HomeArchiveभुईमुगाच्या टरफलांपासून स्मार्ट...

भुईमुगाच्या टरफलांपासून स्मार्ट स्क्रीन्स!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“भारतीय वैज्ञानिकांनी पर्यावरणस्नेही स्मार्ट स्क्रीन विकसित केला असून हा स्क्रीन खाजगीपणाचे संरक्षण करण्याबरोबरच यातून बाहेर पडणारा प्रकाश आणि उष्णता नियंत्रित करुन, उर्जा संवर्धनदेखील करतो. यामुळे वातानुकूलनाचा भारही कमी लागतो. विशेष म्हणजे हा स्मार्ट स्क्रीन भुईमुगाच्या टाकाऊ शेंगांपासून बनवण्यात आला आहे.”
 
“विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या अखत्यारीत असलेल्या बेंगळूरूच्या ‘नैनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स’ (CeNS), या स्वायत्त संस्थेतील प्रा. एस. कृष्णप्रसाद यांच्या नेतृत्त्वाखालील संशोधकांच्या एका गटाने, डॉ. शंकर राव यांच्यासह, भुईमुगाच्या टरफलांपासून हे सेल्युलाईड आधारित स्मार्ट स्क्रीन बनवले आहेत.”
 

 
“या स्मार्ट स्क्रीन अॅप्लीकेशनमध्ये द्रव स्फटिक रेणू आणि पॉलीमर मेट्रिक्स एकत्रित करण्यात आले आहेत. नैनोस्फटिक सेल्युलोसचा वापर करुन हे मेट्रिक्स तयार करण्यात आले आहेत आणि हे सेल्युलोज भुईमुगाच्या टरफलांपासून तयार करण्यात आले आहेत. आयआयटी रूडकी येथील प्रो. युवराज सिंग नेगी यांच्या चमूने हे सेल्युलोज तयार केले आहेत. त्यांनी विकसित केलेले हे उपकरण अप्लाईड फिजिक्सचा भाग आहे. पॉलीमर आणि द्रव स्फटिक योग्य प्रमाणात एकत्र झाल्यास त्यांच्या एकत्रित गुणधर्मातून स्मार्ट स्क्रीनसाठी आवश्यक ते ऑप्टीकल गुणधर्म तयार होतात. हे उपकरण कोणत्याही कृषी टाकाऊ वस्तूपासून तयार केले जाऊ शकते. मात्र भुईमुग टरफलाच्या कचऱ्यापासून तयार झालेले, स्मार्ट स्क्रीन अतिशय प्रभावी असल्याचे आढळले आहे.”
 
“या स्क्रीनमुळे आपले खाजगीपण तर जपले जातेच, त्याशिवाय उर्जा संवर्धनासाठीदेखील त्याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, एखाद्या खिडकीच्या काचेला ही स्मार्ट स्क्रीन लावली, तर ती काच पारदर्शक राहील. मात्र त्यातून येणारे विकिरण, अतिरिक्त प्रकाश आणि उष्णता यामुळे नियंत्रित ठेवता येईल. यामुळे आतला भाग गार राहू शकेल.”

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content