HomeArchiveमतदान, माझे राष्ट्रीय...

मतदान, माझे राष्ट्रीय कर्तव्य!

Details
“मतदान, माझे राष्ट्रीय कर्तव्य!”

    29-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
आज 29 एप्रिल 2019 रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, मावळ, शिरूर, शिर्डी, नाशिक, नंदुरबार, दिंडोरी, धुळे येथे मतदान होत आहे. या राष्ट्रीय उत्सवात देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी सर्वश्रेष्ठ दान अर्थात मतदानाची संधी आपल्याकडे चालून आली आहे. ती मी कदापि दवडणार नाही, ही प्रतिज्ञा आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकानेच केली पाहिजे. त्यानंतरही मतदान करा, मतदान करा! आपला हक्क बजावा. हा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम, सामाजिक संस्थांमार्फत, सिने कलाकारांकडून दरवर्षी जागररूपात का मांडत राहवा? लोकशाहीची किंमत न कळलेला इतका निरक्षर वर्ग आपल्या अवती-भवती का वाढतो आहे? काहीजण तर मतदानाच्या दिवशीच मी सिनेमा बघायला गेलो, आम्ही लगोलग सुट्ट्या आल्याने सहलीला गेलो, गावी गेलो, परदेशात गेलो, कडक उन्ह होते म्हणून घराबाहेरच पडलो नाही, मी खूप मोठ्या संकटात अडकलो होतो, अशी तकलादू आणि पळपुटी कारणे देऊन मोकळे होतात. आशिक्षित गरीब माणसाला आपले आद्यकर्तव्य कळतं असेल आणि शिकले-सवरलेले टॉवरच्या खाली उतरून मतदान करत नसतील तर मतदानाचा टक्का कमी-अधिक का नाही राहणार?

आपल्या एका मताची किंमत स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही आपल्याला न कळावी? स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन या वर्षातील दोन राष्ट्रीय सणांपुरत्या आपल्यातील देशभावना काही प्रमाणात दाटून याव्यात. देशभक्तीपर गाणी ऐकणे, केबलवरील सिनेमे पाहणे ही राष्ट्रभक्ती असू शकते का? तोच न्याय मतदानाच्या बाबतही का लागू पडावा? आपल्या देशात लोकशाही नांदावी, यासाठी राष्ट्रपुरूषांनी केलेल्या त्याग व बलिदानाची किंमत आपल्याला चटके न बसल्याने आजही न कळावी? मतदान करा, लोकशाहीचा हक्क बजावा यासाठी जनजागृतीची पंचवार्षिक परंपरा हवीच कशाला? मतदान ऐच्छिक हवे की नको इथवर चाललेल्या या चर्चेत आधारसोबत सर्व देश जोडला गेला असताना सक्तीचे मतदान प्रत्येकासाठी का लागू होऊ नये? मी जर या भारत देशाचा नागरिक असेन तर माझा सर्वप्रथम अधिकार आणि कर्तव्याची जाणीव मला का नसावी?

इथे कुणाला मतदान करावे, कुणाविरोधात प्रचार करावा, कुणाला खासदार, कुणाला पंतप्रधान, कुणाला मंत्री बनवावे एवढी ताकद आपल्या बोटावर लागणार्यार मतदानाच्या शाईत आहे. मग मतदान करून काय मिळणार? मतदान करून कुणाचं भलं झालं आहे? ही नकारात्मक भावना वाढीस लावणारे लोकशाहीचे तारक की खरे मारेकरी? आपल्या स्थानिक उमेदवाराने गेल्या पाच वर्षांत केलेली निराशा, भ्रष्ट कारभार, वाढती बेरोजगारी, महागाई, कामगारांचे शोषण, विकासाच्या नावाने बोंब, मुलभूत सोयीसुविधांसाठी आजही करावा लागणारा संघर्ष हे सर्व चित्र मी मतदान करणार नाही! ही नकारात्मक भावना बदलू शकते का? कुणाला डोक्यावर बसवायचं नि कुणाला आपटायचं हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार मी मतदारराजा म्हणून जर मला त्या दिवसापुरता असेल तर तो दिवस आणि त्याच महत्त्व मला का नाही कळावं? मला सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल कणारी संसदीय लोकशाही नको? लोकशाहीऐवजी हिटलरशाही, हुकूमशाही, जातीयवाद-धर्मवादी, स्त्रीला कायम दासी आणि दुय्ययम मानणारी आणि सामाजिक विषमतेचे बीज आपसांत पेरून गुलामगिरी लादणारा शोषणकर्ता हवा आहे का? याचं उत्तरही मतदानासारखं पवित्र कर्तव्य बजावण्याची संधी दवडणारे आणि मतदान नको म्हणणारे क्रांतिकारकांडे नाही.

मतदानाचं पहिलं कर्तव्य बजावण्यासाठी वयाची अर्हता 18 वर्षे पूर्ण लागतात. या अठरा वर्षांनंतरही आपण या देशाचे, राष्ट्राचे सुजाण नागरिक आहोत. मतदान हे प्रथम कर्तव्य मानून हा अधिकार बजावलाच पाहिजे, याची जाणीव प्रत्येकांत करून द्यावी? इतक शैक्षणिक, सामाजिक मागासलेपण आपल्याकडे आहे का? मतदान म्हणजे पुलाव, बिर्याणी आणि हातावर चार पैसे टेकवून आपला स्वाभिमान विकत घेणे आहे का? आपण आपल्यापासून आपल्या घरकुटुंबापासून मतदान हे प्रथम कर्तव्य मानल्यास आणि आपलं एक मतही भाकरी पलटवण्याची ताकद ठेवते, हा विश्वास ठेवल्यास आपली लोकशाही अधिक बळकट व मजबूत होईल की नाही? मतदान करा व 50 टक्के सूट मिळवा किंवा अमकी गोष्ट फुकटात मिळवा इथवर मतदानवाढीसाठी चहूबाजू जागर सुरू असला तरी पुण्यासारख्या उच्चशिक्षित शहरात मतदानाचा टक्का निराशाजनक खाली कसा घसरतो? तोच टक्का कोल्हापूर, औरंगाबाद, लातूरसारख्या पट्ट्यात दुष्काळदाह सोसून आणि मुलभूत सुविधांसाठी झगडूनही बर्या पैकी समाधानकारक असतो, हीच खरी लोकशाहीची खरी गंमत आहे.

‘लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं राज्य आहे’ मग नेत्यांनी नेत्यांसाठी आपल्या कौटुंबिक स्वार्थासाठी इथे लोकशाहीला वेठीस धरल्याची निराशा आपल्यांत जर रूजली असेल तर त्याला उत्तरही आपले एक ‘मत’ आहे. लोकशाहीत प्रत्येक मताला लाखमोलाची किमत आहे ती आपण ओळखली तर बदल घडू शकतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाणे, कल्याणसारख्या भागांत विकास झाला नाही म्हणून गावेच्या गावे आणि मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याच्या बातम्या आल्या. पण, मतप्रकियेवर विश्वास ठेवणार्याा लोकशाहीत बदल आणि पर्यायाला महत्त्व आहे. त्यामुळे पाच वर्षांनी चालून आलेली संधी गमावणे कितपत योग्य आहे, यावरही अमंल झाला पाहिजे.”
 

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content