HomeArchiveडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाहीसाठी मतदान करा – राहुल शेवाळे

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी रविवारी बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. शेवाळे यांचाही रविवारी जन्मदिन असल्याने रामदास आठवले यांनी राहुल शेवाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शाल दिली तर राहुल शेवाळेंनी वाढदिवसाचं निमित्त साधत रामदास आठवलेंचा मुलगा जीत आणि इतर विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचं ‘रूपयाचा प्रश्न’ हे पुस्तक वाटलं. “विद्यार्थी दशेतच जर बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांना समजले तर ते सक्षम भारतीय नागरिक बनतील. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आणण्यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान करायला हवे” असे आवाहनही शेवाळे यांनी यावेळी केले. यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रचारादरम्यान साजरा केला वाढदिवस

दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना रविवारी प्राचारादरम्यान नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सुखद धक्का दिला. प्रचारादरम्यानच नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जागोजागी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जनतेने दिलेल्या या सुखद धक्क्याने ते भारावले. 14 एप्रिल या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी, राहुल शेवाळे यांचाही वाढदिवस असतो. मात्र, लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना वाढदिवस साजरा करण्यापेक्षा प्रचाराला वेळ देणे त्यांनी पसंत केले. सकाळी 9 च्या दरम्यान देवनार परिसरात प्रचारफेरीला सुरूवात झाली. मात्र मध्येच प्रचारफेरीत काही नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत केक कापून शेवाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अशाच रीतीने सुमारे 5 ते 6 ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content