HomeArchive'विखे'रलेल्या शरयुतल्या होड्या...

‘विखे’रलेल्या शरयुतल्या होड्या…

Details
‘विखे’रलेल्या शरयुतल्या होड्या…

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

[email protected]

राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांना शरयू नदीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या तथाकथित राजीनाम्यांची पत्रं सापडली, तीही होड्या  केलेल्या अवस्थेत! या बातमीने राजकीय गोटात चर्चेला उधाण आलं. विखेंच्या या नवसंशोधनामुळे काँग्रेसच्या  गोटात  आनंदीआनंद झाला.  मरगळलेल्या काँग्रेसला नवचैतन्य मिळालं. शिवसेनेचे मंत्री आपापल्या खिशांत राजीनामे घेऊन फिरतच होते. कधी या खिशात तर कधी त्या खिशात ही पत्रं असायची. अयोध्येत राम मंदिर उभारणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर राजीनामा पत्रांच्या होड्या करून “जय श्रीराम”चा जयघोष करत त्या शरयू नदीत सोडल्या, अशी पक्की खबर विखे पाटलांना मिळाली आणि सेना अडचणीत आली. विधानसभेत ते दुष्काळ, शेतकरी आत्महत्त्या, मराठा आरक्षण या विषयावर कधी ते ठासून बोलल्याचे कोणालाही माहीत नाही.  परंतु सेनेच्या मंत्र्यांच्या राजीनामापत्रांच्या होड्या हुडकून काढल्याबद्दल मात्र त्यांचं नाव गाजलं एकदाचं… काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं..

पहिलाच फोन सोनिया मॅमचा..

पहाटेच आला.

सोनियाजी : हॅलूsss… काँग्रेच्युलेशन मिस्तर विखे…

विखे : थँक्स, मॅम…

सोनियाजी : यू आर डुइंग गुड जॉब… कीप इट अप.. लिसन राहुल स्पिकिंग… ( विखे पाटील तोंडावरचा घाम पुसतात…)

विखे : सर नमस्कार…

राहुल : देखो भैय्या…

विखे : साब मै भय्या नही हूँ, मै तो महाराष्ट्र का हूँ … अस्सल मराठा हूँ …  एक मराठा लाख मराठा…

राहुल : ठिक है… आपने बहुत बडा काम किया है…  सब का ध्यान शरयू नदीके के पास होडीया के तरफ गया है…  ऐसे काम आप करते रहो…

विखे : जी सर, जी सर… (राहुलजी फोन ठेवतात आणि विखेसाहेब भराभर दोन ग्लास पाणी पितात…)

हे पाहा… असे बोलत  पीएला आणि त्यांच्या पीआरओला समोर बसवतात…

आता या होडीमुळे मला हुडहुडी भरू लागली आहे… सगळ्यांचे फोन येणार,  कोणाचे फोन येणार याची नोंद घ्या असे त्यांनी   सांगितले…

पुन्हा मोबाईलची रिंग वाजली…

धनंजय मुंडे : अभिनंदन विखेजी… शरयू नदीत राजीनाम्याच्या होड्या सापडल्या… पवारसाहेबही आपले कौतुक करत होते…

विखे : थँक्यू, मुंडेसाहेब… पवारसाहेबांनी कौतुक केलं ना मग आता कोणाचंही… (तेवढ्यात पीए अशोक चव्हाण बोलतायेत असं सांगत मोबाईल विखेंकडे देतो) बोला अशोकराव…

अशोक चव्हाण : काय राव तुम्ही पक्षात जान आणली हो…  मी एवढ्या मोहीमा, यात्रा काढल्या तर साधा  फोन नाही केला मला कोणीही… तुम्हाला सोनिया मॅडमचा फोन आला होता… काय म्हणाल्या मॅडम?

विखे : त्यांनी अभिनंदन केलं आणि म्हणाल्या असाच “आदर्श” कार्यकर्त्यांसमोर ठेवा… (अशोकरावांनी ‘आदर्श’ शब्द ऐकताच फोन कट केला…)

अजितदादा : वा… वा…  कमाल केली राव… काय माणसं तुम्ही पेरलीत… शरयू नदीत  शेना मंत्र्यांच्या राजीनामांचे पत्र… काय ऐकतो आमी… आमी तर धरणापर्यंतच पोचलो, पण आमचं नशीब बेकार हो …  धरणात करू का?  एवढं नॅचरल बोललो आणि आत्मक्लेश करायला लागला बुवा… तुमी तर डायरेक्ट शरयू नदीपर्यंत…  अभिनंदन तुमचं! (दादांना थांबवत … आणि फोन कट झाला, तितक्यात विखेंना मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन आला)

विखे : नमस्कार खरगेजी…

खरगे : नमस्कार… दिल्लीत चर्चा आहे की तुम्ही, काय ते म्हणतात होडी…

विखे : होडी… होडी… म्हणजे बोट!

खरगे : म्हणजे उद्धव ठाकरेला बोट लावलं… वा, वा…

सेनेकडे कोण बोट दाखवत नाही आणि तुम्ही डायरेक्ट सेनेला बोट लावलं…

विखे : साहेब बोट लावलं नाही तर  बोट म्हणजे बीओएटी.  बोट, मराठीत त्याला होडी म्हणतात…

खरगे : ग्रेट… रिअली यू आर ग्रेट, आय एम प्राउड ऑफ यू… असं करा विखेजी तुम्ही या होडीचं जाहीर प्रदर्शन आयोजित करा…  ओपनिंगला राहुलजींना बोलवा…

विखे : थँक्स सर.  मी तसं करतो… पण राहुलजींना आणायचं काम तुमचं…

खरगे : शूअर… मी राहुलजींना आणीन… ठीक है, आप ये काम करना…

विखे समोर उभ्या असलेल्या पीएला गरमगरम चहा आणा… आणि पीआरओला शरयू नदीतील राजीनामा दिलेल्या होडयांचे मुंबईत प्रदर्शन ठेवायचं आहे. ओपनिंग राहुलजींच्या हस्ते होणार आहे… तेव्हा त्या कागदाच्या होड्या माझ्यासमोर आणून ठेवा… माझ्या आयुष्याचा तो मोठा ‘ठेवा’ आहे… चला कामाला लागा.

पीआरओ : साहेब, एक बोलू का?

विखे : बोल की, मी आज खुश आहे… बोल, बोल… काहीही मनात किंतु ठेऊ नकोस…

पीआरओ : साहेब … ( पीआरओ होडीत बसल्यासारखा हलू लागला आणि स्वतःला सावरत काहीसा पुटपुटू लागला…)  साहेब त्या होडींवरील मजकूर शरयू नदीने गायब केलेत…

विखे : अरेरे… हे काय घडले… कुठे मला संधी मिळणार होती, ती वायाच गेली. उद्धवजी बोलले होते की, शरयू नदीजवळ एक शक्ती आहे…

 ती शक्ती सेनेला पुढे नेणार आहे… ‘इथे विरघळले शब्द’. शरयू तुझी अद्भूत शक्तीचे दर्शन मला घडले… पण राहुलजींना कोण सांगणार?

पीआरओ विखेंना मोबाईल पुढे करत पृथ्वीराज चव्हाणसाहेबांचा फोन देत…  विखे काहीच बोलत नाहीत आणि समोर ठेवलेल्या होड्यांकडे पाहात असतात…  पंख्याच्या वाऱ्यामुळे त्या होड्या केबिनमध्ये विखेंच्या समोरच  ‘विखे’रलेल्या अवस्थेत उड्या मारत फेर धरत असतात…”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content