HomeArchiveराज्यात मोफत शिक्षण...

राज्यात मोफत शिक्षण आणि रोजगाराची संधी!

Details
 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“शिका व कमवा योजनेंतर्गत राज्यातल्या प्रमुख जिल्ह्यांमधील नामांकीत इंडस्ट्रीजमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ठाण्यातील अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट या संघटनेने अभिनव योजना सुरू केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासमवेत ही शासनमान्य योजना राबवली जात असून त्यामुळे दहावी, बारावी, आयटीआय आणि पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.”
 
“कौशल्य भारत (Skill India) मिशन अंतर्गत राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्य सरकारनेच अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने ‘शिका व कमवा’ ही शासनमान्य योजना राबवली आहे. संस्थेने राज्यातील जवळपास सर्वच जिल्हे आणि तालुक्यांमध्ये याची प्रवेश व मार्गदर्शन केंद्र सुरू केली आहेत. १८ ते ३० वर्षे वयोगटातील विद्यार्थी तसेच बेरोजगार व्यक्तींना या संधीचा फायदा मिळणार आहे, असे अभिनव इन्स्टिट्यूटचे चेअरमन सुधीर दीक्षित यांनी सांगितले.”
 
“या माध्यमातून पदविका स्तरावरील अभ्यासक्रम शिकत असताना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगधंदे आणि व्यवसायामध्ये सामावून घेता येणार आहे. या कालावधीत त्यांना विद्यावेतनही मिळणार आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी येणारा खर्च उपभोक्ता म्हणून उद्योजकांकडून केला जाणार आहे. यापूर्वीच व्यावसायिक, रिटेल आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये सामावून घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे.”
 
“राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, बोईसर, पालघर, नाशिक या परिसरात अनेक नामांकित इंडस्ट्रिजमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. हा रोजगार मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी व बेरोजगार व्यक्तींनी पुढील ठिकाणी संपर्क साधावा.”
 
संपर्क क्रमांक: ७४००१४८१२२/७४००१४८३४०/०२२-४९६९०३२७.
 
ई-मेल : contact@abhinavinst.com
 
वेबसाईट: www.abhinavinst.com

Continue reading

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...

८४ सामने-वेळापत्रक जाहीर! ‘आयपीएल’चा महासंग्राम उद्यापासून!

क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२६च्या संपूर्ण वेळापत्रकाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत देशभरात १० संघांमध्ये तब्बल ८४ सामन्यांचा महासंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर...

महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन’?

पश्चिम आशियातील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशभरात एकच खळबळ उडाली. "ऊर्जा संकट गहिरे होतेय, सरकार कठोर उपाययोजना करणार" या आशयाचे संदेश सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि त्यातूनच पुन्हा लॉकडाऊन येणार, अशी बेछूट अफवा काही...
Skip to content