HomeArchiveभोसरीच्या आखाड्यात मैदान...

भोसरीच्या आखाड्यात मैदान कोण मारणार?

Details
भोसरीच्या आखाड्यात मैदान कोण मारणार?

    11-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
विजय भोसले..
मुंबई ब्युरो चीफ, केसरी
 
केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी असताना राज्यात शिवसेना सत्तेत राहून भाजपला वारंवार खिंडीत पकडून विविध प्रश्नांवरून ब्लॅकमेल करत असल्याचे चित्र राज्यानेच नव्हे तर देशाने पाहिले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत बंद खोलीत नेमके असे काय घडले की लगेचच संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी शाह यांच्या खांद्याला-खांदा लावून युती झाल्याचे जाहीर केले हे त्यांनाच ठाऊक. आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका गणेशोत्सवानंतर केव्हाही जाहीर होऊ शकतात. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटन भूमिपूजनानिमित्त आले असता ठाकरे यांनी पुन्हा राज्यात युतीचे सरकार येणार असे जाहीर करून पंतप्रधानांना एकप्रकारे सुखद धक्का दिला. त्यामुळे तूर्तास तरी या दोन्ही पक्षाची युती होईल, असे आपण समजू.
 
 
सत्तेत राहून भाजपला सातत्याने शिवसेनेने सामना या मुखपत्रातून विरोध करून भाजपचा कारभार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे घायाळ होऊनदेखील भाजपने गप्प बसण्याचे धोरण स्वीकारले. कारण, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीतजास्त जागा येणे भाजपच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते आणि त्यात ते यशस्वी झाले. आता केंद्रामध्ये बहुमत असल्यामुळे भाजप जागावाटपावरून शिवसेनेला खिंडीत पकडू शकते. भाजपने राज्यातील २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारी केली आहे. त्याप्रमाणे त्यांनी जिल्हावार इच्छूक उमेदवारांच्या चाचपण्या केल्या आहेत. शिवाय सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती, शिवसंग्राम, आरपीआय (आठवले गट) या मित्रपक्षांना काही जागा सोडाव्या लागणार आहेत. भाजपला गेल्या निवडणुकीत १२२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे १२२ जागांवर भाजपचा हक्क राहणारच. शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. तेही ६३ जागांवर आपला हक्क दाखविणार. रासपला १ जागा मिळाली होती. मात्र, ते आठ ते दहा जागा मागत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही मागणी हीच आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेदेखील ५ ते ६ जागा मागत आहे. विनायक मेटेदेखील जागा मागत आहेत. हे सर्व पक्ष भाजपचे मित्रपक्ष असून यांना भाजपने त्यांच्या कोट्यातील जागा द्याव्यात, असे मत शिवसेनेचे आहे. भाजप मात्र शिवसेनेला १०० ते ११० जागा देण्याच्या मनःस्थितीत आहे. शिवसेना हे मान्य करील की नाही हे सांगता येत नाही.
 
 
भारतीय जनता पक्षाचे १७६ जागा निवडून आणण्याचे ध्येय असून केंद्राप्रमाणेच राज्यात एकहाती बहुमत मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने भाजपने राज्यभर महाजनादेश यात्रा काढून आपण स्वतंत्ररित्या निवडणूक लढवू शकतो, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तरीदेखील पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी युतीचे आधीच ठरले आहे, असे सांगून युतीचे संकेत दिले आहेत. मात्र, शेवटच्या क्षणी जागावाटपावरून पेच निर्माण होऊ शकतो. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात चांगली मते घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला अडचणीत आणले. याचा फायदा भाजप-शिवसेनेला झाला. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीत फूट पडली असून येणार्याअ विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वतंत्ररित्या निवडणूक लढविणार असल्याची घोषणा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी होणारच. यासंदर्भात मंगळवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन संभाव्य आघाडीबद्दल चर्चा केली. काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकमत झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेण्यासाठी राष्ट्रवादी इच्छूक असून तसे झाल्यास राष्ट्रवादी आपल्या कोट्यातील महत्त्वाच्या जागा मनसेला देऊ शकते. काँग्रेस त्यांच्यातील काही जागा मित्रपक्षाला देऊ शकते.
 
 

 
 
भोसरी विधानसभा मतदारसंघातील यावेळेची राजकीय परिस्थिती वेगळी असून ही जागा शिवसेनेकडे असल्याने युती झाल्यास शिवसेनेचाच या जागेवर हक्क असून मंगळवारी शिवसेनेच्या उमेदवारांच्या मुंबईत मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांची मोठी अडचण आहे. एकतर त्यांना शिवसेनेकडून निवडणूक लढवावी लागेल. अथवा पुन्हा एकदा अपक्ष म्हणून आपले भवितव्य अजमावे लागेल. एकंदरीत भोसरीची निवडणूक यावेळेस वेगळी ठरणार हे निश्चित. भाजप-सेना युती झाली तर शिवसेनेला मतदारसंघ सोडावा लागेल. लांडगे यांनी गेल्या पाच वर्षांत सरकारला मदत करून आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना मदत केली. विशेष म्हणजे महेश लांडगे यांची काम करण्याची पद्धत वेगळी असून मतदारसंघातील कोणताही मतदार काम घेऊन त्यांच्या कार्यालयात गेला असता त्याचे काम शंभर टक्क्के होणार. याचे कारण त्यांनी आपल्या कार्यालयात हायटेक यंत्रणा राबवून महापालिका, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये याठिकाणी आपला वचक बसविला आहे. न्याय मिळत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्यांच्या कामावर खूष आहेत. महापालिका हद्दीतील कामे नगरसेवकांकडून केली जातात. मात्र, नागरिक नगरसेवकांकडे न जाता त्यांच्या कार्यालयात जातात आणि त्यांच्या कार्यालयातून त्यांचे काम केले जाते. मतदारसंघातील अनेक बेरोजगार तरूणांना त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या कारखान्यांतून काम मिळवून दिले. याचा लेखाजोखाही त्यांनी ठेवला आहे. ही बाबदेखील जमेची आहे. मात्र, आता युती झाली तर शिवसेनेला जागा जाईल. आणि युती झाली नाही तर दोन्ही पक्ष वेगळे लढतील आणि मतांचे विभाजन होईल. मग याठिकाणी एका अर्थाने राजकीय लॉटरीच म्हणावी लागेल.
 
 
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळेस मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आपले मामेभाचे महेश लांडगे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. लांडे यावेळेस प्रबळ इच्छूक आहेत. गेली वर्षभर ते या मतदारसंघात गाजावाजा न करता बैठका घेऊन आपले काम करत आहेत. राष्ट्रवादीकडून ते इच्छूक आहेतच. मात्र, राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवायची की नाही या मनःस्थितीतही सध्या ते आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि ईव्हीएमबद्दल सांशकता असल्यामुळे राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवायची की नाही या मनःस्थितीत असल्याचे समजते. लांडे यांना अपक्ष म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक वेळा यश मिळाले आहे. त्यामुळे ऐनवेळेस ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे शेवटपर्यंत लांडे आपल्या उमेदवारीबाबत गूढ कायम ठेवतील. राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी गेली वर्षभर महापालिकेतील गैरकारभाराविरूध्द आवाज उठवून राष्ट्रवादीला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. ते यावेळेस भोसरीतून प्रबळ इच्छूक आहेत. राष्ट्रवादीकडून ते इच्छूक आहेत. समजा त्यांना उमेदवारी नाकारली तर ते शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करतील. तेथूनही उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवतील, अशी त्यांची परिस्थिती जाणवत आहे. त्यांनी आजपर्यंत विलास लांडे, महेश लांडगे यांना मदत केली. दोन्ही आमदार झाले. त्यांनी लांडे यांच्या विरोधात काम केले, लांडगे निवडून आले. आता लांडगे यांच्या विरोधात असून सातत्याने ते त्यांच्यावर राजकीय आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी लांडे-लांडगे यांना अडचणीची ठरू शकते.
 
 
भोसरीतून शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इरफान सय्यद आणि धनजंय आल्हाट इच्छूक आहेत. निवडून येण्याच्या निकषावर उमेदवारी दिली जाणार आहे. पक्षात येण्यासाठी जे इच्छूक आहेत. त्यांच्यापेक्षाही इरफान सय्यद, धनजंय आल्हाट ताकदवान आहेत, असा शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दावा केला आहे. तर, खुद्द सुलभा उबाळे यांनी आपण इच्छूक नसल्याचे जाहीर केले आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी 43 हजार 626 ही चौथ्या क्रमाकांची मते घेऊन अनेक राजकीय निरीक्षकांना धक्का दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे विलास लांडे यांना 44 हजार 211 मते मिळाली होती तर शिवसेनेच्या उबाळे यांना 44 हजार 857 मते मिळाली होती. काँग्रेस उमेदवारला फक्त 14 हजार 363 मते मिळाली होती. येणार्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे एकनाथ पवार इच्छूक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. युती झाली आणि भाजपला मतदारसंघ सोडला गेला तर भाजपची उमेदवारी पवार यांना मिळू शकते. कारण, त्यांनी त्या दृष्टीने थेट दिल्लीपर्यंत फिल्डींग लावली आहे. वरिष्ठ पातळीवर पवार यांचे चांगले संबंध असल्यामुळे ते उमेदवारी आणू शकतात. बहुजन वंचित आघाडी व एमआयएम हे दोन्ही पक्षदेखील भोसरीमधून उमेदवार देणार आहेत. या दोन्ही उमेदवारांमुळे मतांचे विभाजन होणार. मात्र, त्याचा फायदा निश्चित कोणाला होईल, हा येणारा काळच ठरविल.”

 

 
 
विजय भोसले..
“मुंबई ब्युरो चीफ, केसरी”
 
“केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी असताना राज्यात शिवसेना सत्तेत राहून भाजपला वारंवार खिंडीत पकडून विविध प्रश्नांवरून ब्लॅकमेल करत असल्याचे चित्र राज्यानेच नव्हे तर देशाने पाहिले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत बंद खोलीत नेमके असे काय घडले की लगेचच संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी शाह यांच्या खांद्याला-खांदा लावून युती झाल्याचे जाहीर केले हे त्यांनाच ठाऊक. आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका गणेशोत्सवानंतर केव्हाही जाहीर होऊ शकतात. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटन भूमिपूजनानिमित्त आले असता ठाकरे यांनी पुन्हा राज्यात युतीचे सरकार येणार असे जाहीर करून पंतप्रधानांना एकप्रकारे सुखद धक्का दिला. त्यामुळे तूर्तास तरी या दोन्ही पक्षाची युती होईल, असे आपण समजू.”
 
 
“सत्तेत राहून भाजपला सातत्याने शिवसेनेने सामना या मुखपत्रातून विरोध करून भाजपचा कारभार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे घायाळ होऊनदेखील भाजपने गप्प बसण्याचे धोरण स्वीकारले. कारण, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीतजास्त जागा येणे भाजपच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते आणि त्यात ते यशस्वी झाले. आता केंद्रामध्ये बहुमत असल्यामुळे भाजप जागावाटपावरून शिवसेनेला खिंडीत पकडू शकते. भाजपने राज्यातील २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारी केली आहे. त्याप्रमाणे त्यांनी जिल्हावार इच्छूक उमेदवारांच्या चाचपण्या केल्या आहेत. शिवाय सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती, शिवसंग्राम, आरपीआय (आठवले गट) या मित्रपक्षांना काही जागा सोडाव्या लागणार आहेत. भाजपला गेल्या निवडणुकीत १२२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे १२२ जागांवर भाजपचा हक्क राहणारच. शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. तेही ६३ जागांवर आपला हक्क दाखविणार. रासपला १ जागा मिळाली होती. मात्र, ते आठ ते दहा जागा मागत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही मागणी हीच आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेदेखील ५ ते ६ जागा मागत आहे. विनायक मेटेदेखील जागा मागत आहेत. हे सर्व पक्ष भाजपचे मित्रपक्ष असून यांना भाजपने त्यांच्या कोट्यातील जागा द्याव्यात, असे मत शिवसेनेचे आहे. भाजप मात्र शिवसेनेला १०० ते ११० जागा देण्याच्या मनःस्थितीत आहे. शिवसेना हे मान्य करील की नाही हे सांगता येत नाही.”
 
 
“भारतीय जनता पक्षाचे १७६ जागा निवडून आणण्याचे ध्येय असून केंद्राप्रमाणेच राज्यात एकहाती बहुमत मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने भाजपने राज्यभर महाजनादेश यात्रा काढून आपण स्वतंत्ररित्या निवडणूक लढवू शकतो, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तरीदेखील पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी युतीचे आधीच ठरले आहे, असे सांगून युतीचे संकेत दिले आहेत. मात्र, शेवटच्या क्षणी जागावाटपावरून पेच निर्माण होऊ शकतो. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात चांगली मते घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला अडचणीत आणले. याचा फायदा भाजप-शिवसेनेला झाला. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीत फूट पडली असून येणार्याअ विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वतंत्ररित्या निवडणूक लढविणार असल्याची घोषणा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी होणारच. यासंदर्भात मंगळवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन संभाव्य आघाडीबद्दल चर्चा केली. काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकमत झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेण्यासाठी राष्ट्रवादी इच्छूक असून तसे झाल्यास राष्ट्रवादी आपल्या कोट्यातील महत्त्वाच्या जागा मनसेला देऊ शकते. काँग्रेस त्यांच्यातील काही जागा मित्रपक्षाला देऊ शकते.”
 
 

 
 
“भोसरी विधानसभा मतदारसंघातील यावेळेची राजकीय परिस्थिती वेगळी असून ही जागा शिवसेनेकडे असल्याने युती झाल्यास शिवसेनेचाच या जागेवर हक्क असून मंगळवारी शिवसेनेच्या उमेदवारांच्या मुंबईत मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांची मोठी अडचण आहे. एकतर त्यांना शिवसेनेकडून निवडणूक लढवावी लागेल. अथवा पुन्हा एकदा अपक्ष म्हणून आपले भवितव्य अजमावे लागेल. एकंदरीत भोसरीची निवडणूक यावेळेस वेगळी ठरणार हे निश्चित. भाजप-सेना युती झाली तर शिवसेनेला मतदारसंघ सोडावा लागेल. लांडगे यांनी गेल्या पाच वर्षांत सरकारला मदत करून आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना मदत केली. विशेष म्हणजे महेश लांडगे यांची काम करण्याची पद्धत वेगळी असून मतदारसंघातील कोणताही मतदार काम घेऊन त्यांच्या कार्यालयात गेला असता त्याचे काम शंभर टक्क्के होणार. याचे कारण त्यांनी आपल्या कार्यालयात हायटेक यंत्रणा राबवून महापालिका, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये याठिकाणी आपला वचक बसविला आहे. न्याय मिळत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्यांच्या कामावर खूष आहेत. महापालिका हद्दीतील कामे नगरसेवकांकडून केली जातात. मात्र, नागरिक नगरसेवकांकडे न जाता त्यांच्या कार्यालयात जातात आणि त्यांच्या कार्यालयातून त्यांचे काम केले जाते. मतदारसंघातील अनेक बेरोजगार तरूणांना त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या कारखान्यांतून काम मिळवून दिले. याचा लेखाजोखाही त्यांनी ठेवला आहे. ही बाबदेखील जमेची आहे. मात्र, आता युती झाली तर शिवसेनेला जागा जाईल. आणि युती झाली नाही तर दोन्ही पक्ष वेगळे लढतील आणि मतांचे विभाजन होईल. मग याठिकाणी एका अर्थाने राजकीय लॉटरीच म्हणावी लागेल.”
 
 
“गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळेस मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आपले मामेभाचे महेश लांडगे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. लांडे यावेळेस प्रबळ इच्छूक आहेत. गेली वर्षभर ते या मतदारसंघात गाजावाजा न करता बैठका घेऊन आपले काम करत आहेत. राष्ट्रवादीकडून ते इच्छूक आहेतच. मात्र, राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवायची की नाही या मनःस्थितीतही सध्या ते आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि ईव्हीएमबद्दल सांशकता असल्यामुळे राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवायची की नाही या मनःस्थितीत असल्याचे समजते. लांडे यांना अपक्ष म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक वेळा यश मिळाले आहे. त्यामुळे ऐनवेळेस ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे शेवटपर्यंत लांडे आपल्या उमेदवारीबाबत गूढ कायम ठेवतील. राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी गेली वर्षभर महापालिकेतील गैरकारभाराविरूध्द आवाज उठवून राष्ट्रवादीला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. ते यावेळेस भोसरीतून प्रबळ इच्छूक आहेत. राष्ट्रवादीकडून ते इच्छूक आहेत. समजा त्यांना उमेदवारी नाकारली तर ते शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करतील. तेथूनही उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवतील, अशी त्यांची परिस्थिती जाणवत आहे. त्यांनी आजपर्यंत विलास लांडे, महेश लांडगे यांना मदत केली. दोन्ही आमदार झाले. त्यांनी लांडे यांच्या विरोधात काम केले, लांडगे निवडून आले. आता लांडगे यांच्या विरोधात असून सातत्याने ते त्यांच्यावर राजकीय आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी लांडे-लांडगे यांना अडचणीची ठरू शकते.”
 
 
“भोसरीतून शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इरफान सय्यद आणि धनजंय आल्हाट इच्छूक आहेत. निवडून येण्याच्या निकषावर उमेदवारी दिली जाणार आहे. पक्षात येण्यासाठी जे इच्छूक आहेत. त्यांच्यापेक्षाही इरफान सय्यद, धनजंय आल्हाट ताकदवान आहेत, असा शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दावा केला आहे. तर, खुद्द सुलभा उबाळे यांनी आपण इच्छूक नसल्याचे जाहीर केले आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी 43 हजार 626 ही चौथ्या क्रमाकांची मते घेऊन अनेक राजकीय निरीक्षकांना धक्का दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे विलास लांडे यांना 44 हजार 211 मते मिळाली होती तर शिवसेनेच्या उबाळे यांना 44 हजार 857 मते मिळाली होती. काँग्रेस उमेदवारला फक्त 14 हजार 363 मते मिळाली होती. येणार्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे एकनाथ पवार इच्छूक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. युती झाली आणि भाजपला मतदारसंघ सोडला गेला तर भाजपची उमेदवारी पवार यांना मिळू शकते. कारण, त्यांनी त्या दृष्टीने थेट दिल्लीपर्यंत फिल्डींग लावली आहे. वरिष्ठ पातळीवर पवार यांचे चांगले संबंध असल्यामुळे ते उमेदवारी आणू शकतात. बहुजन वंचित आघाडी व एमआयएम हे दोन्ही पक्षदेखील भोसरीमधून उमेदवार देणार आहेत. या दोन्ही उमेदवारांमुळे मतांचे विभाजन होणार. मात्र, त्याचा फायदा निश्चित कोणाला होईल, हा येणारा काळच ठरविल.”

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content