HomeArchiveदादर माटुंगा सांस्कृतिक...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात रंगला `साहित्यरंग’ महोत्सव गदिमा, पुलं आणि बाबूजींच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली

Details
“दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात रंगला `साहित्यरंग’ महोत्सव गदिमा, पुलं आणि बाबूजींच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

ग. दि. माडगुळकर, पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके या दिग्गजांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्त्वावर प्रकाशझोत टाकून त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्टच्या सहकार्याने साहित्यरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास डॉ. वसंत पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून तर ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर अध्यक्षस्थानी होते. दोघांनी गदिमा आणि सुधीर फडके यांच्याविषयीचे अनुभव कथन केले. तत्पूर्वी संस्थेचे कार्याध्यक्ष सुरेश खरे यांनी आजपर्यंत संस्थेने आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या साहित्यरंग महोत्सवाचा तपशील रसिकांसमोर ठेवून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

दुसरे सत्र होते स्मरणरंजनाचे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, सुधीर फडके यांचे चिरंजीव व संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके आणि प्रख्यात अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांची मुलाखत घेतली सुधीर गाडगीळ यांनी. यावेळी राजदत्त यांनी गदिमाविषयींच्या आठवणी मोकळेपणाने व्यक्त केल्या. त्या प्रात्याक्षिकांसह श्रीधर फडके यांनी रसिकांसमोर सादर केल्या

तर वार्‍यावरती वरात रंगमंचावर आणण्यासाठी तालमीसाठी घेतलेली मेहनत आशालताबाईंनी विस्ताराने सांगितली. त्यामधली त्यांची कडवेकर मामींची भूमिकाही त्यांनी करून दाखविली. त्यामुळे कार्यक्रम अधिक रंगला. साहित्यिक गुणगौरव या सोहळ्यात गदिमा, पुलं आणि बाबूजी या कलाकार साहित्यिकांच्या साहित्याचा परामर्श वक्त्या प्रा. मीना गोखले यांनी घेतला. रसिकांना अपरिचित असलेली गदिमांची काव्यसंपदा आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून त्यांनी नेटकेपणाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचविली. नंतरच्या सत्रात स्मृतिशलाकातून या दिग्गजांच्या चित्रपट कारकीर्दीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान सतीश जोशी यांनी दृकश्राव्य माध्यमातून सादर केले.

साहित्य रंग महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालिका स्वाती काळे प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी गदिमा, पुलं आणि सुधीर फडके यांच्या कलागुणांवर टिपण्णी करून रसिकांची दाद मिळविली. सुरेश खरे यांनी या साहित्यरंग महोत्सवात सहभाग देणार्‍यां चे आभार व्यक्त केले. गीतवैभव कार्यक्रमात माधव भागवत व सुचित्रा भागवत यांनी तिन्ही मान्यवरांचा स्वरविलास आविष्कार सादर केला. त्याचे सूत्रसंचालन नीला लिमये यांनी केले.”
 
“ग. दि. माडगुळकर, पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके या दिग्गजांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्त्वावर प्रकाशझोत टाकून त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्टच्या सहकार्याने साहित्यरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास डॉ. वसंत पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून तर ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर अध्यक्षस्थानी होते. दोघांनी गदिमा आणि सुधीर फडके यांच्याविषयीचे अनुभव कथन केले. तत्पूर्वी संस्थेचे कार्याध्यक्ष सुरेश खरे यांनी आजपर्यंत संस्थेने आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या साहित्यरंग महोत्सवाचा तपशील रसिकांसमोर ठेवून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

दुसरे सत्र होते स्मरणरंजनाचे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, सुधीर फडके यांचे चिरंजीव व संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके आणि प्रख्यात अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांची मुलाखत घेतली सुधीर गाडगीळ यांनी. यावेळी राजदत्त यांनी गदिमाविषयींच्या आठवणी मोकळेपणाने व्यक्त केल्या. त्या प्रात्याक्षिकांसह श्रीधर फडके यांनी रसिकांसमोर सादर केल्या

तर वार्‍यावरती वरात रंगमंचावर आणण्यासाठी तालमीसाठी घेतलेली मेहनत आशालताबाईंनी विस्ताराने सांगितली. त्यामधली त्यांची कडवेकर मामींची भूमिकाही त्यांनी करून दाखविली. त्यामुळे कार्यक्रम अधिक रंगला. साहित्यिक गुणगौरव या सोहळ्यात गदिमा, पुलं आणि बाबूजी या कलाकार साहित्यिकांच्या साहित्याचा परामर्श वक्त्या प्रा. मीना गोखले यांनी घेतला. रसिकांना अपरिचित असलेली गदिमांची काव्यसंपदा आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून त्यांनी नेटकेपणाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचविली. नंतरच्या सत्रात स्मृतिशलाकातून या दिग्गजांच्या चित्रपट कारकीर्दीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान सतीश जोशी यांनी दृकश्राव्य माध्यमातून सादर केले.

साहित्य रंग महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालिका स्वाती काळे प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी गदिमा, पुलं आणि सुधीर फडके यांच्या कलागुणांवर टिपण्णी करून रसिकांची दाद मिळविली. सुरेश खरे यांनी या साहित्यरंग महोत्सवात सहभाग देणार्‍यां चे आभार व्यक्त केले. गीतवैभव कार्यक्रमात माधव भागवत व सुचित्रा भागवत यांनी तिन्ही मान्यवरांचा स्वरविलास आविष्कार सादर केला. त्याचे सूत्रसंचालन नीला लिमये यांनी केले.”
 
Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content