Details
महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची प्रवेश प्रक्रिया सुरू
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची पाचवी ते दहावीच्या इयत्तेसाठी फक्त मुलांसाठी निवासी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तळवली, टोकावडे (मुरबाड) परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या निवासी शाळेत केवळ मुलांनाच इंग्रजी माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते.
यंदाच्या दहावीच्या परिक्षेत सलग 12 वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा या शाळेने राखली आहे. त्याचबरोबर हॉकी, नेमबाजी, धनुर्विद्या, मुष्टियुद्ध, वेटलिफ्टिंग आदी खेळांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून लौकिक कायम ठेवला आहे. पाचवी ते दहावीपर्यंत ही शाळा असून शालेय अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच सैनिकी प्रशिक्षण, स्वयंसंरक्षण, रायफल शूटींग, साहसी खेळ, कराटे, मुष्टियुद्ध आदी विविध स्वरूपाचे ज्ञान प्रात्याक्षिकांसह विद्यार्थ्यांना दिले जाते.
हॉकीच्या खेळासाठी याठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे हे मैदान विविध स्पर्धांसाठी एक मोठे आकर्षण ठरले आहे. या ठिकाणच्या अनेक विद्यार्थ्यांनी मुष्टियुद्ध व हॉकी या खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच राज्यात डिजिटल वर्गाच्या माध्यमातून सैनिकी शाळांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रमदेखील संस्थेच्या वतीने राबवण्यात आला.
संस्थेचे संचालक रणजित सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार सुरू आहे. वेगवेगळ्या संकल्पना व नवे प्रयोग सातत्याने याठिकाणी करत विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्वाचे सर्वांगीण विकासाचे कार्य नेटकेपणाने करण्यात येते. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यात वैयक्तिकपणे लक्ष देऊन त्यांना अनुकूल असा वाव दिला जातो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांकडून सातत्याने मार्गदर्शन केले जाते. निवृत्त लष्करी अधिकारीदेखील नियमितपणे याठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना विविध तंत्र शिकवत असतात. केवळ मुंबई, ठाणे किंवा महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील विद्यार्थी याठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत.
अधिक माहितीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रमोद देसले 7038566888, गणेश व्यापारी 9270507597 तसेच काशिनाथ भोईर यांच्याशी 9273115838, 8888195574 वर संपर्क साधावा, असे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो