Details
पेरले ते उगवले!
01-Jul-2019
”
योगेश वसंत त्रिवेदी
[email protected]
लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे वेध लागले आहेत. ‘दिवस सुगीचे सुरू जाहले.. याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या सत्ताधारी युतीकडे वळणाऱ्या नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी मंत्री, विद्यमान अध्यक्ष अशा असंख्य लोकांनी भाजप आणि सेना या पक्षांमध्ये आपापल्या जागा सुरक्षित करण्यासाठी प्रारंभ केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात डॉ. सुजय विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, निवेदिता माने, धैर्यशील माने, संजय मंडलिक अशा अनेक नेत्यांनी भाजप आणि सेनेत प्रवेश केला. डॉ. सुजय, रणजितसिंह, धैर्यशील, मंडलिक युतीच्या माध्यमातून संसदेत पोहोचले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर यांनी युतीमध्ये येत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावले. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता भाजप आणि सेना या युतीच्या महत्त्वाच्या घटकपक्षांत येणाऱ्या नेत्यांचा ओघ वाढू लागला.
तसं पाहयला गेलं तर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जेमतेमच होती. सेना नेते प्रमोद नवलकर यांनी जेव्हा मुंबई पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवली तेव्हा त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे एक नेते उभे राहिले आणि त्यांनी असे वातावरण निर्माण केले की बस्स, आता तर नवलकर यांचं डिपॉझिट जप्त होणार. परंतु नवलकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून जी बांधणी केली होती की त्यात राष्ट्रवादीचे ते नेते कुठच्या कुठे अंतःर्धान पावले. नवलकर यांच्या बांधणीचा उपयोग डॉ. दीपक सावंत यांनाही झाला होता. सांगायचं तात्पर्य हे की राष्ट्रवादीचे मुंबईत तेवढे प्राबल्य नव्हते. तरीही सचिन अहिर यांनी मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सांभाळताना राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नेतृत्व्य केले आणि राष्ट्रवादीला जिवंत ठेवण्याचे काम केले होते. या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अहिर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वाने भारावून जात मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. काही दिवसांपूर्वी शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनीही एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी गेले तेव्हा तिथे आमदार दिलीप सोपल आणि बबनदादा शिंदे यांनी चक्क पाठ फिरवली.
दिलीपराव शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या शिवशाही सरकारमध्ये राज्यमंत्री होते. १९९५ साली ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेचे वावडे असण्याचे कारण नाही. तसं कुणालाच कुणाचं वावडं नसतं आणि राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो की कायमचा मित्र नसतो. अर्थात, राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार, विरोध हा केवळ निवडणुकीपुरताच असावा, नंतर सर्वांनी देशासाठी आणि राज्याच्या हितासाठी काम करावे. बबनदादा शिंदे आपल्या मुलासाठी भाजपमध्ये स्थान पक्के करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. काहीही असले तरी आता बबनदादा हातावर घड्याळ बांधून ठेवण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत आणि हेही खरेच आहे की बुडत्या जहाजावर कोण आणि किती काळ राहणार? नाकातोंडात पाणी शिरू लागले की हातपाय मारावेच लागणार आणि आपल्या अस्तित्त्वासाठी झगडावे लागणार.
नारायण राणे यांचे कट्टर समर्थक आणि वडाळ्याचे काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर यांनी भाजपच्या मार्गाने वाटचाल सुरू केली. आपल्या मतदारसंघात पोलीस आणि गिरणी कामगारांच्या समस्या जो सोडवील त्यांना आपले समर्थन राहील, अशी स्पष्ट भूमिका कोळंबकर यांनी घेतली होती. नायगाव वडाळा या भागात कोळंबकर यांचे काम आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९० साली कोळंबकर यांना विधानसभेत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली. तेव्हापासून कोळंबकर सातत्याने या भागात निवडून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांच्यासाठी मेहनत घेतली. त्याची जाणीव शेवाळे यांच्याबरोबरच स्थानिक शिवसैनिकांनी ठेवायला हवी. ‘गरज सरो अन्.. अशी भूमिका योग्य नाही. राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकरराव पिचड यांचे पुत्र वैभव पिचड भाजपच्या वैभवात भर घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. शरद पवार यांच्या राजकारणामुळे अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी संपविण्याचा विडाच जणू राधाकृष्ण विखे पाटील यांनी उचलला आहे.
२०१४ सालीच बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष भाजपच्या समुहात दाखल झाले आहेत. आता मधुकरराव पिचड यांच्या चिरंजीवांच्या माध्यमातून तिथेही राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आलाय. ‘जे पेराल तेच उगवेल!’ ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!’ या केवळ उक्ती वा म्हणी नाहीत तर त्या आपल्याला पदोपदी अनुभवायला मिळतात. आता भाजप आणि सेनामध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढू लागताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते थयथयाट करू लागले आहेत आणि पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांबद्दल पात्रता नसलेलेही आपापल्या प्रतिक्रिया देऊ लागलेत. पण ही सुरूवात कुणी केली? याचे जनक कोण? याचा इतिहास जरा या नेत्यांनी उघडून पाहवा. पायाखालची वाळू घसरू लागली की हे नेते वैफल्यग्रस्त होतात. शरद पवार ज्यांचे मानसपुत्र म्हणवतात त्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी शेतकरी कामगार पक्षातून यशवंतराव मोहिते आणि शंकरराव मोहिते पाटील यांना काँग्रेस पक्षात आणले होते, हे खरे आहे ना? शरद पवार यांनी कितीवेळा काँग्रेस सोडली? १९७८ साली वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपुडे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी वयाच्या सदतीसाव्या वर्षी सर्वात तरूण मुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला तो पक्ष फोडूनच ना?
१९९१ साली छगन भुजबळ यांच्यासह शिवसेनेचे पंधरा आमदार फोडून काँग्रेसमध्ये आणण्याचे कर्तृत्व कुणाचे? ‘करावे तसे भरावे’ लागतेच. मी नाही त्यातली.. असं म्हणून राजकारणात स्वतःला चाणक्य समजणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा. अर्थात, तशी अपेक्षा कुणी बाळगण्याची गरज नाही, कारण ही मंडळी तसं वागण्याइतपत नैतिकता त्यांच्यात असायला हवी ना? राजकारणात कुणी भगवे वस्त्र परिधान करून आलेले नाही. एखादेच योगी आदित्यनाथ किंवा साक्षी महाराज. पण राजकारणात येऊन केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्याऐवजी राजकारणाच्या माध्यमातून सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून देशाची आणि पर्यायाने राज्याची सेवा करणे हेच महत्त्वाचे ठरेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या विधानसभेच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी ‘मी पुन्हा येईन!’ असे सांगताना मी पुन्हा कशासाठी येईन याचे थोडक्यात पण विस्तृत असे जे विधान केले ते लक्षणीय आणि अनुकरणीय असेच आहे. समाजातील तळागाळातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी या सत्तेचा उपयोग सत्ताधाऱ्यांनी करावा. सर्वांना अच्छे दिन दाखविण्यासाठी ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूत्र अंमलात आणावे, हेच महत्त्वाचे. पक्षांतरावरून नाकं मुरडणाऱ्यांनी जरा आपल्या अंतःर्मनात डोकावून पाहवे आणि मग वायफळ बडबड करावी. भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि संयुक्त महाराष्ट्र १ मे १९६० साली अस्तित्त्वात आला तेव्हापासून वर्षांनुवर्षे सत्ता भोगणाऱ्या/उपभोगणाऱ्यांना आता सत्तेत आलो तर ७५% नोकऱ्या स्थानिकांना देण्याची घोषणा करावी लागते. मग, आतापर्यंत काय केलंत? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना करून मराठी माणसाचा आवाज बुलंद केला आणि सुधीर जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ स्थापन करून पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये ऐंशी टक्के स्थानिक मराठी माणसाला नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठीचे शिवधनुष्य उचलले. तेव्हा संकुचित आणि जातीयवादी असा शिक्का मारायला कमी केले नाही.
राहुल गांधी यांच्यापासून तर अजित पवार यांच्यापर्यंत वर्षानुवर्षे सत्ता भोगलेल्या/उपभोगलेल्या नेत्यांना सत्ता हातातून जाताच शेतकरी आठवू लागले, कामगार आठवू लागले, महिलांवरील अत्याचार आठवू लागले, अल्पसंख्याक समाजाची जाणीव होऊ लागली, मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाची प्रकर्षांने आठवण झाली. पाण्यातून काढलेला मासा जसा तडफडतो, तशी या माजी सत्ताधाऱ्यांची अवस्था झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याची केलेली घोषणा सुशीलकुमार शिंदे यांनी उचलली आणि सत्तेवर येताच पहिले तीन महिने मोफत वीज दिलेल्यांना भरमसाट बिले पाठवून सामान्यांचे कंबरडे मोडले. आता अजितदादांना ७५% स्थानिकांना नोकऱ्या आठवल्या आहेत. पण राज्यातली जनता सूज्ञ आहे. “लबाडाघरचं आवतण जेवल्यावर खरं!” हे पक्के लक्षात आहे. आजमितीला भाजप आणि शिवसेना युतीमध्ये ‘इनकमिंग’ जोरात तर काँग्रेस आघाडी मध्ये घबराट, अशी परिस्थिती आहे. जे पेरले तेच उगवले, हे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्के ध्यानी ठेवावे.”
“योगेश वसंत त्रिवेदी