HomeArchiveभाजपमुळे बारणे मावळात...

भाजपमुळे बारणे मावळात ‘जायंट किलर’!

Details
भाजपमुळे बारणे मावळात ‘जायंट किलर’!

    29-May-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
संपूर्ण देशात पुन्हा एकदा मोदी पर्व सुरू झाले. याबाबतीत आश्चर्य करण्याचे कारण नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी नावाची लाट होती. त्यावेळी 282 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळेस संपूर्ण देशात मोदींची लाट नसताना केवळ भाजपला 303 जागा मिळाल्या. या जागा कशा मिळाल्या, हा जरी संशोधनाचा विषय असला तरी `जो जिता वही सिंकदर’ या म्हणीप्रमाणे मोदी हे सिंकदर ठरले आहेत आणि ते मान्य करावे लागेल. देशात प्रचारयंत्रणेमध्ये यावेळेस सत्ताधारी पक्षाने विकासाचा कोणताही मुद्दा न मांडता धर्म आणि जातीवर प्रचार करून त्याचबरोबर पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राईक या मुद्द्यांचा प्रचारामध्ये वापर करून त्याचा फायदाही घेतला.

दुसर्या बाजूला काँग्रेसने राफेल प्रकरणावरून ‘चौकीदार चौर है’ या मुद्यावर भर दिला. मात्र, मतपेटीतून याचा उलटा परिणाम झाल्याचे दिसून आले. काँग्रेसने देशातील गोरगरीब जनतेसाठी 72 हजार अनुदान देण्याचे योजना जाहीर केली. ही योजना चांगली होती. अनेक अर्थतज्ज्ञांनी याचे कौतुकही केले. मात्र, देशातील काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारात ही योजना तळागळापर्यंत ज्या पध्दतीने पोहोचवायला हवी होती, त्या पध्दतीने पोहोचवली नाही. त्याचाही फटका काँग्रेसला बसला. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपली मुले, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या उमेदवारीवर हट्ट धरून निवडणूक काळातही प्रचारात लक्ष केंद्रीत केल्यामुळे याचाही फटका त्या-त्या राज्यात बसला. खुद्द राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत ही बाब बोलून दाखविली. त्यामुळे ही बाब उघड झाली.

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ज्या पध्दतीने पक्षाचे काम तळागळापर्यंत पोहोचविण्याचे करत आहेत. त्याचाही विजयात मोठा वाटा आहे. काँग्रेसचे पुढारी वर्षांनुवर्षं सत्तेत राहिल्यामुळे त्यांना गाडीतून उतरण्याची सवय नाही. तळागळ्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावना, त्यांना येणार्यात अडचणी, त्यांनी कधीही जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे देशभर काँग्रेसची वाताहत झाली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष गांधी यांनी स्वतःहून संपूर्ण देशात प्रचारासाठी झोकून दिले होते. मात्र, महाराष्ट्रात गांधी यांना मुंबई, पुणे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागात सभा घेतल्या असत्या तर निश्चित त्याचा फायदा झाला असता. यासंदर्भात राज्यातील काँग्रेस नेते गप्प का राहिले याचे कोडे मात्र कार्यकर्त्यांना पडले आहे.

विदर्भातील चंद्रपूर याठिकाणी केवळ एक जागा काँग्रेसला मिळाली आणि पक्षाची अब्रू राखली गेली. येथेही ऐनवेळी शिवसेनेतून आलेले बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली गेली आणि ते निवडून आले. अन्यथा लाजही राखता आली नसती. सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, नाना पटोले, चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यासारखे तगडे उमेदवार निवडणुकीत पडतात. याचा काय अर्थ तो समजून घ्यावा. हा आपण थोडक्यात देशातील आणि राज्याचा आढावा घेतला. राज्यात मावळ मतदारसंघाकडे सर्वच राजकीय निरिक्षकांचे लक्ष लागले होते. ते म्हणजे शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या राजकीय कारकीर्दीलाच सुरूंग लागल्याने हा पराभव पवार कुटुंबियांच्या जिव्हारी लागला आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी पार्थ यांचा 2 लाख 17 हजार 763 मताधिक्याने पराभव करून ते `जायंट किलर’ ठरले. बारणे यांचा विजय हा शिवसेनेचा नसून भाजपचा विजय आहे. कारण, त्यांना उमेदवारी देण्यामागे अनेक राजकीय नाट्य घडले आहेत. मात्र, भाजपने मोठा मताधिक्याने हा विजय खेचून आणला.

मावळ लोकसभा मतदारसंघ हा 2009 ला अस्तित्त्वात आला. त्यानंतर 2009 ला गजानन बाबर, 2014-2019 श्रीरंग बारणे यांच्या रूपाने तिसर्यां दा शिवसेनेकडे हा मतदारसंघ राहिला. वास्तविक या मतदारसंघात शिवसेनेचे अस्तित्त्व नसतानादेखील मतदारांनी शिवसेनेला साथ दिली आहे. चिंचवड, मावळ, पनवेल, उरण, कर्जत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अस्तित्त्व नसताना प्रत्येक वेळी शिवसेनेला भाजपची साथ मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानादेखील लोकसभेला प्रत्येक वेळी भाजपच्या पारड्यात अधिक मते मिळाली आहेत. यामागचे कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असणार्याप पदाधिकार्यां नी वेळोवेळी शिवसेनेला साथ दिली आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत पार्थ निवडून आले तर मावळ लोकसभा मतदारसंघात कायमची डोकेदुखी होईल. या भीतीने यावेळेस स्थानिक मंडळींनी बारणे यांना साथ दिली. त्याचाही फटका राष्ट्रवादीला बसला. पिंपरी-चिंचवडच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. तरीदेखील पिंपरी-चिंचवडकरांनी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला नाकारले. विधानसभा निवडणुकीत नाकारले आणि आता लोकसभा निवडणुकीतदेखील त्याची प्रचिती पुन्हा पाहयला मिळाली.

ज्या अनाधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर भाजपने वारंवार राजकारण करून जनतेची मते मिळवली, हा प्रश्न खर्याव अर्थाने सुटला आहे की नाही, हे राष्ट्रवादीला प्रचारात मांडता आले नाही. भाजपच्या महापालिकेतील सत्तेला अडीच वर्ष झाली. या अडीच वर्षांत भाजपच्या अनेक गैरकारभाराची प्रकरणे गाजली. मात्र, त्याचाही फायदा निवडणुकीत राष्ट्रवादीला घेता आला नाही. ज्या राष्ट्रवादीवर ठेकेदारी संदर्भात आरोप झाले त्या आरोपांना राष्ट्रवादीने सक्षम उत्तर दिले नाही. उलट भाजपच्या काळात अनेक ठेकेदार जन्माला आले आहेत आणि आता त्यांची दुकानदारी सुरू आहे. याबाबतीतही राष्ट्रवादी कायम ’बॅकफूट’ला राहिली. मात्र, दत्ता काका साने यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आल्यानंतर त्यांनी भाजपच्या अनेक बाबी जनतेसमोर आणल्या. त्यामुळे कुठे तरी राष्ट्रवादीमध्ये जान आल्यासारखे दिसत असतानाच लोकसभा निवडणूक संपताच काकांना या पदावरून हटविण्याचे षड्यंत्र सुरू झाले आहे. याचा अर्थ येथील मंडळींनाच राष्ट्रवादी आक्रमक नको आहे. याचा गांभीर्याने विचार न केल्यास राष्ट्रवादीची वाताहत अधिक होईल.

महायुतीचे उमेदवार बारणे यांना 7 लाख 18 हजार 950 तर आघाडीचे उमेदवार पार्थ यांना 5 लाख 3 हजार 375 मते पडली. पिंपरी- चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात बारणे यांना 2 लाख 79 हजार 710 तर पार्थ यांना 1 लाख 41 हजार 658 मते मिळाली. बारणे यांना या दोन्ही मतदारसंघात तब्बल 1 लाख 38 हजार 52 मतांचे मताधिक्य मिळाले. मावळ, पनवेल, उरण, कर्जतमध्ये पार्थ यांना 3 लाख 61 हजार 717 मते मिळाली तर बारणे यांना 4 लाख 39 हजार 240 मते मिळाली. या चार मतदारसंघात बारणे यांना 77 हजार 523 मताधिक्य मिळाले. केवळ कर्जतमध्ये पार्थ यांना 1 हजार 849 मताधिक्य मिळाले. या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून 96 हजार 758 मताधिक्य मिळाले. याठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी 400 बूथ तयार करून नियोजन केले होते. येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच हे मताधिक्य मिळाले. मात्र, भाजपमधील असंतुष्ट मंडळी जगताप यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करून भाजपमधील अंतर्गत वाद जाणिवपूर्वक येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करत आहेत. याची चर्चाही भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. या संदर्भातील माहिती खुद्द जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील ही माहिती स्वतंत्ररित्या पक्षश्रेष्ठींकडे पोहोचविल्याचे समजते.

चिंचवड मतदारसंघात भाजपची ताकद आहे हे मान्यच करावे लागेल. मात्र, आजपर्यंत भाजपला या भागातून म्हणावे तितक्या जागा जिंकता आल्या नाहीत. जी मंडळी तक्रार करतात, ते स्वतःही कधी निवडून आले नाहीत अथवा ते निवडून येऊ शकत नाहीत. अशी अवस्था असताना केवळ जगताप यांना चिंचवड विधानसभेची उमेदवारी मिळू नये, यासाठी हा खटाटोप सुरू आहे. केवळ निष्ठावंत म्हणत बसला तर भविष्यात निष्ठाही राहणार नाही आणि सत्ताही राहणार नाही. त्यामुळे भाजपची सत्ता अबाधित ठेवायची असेल तर पक्षांतर्गंत कुरापती बंद करणे हेच हिताचे ठरेल.

मावळमध्ये वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी राजाराम पाटील यांना देण्यामागे पडद्यामागचे मोठे राजकारण आहे. पाटील हे आग्री समाजाचे असल्याने त्यांना घाटाखालची चांगली मते मिळतील. म्हणजेच किमान दिड ते पावणे दोन लाख मते घेतील. मात्र, राष्ट्रवादीचा हा डाव फेल ठरला आणि उरणमध्ये 5112, कर्जत 7941, पनवेल 15926, पिंपरी 17794, मावळ 11731, चिंचवड 17209 अशी एकूण 75 हजार 713 मते मिळाली. येथेच राष्ट्रवादीचे गणित फसले. अजित पवार यांनी घाटाखालील तीन मतदारसंघातून सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक मते मिळविण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी पवारांनी सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांची एक वेगळी फौज घाटाखालील तीन मतदारसंघासाठी तैनात केली होती. शेतकरी कामगार पक्षाने प्रामाणिकपणे काम केले. याचे श्रेय आमदार जयंत पाटील व त्यांच्या सहकार्यांीना जाते. मात्र, प्रत्यक्षात 2 लाख 78 हजार 272 मते मिळाली आणि पनवेलमध्ये मोठा दणका बसला. एकंदरीत पिंपरी विधानसभा मतदार संघात चांगल्या प्रकारे मतदान राष्ट्रवादीला होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, येथील राष्ट्रवादीच्या काही गद्दारांनी वेगळीच कामगिरी केली.

या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना बर्या च गोष्टी शिकवून गेल्या आहेत. नेहमी फाजील आत्मविश्वास ठेवून पिंपरी-चिंचवडमधील सरदारांना त्यांनी मोठे केले. या सरदारांनी पक्ष मोठा केला नाही, कार्यकर्ते मोठे केले नाहीत, स्वतः मात्र मोठे झाले. कार्यकर्त्यांची हेळसांड झाली. सामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीच्या वेळी कामाला लावायचे आणि सत्ता आली की पदापासून दूर ठेवायचे. यामुळेच पक्ष रसातळाला गेला. मात्र, दादांनी याची गंभीर कधीच घेतली नाही. इथले सरदार दादांच्या कानाला लागले की ते दुसर्याी कोणाचे ऐकूनही घेत नव्हते. सगळेच राष्ट्रवादीचे गद्दार आहेत असे नाही तर राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम केले. म्हणून यावेळेस 2014 च्या निवडणुकीपेक्षा अडीच पट अधिक मतदान राष्ट्रवादीला झाले. ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. राजकारणात जय-पराजय होत असतात. पवार घराण्याने हा पहिलाच पराभव पाहिल्यामुळे निश्चितच तो जिव्हारी लागणार. मात्र, यातून सावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवडसह देशात ताकदीने कशी उभी राहिल यासाठी जोमाने कामाला लागावे. हे करत असताना यापूर्वी काँग्रेसबरोबर आघाडी करून जे पाडापाडीचे राजकारण केले त्याचाच हा परिणाम आहे. या अनुभवातून तरी येणार्याक विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाने एकदिलाने काम केल्यास झालेल्या या पराभवातून सावरता येईल. हा राजकारणाचा भाग असला तरी मावळातून बारणे यांनी जी बाजी मारली त्यांचे कौतुक केलेच पाहिजे. आज ते ’जायंट किलर’ ठरले आहेत.”
 

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content