HomeArchiveसरकार तर आलं,...

सरकार तर आलं, ‘खंदेरी’ कधी येणार?

Details
“सरकार तर आलं, ‘खंदेरी’ कधी येणार?”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशात पूर्ण बहुमताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचे सरकार आलं असल्यानं मागील प्रश्नच सोडवायचे आहेत या विचाराने गतिमानता यावी अशी लोकभावना आहे. सर्वच क्षेत्रातील समस्या माहीत आहेत, उपाय त्वरेने होणं गरजेचं वाटतं. बराचसा अभ्यास झालेला आहे. संरक्षण क्षेत्रातही तेच लागू होते. आय एन एस खंदेरी नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यास सज्ज असून केवळ निवडणूक आचारसंहितेच्या कारणाने तिचा समावेश थांबला होता असं सूत्रांनी सांगितले. बहुधा ऐन संसदेच्या अधिवेशनाच्या काळात अर्थसंकल्प सादर झाल्यावर हा कार्यक्रम होण्याची शक्यता सांगितली जातेय.
गेल्या तीन-चार महिन्यांत असलेली युद्धज्वर स्थिती ओसरली असली तरी काहीसा तणाव कायम आहे. ईदच्या आधी देशाच्या पश्चिमेची हिंदुस्थानी हवाई सीमा खुली करण्याचं पाऊल आपण टाकल्यावर पाकिस्तानने गुजरातकडील सीमा उघडली. दोन जून रोजी त्यामार्गे दिल्लीत ऐतिहाद एअरलाईन्सचे विमान दाखल झाले. बालकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने तत्काळ सीमा बंद केल्याने सर्वच विमान कंपन्यांचे, वळसा घालून ये-जा करावी लागल्याने कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर ‘खंदेरी’चे ताफ्यात सामील होणे बहुधा पंतप्रधानांच्या हस्ते नि नवे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होईल.

फ्रान्सच्या पूर्वीच्या डी सी एन एस कंपनीशी झालेल्या करारानुसार सहा स्कॉर्पिअन बनावटीच्या पाणबुड्या भारतीय नौदलासाठी बांधल्या जात आहेत. त्यातील ‘कलवरी’ सेवेत दाखल झाली तर खंदेरी चाचण्या पूर्ण करून सज्ज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसर जूनअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होईल. वास्तविक पाहता भारतीय नौदल इतर जगातील नौदलाच्या तुलनेत कार्यक्षमतेबाबत कुठेही कमी नाही त्यामुळेच निरनिराळ्या कसोटीवर ते पुरेपूर उतरते. माझगाव गोदीने आरमाराच्या गरजा पूर्ण करण्याचा विडाच उचलला आहे. अनेक बोटी, पाणबुडी बांधणी करताना वेळ पाळणे हे जिकिरीचे काम असते. साहित्य उपलब्धता हे परदेशी संस्था मध्यस्थ असल्यानं सहज होतं. पुढे मात्र नौदलाच्या ताब्यात सोपविल्यावर लाल फितीचा कारभार आडवा येतो.
या पाणबुडीची वारसदार आधी नौदलात होती. अर्थातच तिची तांत्रिक क्षमता वेगळी होती. पहिली खंदेरी भारतीय नौदलात ६ डिसेंबर १९६८ रोजी दाखल होऊन १८ ऑक्टोबर १९८९ रोजी निवृत्त झाली. सुमारे वीस वर्षांहून अधिक सेवा तिने दिली. या खंदेरीचं जलावतरण जानेवारी २०१७ मध्ये झालं. पी 75 नावाने हा प्रकल्प सुरू असून या पाणबुडी लांबीला ६१.७ मीटर असून रूंदी ६.२० मीटर आहे. वीस समुद्री मैल या गतीने जाणारी ही डिझेल इलेक्ट्रिक या पारंपरिक गटातील आहे. मे २०१० मध्ये बांधणीस घेतलेल्या खंदेरीचं पूर्णत्व २०१७ ला झालं. हे पाहता एका पाणबुडी बांधणीस चाचणीसह दहा वर्षांचा कालावधी खूप असल्याचं संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

एम डी एल चे अध्यक्ष कमांडर राकेश आनंद यांच्यानुसार आठ युद्धनौका नि पाच पाणबुड्या सध्या बांधणी अवस्थेत असून विविध टप्प्यात आहेत. एप्रिलमध्ये २० तारखेला विनाशिका ‘इंफाळ’चं जलावतरण करण्यात आलं तर ६ मे रोजी पाणबुडी ‘वेला’ पाण्यात सोडली गेली. माझगाव गोदी एक अग्रणी बांधणी केंद्र असून नौदलाच्या गरजा भागविण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे. स्कॉर्पिअन बनावटीच्या पाणबुडी आरेखन बरहुकूम देताना फारच समाधान मिळते. पाणबुडी ‘वेला’च्या सर्व चाचण्या त्वरेने करून सोपववणे ही कामगिरी करायची आहे. ‘खंदेरी’ निवडणुकीमुळे दाखल होण्यात अडचणी आल्या असं सूत्रांनी सांगितले. भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन प्रकारातील पहिली पाणबुडी असणाऱ्या कलावरीची मे २०१६ मध्ये समुद्रात चाचणी होऊन ही पाणबुडी नौदलात दाखल झाली आहे.

युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे, पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे, पाणसुरूंग पेरण्याची ताकद, गुप्त माहिती गोळा करण्याच्या अत्याधुनिक सुविधांनी आयएनएस कलावरी ही पाणबुडी सुसज्ज आहे. पुढील सर्व पाणबुड्यांमध्ये हीच वैशिष्ट्ये आहेत. आधुनिक युद्धयंत्रणा असणाऱ्या स्कॉर्पिअन पाणबुड्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून अचूक लक्ष्यभेदामुळे या पाणबुड्या काही वेळातच शत्रूंना उद्ध्वस्त करू शकतात. या पाणबुड्यांमध्ये समुद्राच्या पृष्ठभागावरून किंवा पाण्याखालून टॉर्पिडो मिसाईल (पाणतीर) आणि पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे.

उष्ण कटिबंधासह सर्व प्रकारच्या वातावरणात स्कॉर्पिअन पाणबुड्या काम करू शकतात. नौदलांच्या अन्य पथकांशी संवाद साधण्यासाठी ही पाणबुडी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. या पाणबुड्या अत्याधुनिक पाणबुड्यांप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागावरून किंवा पाण्याखालून शत्रूवर हल्ला करू शकतात. स्कॉर्पिअन पाणबुडीत वेपन्स लाँचिंग ट्युबची (डब्ल्यूएलटी) सुविधा असून त्यामुळे या पाणबुडीतून शस्त्रे नेता येऊ शकतात. तसेच पाणबुडीत शस्त्र हाताळणीसाठी असलेल्या विशेष सुविधांमुळे ही शस्त्रे सुमद्रात सहजपणे रिलोड करता येतात. या पाणबुडीवर बसवलेल्या शस्त्रे आणि जटील सेन्सर्स अत्युच्च दर्जाच्या युद्ध व्यवस्थापन यंत्रणेद्वारा नियंत्रित केली जातात त्या नव्या यंत्रणांच्या क्षमता चाचण्या पार पडल्यात.

बाह्य खरेदीतील रेंगाळलेपणा दूर सारून नि देशी बनावटीला गतिमान करण्याचं आव्हान या सरकारपुढे आहे. लाल फितीचा कारभार दूर करून देशांतर्गत उत्पादनक्षमता वाढेल यावर भर द्यावा लागेल. त्यापद्धतीने बाबूंना कामाला लावणे गरजेचे आहे. पूर्वसूरींचे काही गुणगौरव घेऊन स्वतःचा असा ठसा खात्यावर उमटवत जगात देशाला प्रगतीवर नेणे आव्हानात्मक काम आहे. संपूर्ण दलांना नि त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...

८४ सामने-वेळापत्रक जाहीर! ‘आयपीएल’चा महासंग्राम उद्यापासून!

क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२६च्या संपूर्ण वेळापत्रकाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत देशभरात १० संघांमध्ये तब्बल ८४ सामन्यांचा महासंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर...

महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन’?

पश्चिम आशियातील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशभरात एकच खळबळ उडाली. "ऊर्जा संकट गहिरे होतेय, सरकार कठोर उपाययोजना करणार" या आशयाचे संदेश सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि त्यातूनच पुन्हा लॉकडाऊन येणार, अशी बेछूट अफवा काही...
Skip to content