HomeArchiveमी तळपती तलवार...

मी तळपती तलवार आहे!

Details
मी तळपती तलवार आहे!

    01-May-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
आज 1 मे जागतिक कामगार दिन आणि 106 हुताम्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जाज्वल्य इतिहास जागवण्याचा महाराष्ट्र दिन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पोवाड्यातून इथल्या मातीत रूजवलेली क्रांतिकारी विचारांची रोपे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ‘दैनिक मराठा’तून महाराष्ट्रद्रोहींवर सडकून केलेला प्रहार, सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस. एम. जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे या चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस. एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्त्व केले. या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्त्वात आले.

हा महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन आपण दरवर्षी का साजरा करतो? याचा पुसटसा इतिहास पहिल्यांदा सोशल कचर्यापची उचल-फेक करणार्यांाना उगाळून सांगणे गरजेचे आहे. कारण हल्ली इतिहासाची पाने उलटून इतिहास घडवणारी माणसे एकएक करून समाजातून हरवत चालली आहेत. आजकाल आपल्या महाराष्ट्रात गुजरातचीच चर्चा अधिक चालते. गुजरातला झुकते माप, गुजरातचा विकास, गुजरातपुढे झुकलेले कागदी वाघ हे सर्व काही महाराष्ट्राच्या सीमेवर गुजरात असले तरी सीमा ओलांडून ते कधीच आत-बाहेर-सर्वत्र शिरकाव करू लागल्याची प्रचिती आपल्या पदोपदी देते. इथे राजकीय किंवा पक्षीय भेदभाव अजिबात नाही. ज्यांना संयुक्त महाराष्ट्र लढा काय होता? या लढ्यातील किती हुतात्म्यांच्या कुटुंबाना महाराष्ट्र सरकारने न्याय व सन्मान दिला? महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरील डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते.

या साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय वारसा लाभलेल्या चळवळीच्या निमित्ताने आपण एकमेकांना कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन मोकळे होतो. मुंबईतील गिरणी कामगार, मुंबईतून दररोज हद्दपार होत असलेला मराठी माणूस, बेरोजगारीच्या दरीत लोटला गेलेला देशातील व महाराष्ट्र प्रदेशातील माणूस, मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगरातील कारखाने, उद्योगांची बंद होत चाललेली धडधड, भिवंडीतील हातमाग कामगारांच्या हातून निसटत चालेला रोजगार, जेट एअरवेजसारख्या देशातील बड्या विमान कंपनीतील 20 हजारांहून अधिक कर्मचारी एकाचवेळी बेरोजगारीच्या दरीत लोटणे, पवनहंसारख्या हेलिकॉप्टर कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याने कंपनीकडे कर्मचार्यांयना पगार देण्यासाठीही पैसे न उरणे. परिणामी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणे. सरकारने पवनहंसला सावरण्याऐवजी विकण्यासाठी प्रयत्न चालवणे हे सर्व काही कामगार हिताचे धोरण राबवले जात आहे का?

खासगी, सरकारी, निमसरकारी, सेवा क्षेत्र तसेच संघटित, असंघटित क्षेत्रातील कोणता कामगार आज सुरक्षित आहे? याचे उत्तर आम्हीच खरे कामगारांचे तारणहार अशी शेखी मिरवणारे युनियनबाज आणि राजकीय पुढारी देतील का? साप्ताहिक सुट्टी, गरोदर महिलांसाठी रजा, आठ तासांची ड्युटी, ग्रॅच्युयिटी, प्रॉव्हिडंट फंड, इतर भत्ते, सेवा सुरक्षेची हमी हे आपल्याला कुणामुळं मिळालं नि कामगारांची एकजूट दाखवून आपण ते किती टिकवलं? याचं उत्तर असुरक्षित वातावरणात कंत्राटी नोकर म्हणून सेवा बजावणारा कामगार व स्वत:ला स्वयंघोषित कामगार नेते म्हणवणारे लोक देतील का? सरकार कुणाचेही असो सत्तेवर बसण्याआधी कामगार, शेतकरी, रोजंदारांना आश्वासनांच्या भुलथापा देणारे सरकार नंतर कामगारांच्या भल्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करते का? गगनाला भिडलेल्या आजच्या महागाईच्या जमान्यात कामगारांना, कर्मचार्यां ना योग्य वेतन, भत्ते दिले जातात का? महाराष्ट्रापुरता बोलायचं तर एसटी महामंडळ, मुंबईच्या बेस्ट-बसमध्ये काम करणारा कामगार, मुंबई महापालिकेतील कर्मचारी आजघडीला सुरक्षित आहे का? त्याला योग्य वेतन, बोनस, भत्ते, पगारवाढ यासाठी झगडावे लागत नाही का? या कामगारांत सरकार आपला खरा वाली आहे ही भावना आहे?

अपार कष्ट सोसून व प्रसंगी चहा विकून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेल्या नरेंद्र मोदी यांना देशातील गरीब, कष्टकरी, कामगारांप्रती कितीतरी कणव आहे. देशात परदेशी कंपन्या, उद्योगांची गुंतवणूक वाढावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले परदेश दौरे कितपत फळाला आले? राज्य व केंद्र स्तरावर दिवस-रात्र रोजगार निर्मितसाठी प्रयत्न होत असताना देशातील बेरोजगारीचा दर एप्रिलच्या पहिल्या तीन आठवड्यांत 8.1 टक्के इतका नोंदला गेल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणजे ‘सीएमआयई’ या संस्थेने का म्हणावे? देशातील बेरोजगारीचा टक्का गेल्या 45 वर्षांच्या इतिहासात 2017-18 सालात मोठा नोंदवला गेला. 2014 साली नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवर येण्याआधी दरसाल यंग इंडियासाठी रोजगारनिर्मिती, गुंतवणुकीचे टार्गेट मतदारांपुढे ठेवले होते. हा शब्द मोदी सरकारने खरा करून दाखवत जुलै 2017 ते जून 2018 या अवघ्या एका वर्षात बेरोजगारीचा 6.1 टक्क्यावर नेऊन ठेवला. 1972-73मध्ये आलेल्या बेरोजगारीच्या लाटेचाही या टक्क्याने विक्रम मोडला.

नॅशनल सॅम्पल सर्व्हेने मोदी सरकारच्या बेरोजगारी उच्चाटन कार्यक्रमाचा हा चढता आलेख मांडला होता. या बेरोजगारीवर चकार शब्दही न काढता आपल्या राज्यातील सरकार शेतकरी, कामगारांसाठी दमदार कामगिरी करत आहे. शिक्षण क्षेत्रात सरकारी शाळांना टाळी लावून शिक्षकांना देशोधडीला लावण्याचा व्यापक कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करणार्याण बळीराजाच्या प्रत्येक संकटात हे फडणवीस सरकार साथ देत आहे. कर्जमाफीचा भला मोठा आकडा जाहीर करून बळीराजाच्या जीवनात क्रांतीकारी बदल घडवून आणण्यासाठी सरकारची दिन-रात्र धडपड सुरू आहे. आपल्या राज्यात एकाही शेतकर्याणची आत्महत्त्या होत नाही, राज्यात कुठेही दुष्काळ पडण्याआधीच उपाययोजना राबवल्या जात आहे. तरीही विरोधक विचारतो आहे तुम्हाला लाज कशी वाटत नाही? एकमेकांची लाज काढण्याचा पंचवार्षिक कार्यक्रम दरसाल सुरू आहे. कष्टकरी, कामगार, शेतकरी, बेरोजगार, रोजगार आजही भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी झगडतो आहे, पराकोटीचा संघर्ष करतो आहे. तोच श्रमिकांचा आवाज बनून कवीवर्य नारायण सुर्वे इथल्या व्यवस्थेला तोच तोच सवाल करत आहेत.

कामगार आहे.. मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो!
थोडासा गुन्हा करणार आहे..
पोटापुरता पैसा पाहिजे, नको पिकाया पोळी
देणार्यााचे हात हजारो दुबळी माझी झोळी॥
एक वितीच्या वितेस पुरते, तळ हाताची थाळी
देणार्या्चे हात हजारो दुबळी माझी झोळी॥
कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर,
संशय माझा आला तुम्हा तर, नाही जाणार बाहेर॥
पानी आणायला जाऊ का नको – काय ते पत्रात लिवा
शंभर रूपयांचा हिसाब मागता मीच का एकलीनं खाल्ले,
लाईटीचे वीस दिले, पाण्याचे तीस दिले, पंचवीसचे राशन आणले,
दुधवाल्याचे पंचवीस दिले. त्यांना देऊ का नको, काय ते पत्रात लिवा
वाचलेत चेहरे, किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात
इथे सत्य एक अनुभव, बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात.
जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते
मरताना तेही बापडे दडतील स्ट्रेचर धरून
पोशाखी शब्द रूख्या मनाने आमची तिरडी उचलतील.
कामगार आहे मी
तळपती तलवार आहे.”
 

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content