HomeArchiveदादा आतातरी बेरजेचे...

दादा आतातरी बेरजेचे राजकारण करा!

Details
दादा आतातरी बेरजेचे राजकारण करा!

    26-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
विजय भोसले
मुंबई ब्युरो चीफ, केसरी  
 
 
 
पिंपरी-चिंचवड शहर हे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता. मात्र, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये पदार्पण झाले. त्यांनी तोडफोडीचे राजकारण करून काँग्रेस पूर्णतः शहरातून संपविण्याचा प्रयत्न केला. पवारांचे या तोडफोडीच्या राजकारणामुळेच राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील आमदारांना पक्षात प्रवेश देऊन पक्ष खिळखिळा केला. सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण या भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना मातब्बर नेत्यांना फोडून राष्ट्रवादीकडे तगडे उमेदवार ठेवले नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी नवख्या उमेदवारांना उमेदवारी देण्याशिवाय पर्याय उरला नाही. पुण्यामध्येदेखील राष्ट्रवादीने खेळी खेळून काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न केला. पुण्यात येणार्याप विधानसभा निवडणुकीत तीन जागा देण्याचे राष्ट्रवादीने ठरविले आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार आहे. काँग्रेसला एकही मतदारसंघ न देण्याचे अजित पवार यांनी ठरविले आहे. आज काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था दयनीय असताना, एखादा मतदारसंघ काँग्रेसला देणे अपेक्षित असताना पवार यांनी स्वतःच येथील निर्णय जाहीर करून टाकला आहे. हा निर्णय धोकादायक आहे.
 
 
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले अॅड . गौतम चाबुकस्वार निवडून आले. त्यावेळी त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने तिन्ही मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ काँग्रेसला दिला नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे काम करतील की नाही सांगता येत नाही. त्यामुळे पुन्हा २०१४ची पुनरावृत्ती होऊ शकते. शिवाय या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवार उभा झाल्यास निश्चित राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. त्यामुळे अजितदादांनी आतातरी बेरजेचे राजकारण करून जातीयवादी पक्षाला दूर कसे ठेवता येईल, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. अन्यथा पुन्हा राज्यात भाजप-सेनेशिवाय पर्याय उरणार नाही हे निश्चित.
 
 
राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवडचा विकास केला हे मान्यच करावे लागेल. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मोलाचे सहकार्य आहे. केंद्रातून मिळणारा विकासनिधी सर्वाधिक पिंपरी-चिंचवडला मिळवून देण्याचे काम पवारसाहेबांनी केले. या शहराचा नावलौकिक देशात नव्हे तर जगभर होता. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली आणि पिंपरी-चिंचवड स्वच्छतेमध्ये ५४व्या क्रमाकांवर गेले. भाजपला पिंपरी-चिंचवडची सत्ता मिळणे एक दिवास्वप्न होते. मात्र, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये बहुमतात सत्ता आली. सत्ता मिळाली. मात्र, गेल्या पाच वर्षांत भाजपला अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, संपूर्ण शास्तीकर माफी, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, रेडझोन, प्राधिकरण बाधित शेतकर्यांाना साडेबारा टक्के परतावा देणे आदी महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यात पूर्णतः अपयश आले. केवळ जाहिराती, फलकबाजी करून जनतेला मूर्ख बनविण्याचे काम सरकार करत आहे. ही सरकारची बाजू फसवी असली तरी त्यास सडेतोड उत्तर देणे राष्ट्रवादीचे काम आहे. मात्र, राष्ट्रवादीतीलच काही मंडळी भाजपच्या दावणीला बांधली गेल्यामुळे आक्रमक भूमिका घेणार कोण? लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी आपले चिरंजीव पार्थला उभे केले असता स्थानिक मंडळींनी ठरवून त्यांना पाडले. ज्या पवारांनी स्थानिक मंडळींना भरभरून पदे दिली, कोट्यधीश केले, त्यांनीच पवारांना आसमान दाखविले. तरीदेखील दादा यातून बोध घेत नाहीत. अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांनी पदापासून दूर ठेवले. ते मात्र आजही पक्षाशी प्रामाणिक आहेत. त्यांना कधी न्याय मिळणार? 
 
 
भाजपविरोधात आवाज उठविण्याची राष्ट्रवादीला मोठी संधी आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला बरोबर घेऊन आंदोलन केली तर दोन्ही पक्षाची ताकद वाढू शकते. महापालिकेत दत्ता साने विरोधी पक्षनेते असताना गेले वर्षभर त्यांनी अनेक प्रश्नांवर भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून पक्ष जिवंत असल्याचे दाखवले. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमधील चांडाळ चौकडीने साने यांना पदावरून पायऊतार होण्यास भाग पाडले. त्यांच्या जागी विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीनंतर मात्र महापालिकेत राष्ट्रवादी आहे की नाही अशी अवस्था झाली आहे. सध्या अनेक विषय महापालिकेत गाजत असताना त्यावर राष्ट्रवादी ब्रदेखील काढत नाही. स्थायी समितीतील राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी मध्यंतरी नाटक केले. मात्र, स्थायी समिती अध्यक्षांनी कठोर भूमिका घेतल्यामुळे या मंडळींनी पुन्हा यु टर्न घेऊन स्थायी समितीमध्ये मनोमीलन केले. आज राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे मोठे ठेके असल्यामुळेदेखील ते भाजपच्या विरोधात ब्र काढायला तयार नाहीत. त्यामुळे काटे विरोधी पक्षनेते झाले असले तरी ते फक्त नावाला विरोधी पक्षनेते आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 

 
 
 
भाजपने राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठवून राष्ट्रवादीला पुरेपूर बदनाम करून सत्ता मिळविली. भाजपच्या तीन वर्षांच्या कालखंडात महापालिकेतील अनेक निर्णय संशयास्पद व महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारे आहेत. भाजपच्या अनेक नगरसेवकांनी आपल्या जवळचे नातेवाईक, मित्रमंडळीच्या नावावर कोट्यवधी रूपयांचे ठेके घेऊन जोरदार दुकानदारी सुरू केली आहे. मात्र, याविरूद्ध आवाज उठवायला राष्ट्रवादी तयार नाही. आपले हितसंबंध जोपासण्यासाठी ते धाडस करत नाहीत. म्हणूनच भाजपचे फावले आहे. स्मार्ट सिटीमध्ये आयुक्तांना अधिकार दिल्यामुळे एकाधिकारशाही आली आहे. आतापर्यंत शेकडो कोटी खर्च केले आहेत. प्रत्यक्षात मात्र काम दिसत नाही. कारण, आयुक्तांनी बरोबर काही गोष्टी साध्य केल्या आहेत. मारूती भापकरसारखा सामान्य कार्यकर्ता याविरूद्ध आवाज उठवून लढत आहे. मात्र, ही लढत या शक्तींना रोखू शकणार नाही. कारण, अशा शक्ती आंदोलन, अथवा न्यायालयाची भाषाच समजू शकते. आंदोलनदेखील जनआंदोलन असले पाहिजे. १०-२० कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलन टिकू शकत नाही. म्हणून शहरातील सूज्ञ नागरिकांनी अशा आंदोलनात सहभागी होऊन चुकीच्या कामांना विरोध दर्शविला पाहिजे.
 
देशात औद्योगिक मंदी मोठ्या प्रमाणात आली आहे. केंद्र सरकार ही मंदी असतानादेखील खोटी आकडेवारी देऊन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. देशाचा आर्थिक विकासदर खाली आला आहे. नवीन उद्योजक देशातच यायला तयार नाहीत. मात्र, राजकीय सभांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणा भिमा थाटात कारखाने वाढले, रोजगार वाढले, असे सांगत आहेत. ही शुद्ध फसवणूक आहे. इंधनाच्या किंमती भरमसाठ वाढत असताना महागाई वाढत राहणार. रोजगार नसल्यामुळे अवैध धंद्यांची वाढ होऊन तरूण वर्ग भरकटला जाणार. केवळ काश्मीरमधील ३७० व ३५ अ कलमाचा वापर निवडणुकीत करून जनतेला भावनिक बनविण्याचा उद्योग भाजप करत आहे. त्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेसमोर सत्य आणून जनतेला जागरूक करून या सरकारच्या विरोधात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.
 
 
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघातील आघाडी धर्म पाळायचा असेल तर एखादा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा. त्या मतदारसंघातील उमेदवाराचे प्रामाणिकपणाने काम केल्यास आघाडी धर्म पाळला हे सिध्द होईल. राष्ट्रवादीतील काही गद्दारांना आवरण्याची हीच वेळ आहे. प्रत्येक वेळी हे काय करतील ते काय करतील याचा विचार करत बसला तर उरले-सुरले राष्ट्रवादीही शिल्लक राहणार नाही.
 
 
राष्ट्रवादीचे प्रामाणिक कार्यकर्त्यांना ताकद देण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेस संपविण्याला राष्ट्रवादी जितकी जबाबदार आहे, त्यापेक्षाही काँग्रेसमधील वरिष्ठ नेते तितकेच जबाबदार आहेत. काँग्रेस संपुष्टात आली असली तरी या शहरातील आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. झोपडपट्टी व चाळीत राहणारा वर्ग काँग्रेसच्या पाठीशी आहे. मात्र, उमेदवारच उभे करायचे नाहीत आणि राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाऊन काँग्रेसला काँग्रेसनेच संपविली. आजपर्यंत या शहरात काँग्रेसचे नेतृत्त्व बाहेरच्या मंडळींनी केल्यामुळे त्यांना या शहराबद्दल आत्मियता आणि कार्यकर्त्यांबद्दल प्रेम काय राहणार, पूर्वी अण्णासाहेब मगर, शंकरराव बाजीराव पाटील, रामकृष्ण मोरे या तिन्ही नेत्यांना स्थानिक कार्यकर्त्यांबद्दल आस्था व प्रेम होते. मात्र, गेल्या काही वर्षांत राजकारणात बलाढ्य आणि कोट्यधीशांनी प्रवेश केल्यामुळे कार्यकर्ता आणि नेता यांच्यात दरी वाढत गेली. त्यामुळे कार्यकर्ता काँग्रेसच्या विचारधारेपासून दूर जाऊ लागला. आज शहरात काँग्रेसचे मोजके नेते आहेत. त्यातील काही जण भाजप, सेना, राष्ट्रवादींच्या वळचणीला जाऊन बसतात. त्यामुळे पक्ष वाढत नाही. ही बाबदेखील पक्षसंघटनेच्या दृष्टीने गंभीर आहे.
 
 
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेनेने पोखरून काढले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उणीधुणी बाजूला ठेवून प्रामाणिक कार्यकर्त्याला ताकद देऊन येणारी विधानसभा निवडणूक मित्र पक्षांना बरोबर घेऊन योग्य जागावाटप केल्यास आणि प्रचारयंत्रणेत भाजप-सेनेची युतीकडून होत असलेली फसवणूक जनतेसमोर मांडल्यास निश्चित परिस्थिती सुधारू शकते. राष्ट्रवादीने यापूर्वी केलेले स्वार्थी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्र बळकट करावा ही अपेक्षा.”
 
 

 

 
विजय भोसले
“मुंबई ब्युरो चीफ, केसरी  ”
 
 
 

“पिंपरी-चिंचवड शहर हे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता. मात्र, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये पदार्पण झाले. त्यांनी तोडफोडीचे राजकारण करून काँग्रेस पूर्णतः शहरातून संपविण्याचा प्रयत्न केला. पवारांचे या तोडफोडीच्या राजकारणामुळेच राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील आमदारांना पक्षात प्रवेश देऊन पक्ष खिळखिळा केला. सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण या भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना मातब्बर नेत्यांना फोडून राष्ट्रवादीकडे तगडे उमेदवार ठेवले नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी नवख्या उमेदवारांना उमेदवारी देण्याशिवाय पर्याय उरला नाही. पुण्यामध्येदेखील राष्ट्रवादीने खेळी खेळून काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न केला. पुण्यात येणार्याप विधानसभा निवडणुकीत तीन जागा देण्याचे राष्ट्रवादीने ठरविले आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार आहे. काँग्रेसला एकही मतदारसंघ न देण्याचे अजित पवार यांनी ठरविले आहे. आज काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था दयनीय असताना, एखादा मतदारसंघ काँग्रेसला देणे अपेक्षित असताना पवार यांनी स्वतःच येथील निर्णय जाहीर करून टाकला आहे. हा निर्णय धोकादायक आहे.”
 
 
“गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले अॅड . गौतम चाबुकस्वार निवडून आले. त्यावेळी त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने तिन्ही मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ काँग्रेसला दिला नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे काम करतील की नाही सांगता येत नाही. त्यामुळे पुन्हा २०१४ची पुनरावृत्ती होऊ शकते. शिवाय या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवार उभा झाल्यास निश्चित राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. त्यामुळे अजितदादांनी आतातरी बेरजेचे राजकारण करून जातीयवादी पक्षाला दूर कसे ठेवता येईल, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. अन्यथा पुन्हा राज्यात भाजप-सेनेशिवाय पर्याय उरणार नाही हे निश्चित.”
 
 
“राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवडचा विकास केला हे मान्यच करावे लागेल. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मोलाचे सहकार्य आहे. केंद्रातून मिळणारा विकासनिधी सर्वाधिक पिंपरी-चिंचवडला मिळवून देण्याचे काम पवारसाहेबांनी केले. या शहराचा नावलौकिक देशात नव्हे तर जगभर होता. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली आणि पिंपरी-चिंचवड स्वच्छतेमध्ये ५४व्या क्रमाकांवर गेले. भाजपला पिंपरी-चिंचवडची सत्ता मिळणे एक दिवास्वप्न होते. मात्र, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये बहुमतात सत्ता आली. सत्ता मिळाली. मात्र, गेल्या पाच वर्षांत भाजपला अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, संपूर्ण शास्तीकर माफी, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, रेडझोन, प्राधिकरण बाधित शेतकर्यांाना साडेबारा टक्के परतावा देणे आदी महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यात पूर्णतः अपयश आले. केवळ जाहिराती, फलकबाजी करून जनतेला मूर्ख बनविण्याचे काम सरकार करत आहे. ही सरकारची बाजू फसवी असली तरी त्यास सडेतोड उत्तर देणे राष्ट्रवादीचे काम आहे. मात्र, राष्ट्रवादीतीलच काही मंडळी भाजपच्या दावणीला बांधली गेल्यामुळे आक्रमक भूमिका घेणार कोण? लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी आपले चिरंजीव पार्थला उभे केले असता स्थानिक मंडळींनी ठरवून त्यांना पाडले. ज्या पवारांनी स्थानिक मंडळींना भरभरून पदे दिली, कोट्यधीश केले, त्यांनीच पवारांना आसमान दाखविले. तरीदेखील दादा यातून बोध घेत नाहीत. अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांनी पदापासून दूर ठेवले. ते मात्र आजही पक्षाशी प्रामाणिक आहेत. त्यांना कधी न्याय मिळणार? ”
 
 
“भाजपविरोधात आवाज उठविण्याची राष्ट्रवादीला मोठी संधी आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला बरोबर घेऊन आंदोलन केली तर दोन्ही पक्षाची ताकद वाढू शकते. महापालिकेत दत्ता साने विरोधी पक्षनेते असताना गेले वर्षभर त्यांनी अनेक प्रश्नांवर भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून पक्ष जिवंत असल्याचे दाखवले. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमधील चांडाळ चौकडीने साने यांना पदावरून पायऊतार होण्यास भाग पाडले. त्यांच्या जागी विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीनंतर मात्र महापालिकेत राष्ट्रवादी आहे की नाही अशी अवस्था झाली आहे. सध्या अनेक विषय महापालिकेत गाजत असताना त्यावर राष्ट्रवादी ब्रदेखील काढत नाही. स्थायी समितीतील राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी मध्यंतरी नाटक केले. मात्र, स्थायी समिती अध्यक्षांनी कठोर भूमिका घेतल्यामुळे या मंडळींनी पुन्हा यु टर्न घेऊन स्थायी समितीमध्ये मनोमीलन केले. आज राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे मोठे ठेके असल्यामुळेदेखील ते भाजपच्या विरोधात ब्र काढायला तयार नाहीत. त्यामुळे काटे विरोधी पक्षनेते झाले असले तरी ते फक्त नावाला विरोधी पक्षनेते आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.”
 
 

 
 
 
“भाजपने राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठवून राष्ट्रवादीला पुरेपूर बदनाम करून सत्ता मिळविली. भाजपच्या तीन वर्षांच्या कालखंडात महापालिकेतील अनेक निर्णय संशयास्पद व महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारे आहेत. भाजपच्या अनेक नगरसेवकांनी आपल्या जवळचे नातेवाईक, मित्रमंडळीच्या नावावर कोट्यवधी रूपयांचे ठेके घेऊन जोरदार दुकानदारी सुरू केली आहे. मात्र, याविरूद्ध आवाज उठवायला राष्ट्रवादी तयार नाही. आपले हितसंबंध जोपासण्यासाठी ते धाडस करत नाहीत. म्हणूनच भाजपचे फावले आहे. स्मार्ट सिटीमध्ये आयुक्तांना अधिकार दिल्यामुळे एकाधिकारशाही आली आहे. आतापर्यंत शेकडो कोटी खर्च केले आहेत. प्रत्यक्षात मात्र काम दिसत नाही. कारण, आयुक्तांनी बरोबर काही गोष्टी साध्य केल्या आहेत. मारूती भापकरसारखा सामान्य कार्यकर्ता याविरूद्ध आवाज उठवून लढत आहे. मात्र, ही लढत या शक्तींना रोखू शकणार नाही. कारण, अशा शक्ती आंदोलन, अथवा न्यायालयाची भाषाच समजू शकते. आंदोलनदेखील जनआंदोलन असले पाहिजे. १०-२० कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलन टिकू शकत नाही. म्हणून शहरातील सूज्ञ नागरिकांनी अशा आंदोलनात सहभागी होऊन चुकीच्या कामांना विरोध दर्शविला पाहिजे.”
 

“देशात औद्योगिक मंदी मोठ्या प्रमाणात आली आहे. केंद्र सरकार ही मंदी असतानादेखील खोटी आकडेवारी देऊन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. देशाचा आर्थिक विकासदर खाली आला आहे. नवीन उद्योजक देशातच यायला तयार नाहीत. मात्र, राजकीय सभांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणा भिमा थाटात कारखाने वाढले, रोजगार वाढले, असे सांगत आहेत. ही शुद्ध फसवणूक आहे. इंधनाच्या किंमती भरमसाठ वाढत असताना महागाई वाढत राहणार. रोजगार नसल्यामुळे अवैध धंद्यांची वाढ होऊन तरूण वर्ग भरकटला जाणार. केवळ काश्मीरमधील ३७० व ३५ अ कलमाचा वापर निवडणुकीत करून जनतेला भावनिक बनविण्याचा उद्योग भाजप करत आहे. त्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेसमोर सत्य आणून जनतेला जागरूक करून या सरकारच्या विरोधात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.”
 
 
“पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघातील आघाडी धर्म पाळायचा असेल तर एखादा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा. त्या मतदारसंघातील उमेदवाराचे प्रामाणिकपणाने काम केल्यास आघाडी धर्म पाळला हे सिध्द होईल. राष्ट्रवादीतील काही गद्दारांना आवरण्याची हीच वेळ आहे. प्रत्येक वेळी हे काय करतील ते काय करतील याचा विचार करत बसला तर उरले-सुरले राष्ट्रवादीही शिल्लक राहणार नाही.”
 
 
“राष्ट्रवादीचे प्रामाणिक कार्यकर्त्यांना ताकद देण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेस संपविण्याला राष्ट्रवादी जितकी जबाबदार आहे, त्यापेक्षाही काँग्रेसमधील वरिष्ठ नेते तितकेच जबाबदार आहेत. काँग्रेस संपुष्टात आली असली तरी या शहरातील आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. झोपडपट्टी व चाळीत राहणारा वर्ग काँग्रेसच्या पाठीशी आहे. मात्र, उमेदवारच उभे करायचे नाहीत आणि राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाऊन काँग्रेसला काँग्रेसनेच संपविली. आजपर्यंत या शहरात काँग्रेसचे नेतृत्त्व बाहेरच्या मंडळींनी केल्यामुळे त्यांना या शहराबद्दल आत्मियता आणि कार्यकर्त्यांबद्दल प्रेम काय राहणार, पूर्वी अण्णासाहेब मगर, शंकरराव बाजीराव पाटील, रामकृष्ण मोरे या तिन्ही नेत्यांना स्थानिक कार्यकर्त्यांबद्दल आस्था व प्रेम होते. मात्र, गेल्या काही वर्षांत राजकारणात बलाढ्य आणि कोट्यधीशांनी प्रवेश केल्यामुळे कार्यकर्ता आणि नेता यांच्यात दरी वाढत गेली. त्यामुळे कार्यकर्ता काँग्रेसच्या विचारधारेपासून दूर जाऊ लागला. आज शहरात काँग्रेसचे मोजके नेते आहेत. त्यातील काही जण भाजप, सेना, राष्ट्रवादींच्या वळचणीला जाऊन बसतात. त्यामुळे पक्ष वाढत नाही. ही बाबदेखील पक्षसंघटनेच्या दृष्टीने गंभीर आहे.”
 
 
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेनेने पोखरून काढले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उणीधुणी बाजूला ठेवून प्रामाणिक कार्यकर्त्याला ताकद देऊन येणारी विधानसभा निवडणूक मित्र पक्षांना बरोबर घेऊन योग्य जागावाटप केल्यास आणि प्रचारयंत्रणेत भाजप-सेनेची युतीकडून होत असलेली फसवणूक जनतेसमोर मांडल्यास निश्चित परिस्थिती सुधारू शकते. राष्ट्रवादीने यापूर्वी केलेले स्वार्थी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्र बळकट करावा ही अपेक्षा.

पिंपरी-चिंचवडमाजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारअॅड . गौतम चाबुकस्वारमहाराष्ट्र

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content