HomeArchiveशेअर बाजारात आयटी...

शेअर बाजारात आयटी क्षेत्र जोमात

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“भारतीय शेअर बाजारात या आठवड्याची सुरूवात एका रोमांचक ट्रेंडिंग डे ने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये अस्थैर्य दिसून आले. संपूर्ण सत्रात चढ-उतार पाहायला मिळाला. सोमवारी ट्रेंडिंगचा परिणाम असा झाला की, दोन्ही बाजार पुन्हा आपापल्या स्थानी पोहोचले. अखेर सेन्सेक्स ३१,६४८ अंकांवर थांबला तर निफ्टी फ्लॅट होऊन ९,२६१ अंकांवर बंद झाला.”
 
“एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की, कमकुवत रूपया, सकारात्मक तिमाहीचे परिणाम आणि आयटी सोल्युशन्सची वाढती मागणी, यामुळे आयटी उद्योगांनी गुंतवणुकीच्या भावनांना प्रोत्साहन दिले. एचसीएल टेक्नोलॉजी, इन्फोसिस आणि माइंडट्रीसारख्या स्टॉक्सला ३ ते ४ टक्क्यांदरम्यान फायदा झाला. इतर कंपन्या उदा. ३ आय इन्फोटेक, हिंदुजा ग्लोबल, सोनाटा सॉफ्टवेअर आणि अॅप्टेक अनुक्रमे १९.०५%, ९.९९%, ८.६१% आणि ५.७७% पर्यंत वाढले. विप्रो आणि टीव्हीएस इलेक्ट्रॉनिक्स आज सुमारे ३ टक्क्यांनी घसरले.”
 
“शुक्रवारच्या नफ्यात आणखी वाढ करत पीएसयू बँकांनी सोमवारी एका परफेक्ट बुलरनचा आनंद घेतला. यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि जे अँड केसारख्या पीएसबीने एनएसईवर सुमारे २० टक्क्यांची वाढ घेतली. इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रने अनुक्रमे १६.१८ टक्के आणि १०.०५ टक्क्यांची वाढ घेतली. आज निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये फक्त एसबीआय ०.३९ अंकांची घसरण घेत बंद झाली. निफ्टी बँक इंडेक्समध्ये एक विरोधाभासी चित्र समोर आले. कारण यात ०.७७ टक्क्यांची घसरण झाली. पीएनबी, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँकसारख्या पीएसबीसह फक्त एचडीएफसीच आज ग्रीन झोनमध्ये क्लोज झाली. आरबीएल बँकेने सर्वाधिक ६.५६ टक्क्यांची घसरण केली.”
 

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content