
या दुर्दशेच्या गाड्याखाली भरडली गेली ती ‘स्त्री’. हे कोणे एकेकाळचे सुखवस्तू लोक नोकरी वगैरेची लाचारी करण्यापेक्षा घरच्या स्त्रीची विक्री करणे, योग्य समजू लागले. काहीवेळी तर स्वत: स्त्रियासुद्धा ‘हाच एक तरणोपाय आहे’, असं समजू लागल्या आणि स्त्री-शरीराचा एक मोठा बाजार ‘निकाह, शादी’ या प्रतिष्ठित, गोंडस नावांच्या आड सुरू झाला. कथानकाच्या केंद्रस्थानी स्मिता पाटीलची ‘नजमा’ आहे. नसीरूद्दीन शाह, सुलभा देशपांडे, सुप्रिया पाठक, फारूख शेख आदींचा अभिनय यातून पाहयला मिळतो. ‘बाजार’ची सगळ्यात मोठी ताकद आहे खय्याम यांचं संगीत.”

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“प्रसिद्ध दिग्दर्शक सागर सरहदी यांच्या गाजलेल्या `बाजार’ या चित्रपटाचे सादरीकरण मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट येथे होईल. रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या सदस्यांना यावेळी प्राधान्याने प्रवेश दिला जाईल.”
 
 
“एक अबोल, घुसमटलेली व्यथा. एका घराची, एका कुटुंबाची नव्हे, तर एका समाजाची, एका शहराचीच! ‘बाजार’ या व्यथेला वाचा देण्याचा प्रयत्न करतो. हैदराबाद संस्थान भारतीय प्रजासत्ताकात विलीन झालं. निजामी गेली, नवाबी गेली. निजामाने कुचकामी करून अजगरासारखं सुस्त बनवून ठेवलेल्या कामचुकार लोकांनी आपल्याकडे असलेली संपत्ती आळसात राहून, ऐशारामात बेजबाबदार खर्च करून संपवली आणि मग उरलेल्या पुंजीत दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत यांना पडली. हातापायाला अन् स्वभावाला कामाची सवय नाही आणि त्याचवेळी पोटालाही भुकेची सवय नाही, अशी कधी विचार न केलेली समस्या या लोकांसमोर ‘आ’ वासून उभी राहिली.”
 
 
“या दुर्दशेच्या गाड्याखाली भरडली गेली ती ‘स्त्री’. हे कोणे एकेकाळचे सुखवस्तू लोक नोकरी वगैरेची लाचारी करण्यापेक्षा घरच्या स्त्रीची विक्री करणे, योग्य समजू लागले. काहीवेळी तर स्वत: स्त्रियासुद्धा ‘हाच एक तरणोपाय आहे’, असं समजू लागल्या आणि स्त्री-शरीराचा एक मोठा बाजार ‘निकाह, शादी’ या प्रतिष्ठित, गोंडस नावांच्या आड सुरू झाला. कथानकाच्या केंद्रस्थानी स्मिता पाटीलची ‘नजमा’ आहे. नसीरूद्दीन शाह, सुलभा देशपांडे, सुप्रिया पाठक, फारूख शेख आदींचा अभिनय यातून पाहयला मिळतो. ‘बाजार’ची सगळ्यात मोठी ताकद आहे खय्याम यांचं संगीत.”

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content