HomeArchiveविषाचा प्याला!

विषाचा प्याला!

Details
विषाचा प्याला!

    11-Feb-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
हवा, पाण्यासोबत आपण जी-जी पेये प्राशन करतो ती शुद्ध आणि निसर्गयुक्त असतील तर आपल्याला कदापि बाधणार नाहीत. पण, नवा काळ हा जीवनातल्या प्रत्येक गोष्टींत आणि वस्तूंत ‘केमिकल लोचा’ करून माणसाच्या जीवावर उठला आहे. दारू, मदिरा, लिकर, मद्य, ड्रिंक अशा शब्दांतूनच दारूचं हे स्टेट्स सामाजिक (दर्जा) दर्शवते. पण, दारू कोणतीही प्यायलात तरीही ती शरीरासाठी अपायकारक व घातकच, हे पिणार्‍याला समजून घेण्याची मानसिकता नाही. मदिरा प्राशन करणार्‍याचं कौतुक नि वाहवाह आम्ही अजिबात करणार नाही. किंबहुना तिच्या वाट्याला आपण जाऊच नका, असं आम्ही प्रत्येकाला सांगू. हा दारूचा घोट घशाखाली उतरल्यानं मी ताणतणावमुक्त होतो, माझं दुःख पेल्यात बुडवून मी काही काळ शांत होतो, काबाडकष्ट करणार्‍या जीवाला दारूचा घोट गळ्याखाली उतरल्यानंतर निवांत झोप लागते. दारू हा अनेक चिंतांवर अक्सिर इलाज आहे, असे डोस पाजण्याचाही प्रयत्न होतो.

उत्तराखंडमधील हरिद्वार आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये विषारी दारू प्यायल्याने 109 जणांचा बळी गेला आहे. कुणाचा बाप, भाऊ, काका, मामा, आजोबा कायमचे हिरावले गेले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कपाळाचं कुंकू हिरावलेल्या बाया-बापड्या हंबरडा फोडून रडत आहेत. घरातला कर्ताधर्ता पुरूष गमावल्यानं अनेक कुटुंबांवर आभाळ कोसळलं आहे. आतापर्यंत या विषारी दारूमुळे देशाच्या विविध राज्यांत शेकडोंनी गोरगरिबांचे, कामगारांचे बळी घेतले आहेत. 22 जून 2015 मध्ये याच विषारी दारूकांडाने मुंबईत मालाड, मालवणी परिसरात 104 जणांचा बळी घेतला होता. गावठी दारू प्राशन केल्यानंतर बहुसंख्य कामगारांना उलट्या-मळमळणे असा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर एकापाठोपाठ एकाला मृत्यूने गाठले होते. हा दारूचा गुत्ता चालवणार्‍यांविरोधात मोक्कातंर्गत कारवाई, सरकारकडून लाख, दोन लाखांची सरकारी मदत, मृतांच्या कुटुंबियांप्रती त्या दिवसापुरती सहानुभूती, सर्व काही सोपस्कार पार पडले. पुढे काय?

त्तराखंड आणि उत्तर प्रदेशातही हेच घडलं. युपीतील योगी सरकार खडबडून जागं झाल्यानंतर अवैधरित्या दारू विकणार्‍यांविरोधात कडक मोहीम राबवून 39 जणांना बेड्या ठोकल्या. सहारनपूरमधील 10 पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. पण, देशाच्या कोणत्याही राज्यात माणूस गेल्यावरच हा कारवाईचा तमाशा उभा केला जातो. त्याआधी सर्व काही सुरळीतपणे सुरू असतं. हरिद्वारच्या बालूपूरमध्ये दारूचा प्याला गळ्याखाली उतरवणार्‍यांना अनेकांना हीच दारू आपल्या मृत्यूला कारण ठरेल, असं जरा तरी वाटलं असेल का? उत्तर प्रदेशातील कुशीनगरात काहींनी जोरदार दारू पार्टी केली होती. अगदी गावातील वीटभट्टीवर लागणारी दारू प्यायल्यानंतर अवघ्या 72 तासांत शेकडो लोकांनी आपला प्राण सोडला. हे दारूच्या भट्ट्या लावणारे लोक पोलिसांच्या, स्थानिक राजकारण्यांच्या परिचयाचे नसतील का? त्यांना कुठं काय सुरू आहे, याची माहिती नसावी का? हा प्रश्न मुंबई, ठाणे व महाराष्ट्राच्या प्रत्येक खेडोपाडी व शहरांसाठीही लागू पडतो. मुंबईतील मालाड परिसरातील विषारी दारूकांडाची पुनरावृत्ती सहरानपूर आणि हरिद्वारमधील माणसांच्या मृत्यूमुळे पुन्हा झाली आहे.

सरकार आपला टॅग लावून सरकारमान्य दारूची विक्री करते. पण, दुसरीकडे सरकारी टॅगविना हप्तावसुलीच्या नावाखाली सुरू असलेले गावठी गुत्ते आपले पोलीस, सरकारी यंत्रणेच्या कधीतरी दृष्टीस पडतील का? नाहीतर कुठे काहीच घडत नाही, ही जाणीवपूर्वक दाखवलेली बेपर्वाई देशभर असेच बळी घेत राहणार. गावठी दारू म्हणजे दुसरे तिसरे काही नसून थेट एखादे रसायनच माणसाला प्यायला दिले जाते इथपर्यंत खरं आहे. आपला खिसा गरम करण्यासाठी माणसाचा जीवही घेण्यास तयार असलेल्या राक्षसी प्रवृत्ती व प्रशासनासोबत यातील प्रत्येकाची असलेली हातमिळवणी कुणाल न समजावी? मालाड मालवणीतील विषारी दारूकांडनंतर मुंबई नव्हे तर राज्यभरातील दारूचे अनधिकृत व्यवहार उघड झाले. 2004 मध्ये मुंबईतील विक्रोळी परिसरात हातभट्टीची विषारी दारू प्यायल्यानं शंभरहून अधिक जणांचा बळी गेला होता. मिथेनॉल या विषारी रसायनाचा वापर करून बनावट दारू बनवून तिची विक्री करण्यात आली होती. तेव्हापासून हातभट्टीच्या दारूवर महाराष्ट्रभर बंदी घालण्यात आली होती.

त्यानंतरही मुंबईत दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांत दादा, भाईंच्या आशीर्वादाने हातभट्टीच्या दारूचा धंदा तेजीत होता नी आजही नाही का? यातील गावठीचा गुत्ता चालवणारे अनेक व्हाईट कॉलर राजकीय नेते बनल्याचा इतिहास आहे. विक्रोळीच्या विषारी दारूकांडाची मुंबई, महाराष्ट्रात याच पुनरावृत्ती होणार नाही, असे वाटले होते. पण, भ्रष्ट यंत्रणेमुळे हाच विषाचा प्याला व व्यापाराने मालाडमध्ये 104 जणांचा बळी घेवून गेला. उत्तराखंडमधील हरिद्वार आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूर विषारी दारूकांडानंतर मानवी मृत्यूचे तांडव देशात कुठेच घडू नये, असे मनोमन वाटते. पण, दारूच्या नावाखाली कष्टकर्‍यांना विषाचा प्याला पाजणार्‍यांच्या पाठीवर जर प्रशासन, सरकार, राजकीय नेत्यांचा हात असेल तर हे व्यापारासाठी पसरवले जाणारे विष येत्या काळातही घातकी नाही ठरणार?”
 

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content