HomeArchive“वतन को जानो”...

“वतन को जानो” – काश्मिरी युवा आदान-प्रदान कार्यक्रम सुरू!

Details
“वतन को जानो” – काश्मिरी युवा आदान-प्रदान कार्यक्रम सुरू!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

नेहरू युवा केंद्र, मुंबई, युवा कार्यक्रम व केंद्रीय क्रीडा मंत्रालयद्वारा मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, यांच्या सहकार्याने २४ ते २९ डिसेंबर, २०१८ दरम्यान “काश्मिरी युवा आदान-प्रदान” कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव पूर्वेच्या न्यूझीलंड होस्टेल येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना भातखळकर म्हणाले की, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आपला भारत देश एक आहे. आपले वतन – भारत देशाला जाणून घेण्यासाठी एकमेकांमध्ये जाऊन मिसळण्याची आवश्यकता आहे, जे आपण आज करीत आहात. आमची संस्कृती भिन्नभिन्न असली तरी आम्ही सर्व एक आहोत. सर्व गोष्टींमध्ये माणुसकी सर्वात श्रेष्ठ आहे. भारताच्या एकात्मतेचा आधार आमचे संविधान आहे. संविधानाने पूर्ण देश एका सूत्रामध्ये बांधला आहे.
राजीव अग्रवाल, मोनिका सिंह, अनिल मुरारका, फिरोज मासुलदार, उस्मान खान, राम पाल, रसिका अणेराव, रियाझ अहमद, अभिजित राणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अशाप्रकारचे कार्यक्रम देशभरातील निवडक मुख्य शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत, त्यामध्ये मुंबईचा सुद्धा समावेश आहे. काश्मीर खोऱ्यातील युवांना देशाच्या विविध भागातील, विविध क्षेत्रातील प्रगती जाणून घेता यावी, देशातील सांस्कृतिक, औद्योगिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि शैक्षणिक रूची असलेल्या विविध ठिकाणी भेट देण्यासाठी सहभागींना संधी प्रदान करणे, अनुकूल सहभागी ज्ञान विकसित करण्यासाठी मदत करणे, देशाच्या विविध राज्यामध्ये पर्यटन, अन्न, सांस्कृतिक, हस्तकला आणि काश्मिर खोऱ्याच्या इतर उत्पादनावरील माहिती सामाहिक करणे, सामजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय परिस्थितीत एकमेकांना समजून घेण्यास, प्रशंसा करण्यास आणि तुलना करण्यास संधी प्रदान करणे, भारतीय संविधानावरील माहिती आणि ज्ञान प्राप्त करणे, नागरिकांचे कर्तव्य आणि जबाबदारी, राष्ट्रीय एकत्रीकरण, देशभक्ती आणि राष्ट्र विकास यावर संवाद व चर्चा करणे, युवांनी असामाजिक तत्त्व व गुन्हेगारीकडे न वळता समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, सामाजिक सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता या भावना वृद्धींगत व्हाव्यात, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहेत.

मुंबई येथील कार्यक्रमात प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम, श्रीनगर व पुलवामा या जिल्हयातील १३२ युवक–युवती सहभागी झाले आहेत. २४ ते २९ डिसेंबर २०१८ दरम्यान विविध शैक्षणिक, विकासात्मक विषयांवर मान्यवरांची सत्रे, मुंबई शहरातील विविध शैक्षणिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी, सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम, प्रदर्शनी, फूड फेस्टिवल इ. भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.”
 
“केएचएल ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content