HomeArchiveशरद आणि शरद!

शरद आणि शरद!

Details
शरद आणि शरद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
राज: कोण बोलतोय?
शरद: जय महाराष्ट्र, मी शरद बोलतोय!
राज: आवाज जरा वेगळा वाटतो, काय झालं तुम्हाला? हे पाहा, मी लोकसभेच्या निवडणुकीत इंटेरेस्टड नाही.. “मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा”, हे माझं ध्येय आहे.. नो लोकसभा.. समजलं?
शरद: तुम्ही माझं थोडं ऐकून तर घ्या..

राज: मी आताच १३ वा दणक्यात करून आलोय.. मला बोलायलाही ताकद नाही..
शरद: हे पाहा, मी काय म्हणतोय?
राज: तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला ठाऊक आहे.. मागे तुमची पुण्यात मुलाखत घेतली तशी तुम्हाला घ्यावी असेच वाटत असेल.. हो ना?
शरद: मला मुलाखत नको, फक्त..
राज: मग तुमच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेऊ, असंच सुचवायचं का तुम्हाला?
शरद: प्रचारसभेचा येथे प्रश्न नाही..
राज: आता तुमच्याकडे कोल्हे आलेत.. माझी गरज काय? बरोबर ना?
शरद: मला मुलाखत नको, प्रचारसभा नको..
राज: बरोबर बोललात.. माझी मनसे लोकसभा लढविणार नाही म्हणून तुम्हाला तुमच्या राष्ट्रवादीच्या सभेत गर्दी करण्यासाठी मनसे कार्यकर्ते पाहिजे असतील.. भाड्याने माणसं आणण्याचे ते दिवस संपले. तुमच्या कार्यकर्त्यांच्या सभेत तुमच्या शेखर गोऱ्यांनी सगळ्यांना काळेगोरे केले.. आणखी काय बोलायचं यावर?
शरद: मी मनापासून बोलतोय मला तुमचे कार्यकर्तेही नकोत..
राज: का? त्यांचा येण्या-जाण्याचा खर्च आता राष्ट्रवादीला झेपणार नाही वाटतं.. तुम्हाला सगळं फुकटात पाहिजे.. हो ना?

शरद: राज साहेब..
राज: व्वाss.. आता गरज आहे म्हणून राज साहेब, किती मस्का मारणार हो पवारसाहेब..
आता हे राजकारण सोडा हो.. प्रथम मी बाळासाहेबांशी पंगा घेतला, त्यानंतर नरेंद्र मोदींशी.. आता तुमच्याशी दोस्ती केल्यानंतर माझे मनसैनिक नाराज झालेत.. उद्धवचीही नाराजी ओढावून घेतली, कारण तुमची ती पुण्यात लाखमोलाची मुलाखत घेतली नी तिथेच मी फसलो.. माझे सैनिक दुरावले, पदाधिकारी बोलनासे झाले.. बाळा नांदगावकरला तर कृष्णकुंजकडे यावेसेच वाटत नाही.. बरे किती दिवस झाले त्याचे तोंड बघितले नाही. पूर्वी म्हणायचे की यशवंतराव चव्हाण हे ज्याच्या खांद्यावर हात ठेवायचे, तो नेता संपला म्हणून ख्याती होती. तसंच काही तुमच्याबाबत घडतंय..
शरद: साहेब, मी आमदार शरद सोनावणे बोलतोय..
राज: अरे माझ्या मनसैनिका.. हे अगोदर का नाही सांगितलंस?
शरद: तेच सांगण्याचा मघापासून प्रयत्न करतोय.. पण?
राज: बोल मित्रा (राज ठाकरे प्रेमाने बोलू लागल्याने शरद सोनावणे सुखावले, असे प्रेमाने ते पूर्वी कधीच बोलले नाहीत)
शरद: मी मनसेचा राजीनामा देऊन शिवसेनेत चाललोय.. तुम्हाला भविष्य नाही, मनसेचे १३व्या वर्षात तेरावे घातले, मग मी तुमच्याबरोबर कसा राहू?
राज: अरे बाबा, असं करू नकोस. सगळे नगरसेवक मला सोडून गेलेत.. तुझ्या रूपाने मनसेकडे एक कोठे ‘कोहिनूर’ आहे, तो तरी राहू दे, मित्रा..

शरद: नाही, ते आता शक्य नाही..
(राजसाहेबांनी मोबाईल खाली ठेवला.. त्यांच्यासमोर त्यांचा लाडका डॉगी आला. त्याला ते गोंजारू लागले.. डॉगी राज यांच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.. ते अश्रू राज यांच्या हातावर पडले, त्याकडे ते पाहत राहिले.. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली..)
राज: मी शरद पवार बोलतोय.. मी माढातून उभा राहणार नाही.. (राज यांनी मोबाईल बंद केला आणि डॉगीला जवळ घेऊन कुरवाळू लागले..)”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content