HomeArchiveचव्हाणचरणी चोरलेले चित्र?

चव्हाणचरणी चोरलेले चित्र?

Details
चव्हाणचरणी चोरलेले चित्र?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सभ्य, सुसंस्कृत आणि दूरदृष्टी असलेले व्यासंगी राजकारणी होते. त्यांनी 25 वर्षांनंतरचा महाराष्ट्र पाहिला. तो महाराष्ट्र नजरेसमोर ठेवून त्यांनी या राज्याची जडणघडण केली. त्यांचे मानसपुत्र शरद पवार हेदेखील आपल्या गुरूप्रमाणेच सभ्यता आणि सुसंस्कृतपणाच्या बाबतीत विख्यात आहेत. चव्हाणसाहेबांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटरचे ते अध्यक्ष आहेत. मात्र यशवंतरावजींचे हे स्मारक आता एका अप्रिय वादात अडकले आहे. विख्यात चित्रकार पद्मश्री एम. आर. आचरेकर यांच्या एका अमूल्य तैलचित्रावरून हा वाद निर्माण झाला आहे. 30 एप्रिल व 1 मे, 1960 या दरम्यान मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळी आचरेकरांनी काढलेले एक तैलचित्र चव्हाण सेंटरमध्ये लावण्यात आले आहे. हे तैलचित्र सेंटरला कोणी दिले हे सेंटरमधील पदाधिकारीदेखील सांगू शकत नाहीत. पण हे अमूल्य तैलचित्र आपल्या मालकीचे असून ते आपल्याला परत मिळावे असा तगादा आचरेकर यांच्या वारसदारांनी लावला आहे.

आचरेकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनिल अनेक वर्षे या तैलचित्रासाठी भांडत होते. 2018 साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू नितीन (68) हे आता या तैलचित्रासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 1988 साली विधिमंडळात संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनासाठी विधिमंडळाने हे तैलचित्र आचरेकर कुटुंबियांकडून काही दिवसांसाठी मागून घेतले. त्यानंतर बरेच प्रयत्न करूनही ते त्यांना परत मिळाले नाही. आता ते यशवंतराव चव्हाण सेंटरची शान बनले आहे.

या तैलचित्राच्या मालकीचा वाद तूर्त बाजूला ठेवूया. या संदर्भातील वस्तुस्थितीकडे पाहूया. आचरेकर हे फार मोठे कलाकार होते. ते यशस्वी कला-दिग्दर्शकदेखील होते. सर्वोत्तम कला दिग्दर्शनासाठी त्यांच्या परदेसी, कागज के फूल आणि जिस देश में गंगा बहती है, या चित्रपटांना प्रतिष्ठेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. `आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि सिने आर्ट डायरेक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थांचे अध्यक्ष म्हणून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या त्या ऐतिहासिक सोहळ्यास मध्यरात्री आचरेकर उपस्थित होते. त्यांच्या कुंचल्यातून त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे हे तैलचित्र साकार झाले. अशाप्रकारचे ते एकमेव तैलचित्र असावे. म्हणूनच ते अमूल्य आहे. आता आचरेकर कुटुंबियांनी या तैलचित्रावर मालकी हक्क सांगून एक अप्रिय वाद निर्माण केला आहे. पण वस्तुस्थिती काय आहे हेदेखील पाहयला हवे.

जागतिक कीर्तीचे चित्रकार वासुदेव गायतोंडेचे शिष्य मनोहर म्हात्रे यांनी आम्हाला सांगितले की, `आचरेकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या सूनबाई अभिनेत्री भारती आचरेकर यांनी त्यांची अनेक मौल्यवान तैलचित्रे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला दिली. 1980 च्या दशकाच्या प्रारंभी नवे विधानभवन निर्माण झाले. त्यावेळी जे.जे.च्या तत्कालीन डीन यांनी आचरेकरांची तैलचित्रे विधानभवनाला दिली. वादात सापडलेले तैलचित्र हे त्यापैकीच एक आहे. आज वाय. एस. गायतोंडे, एम. आर. आचरेकर या थोर कलाकारांच्या तैलचित्रांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एकेका तैलचित्राची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. म्हणूनच या तैलचित्रांचा फुकटात ताबा मिळविण्यासाठी आता लोकांची धडपड सुरू असल्याचे दिसते. ज्याअर्थी विधानभवनातील आचरेकरांचे तैलचित्र चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले, त्याअर्थी ते कोणीतरी तेथे नेऊन दिले. तथापि, ते कोणी आणि कधी दिले, याची चव्हाण सेंटरमध्येदेखील नोंद नाही. यावरून हे तैलचित्र म्हणजे `चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला’ असा प्रकार घडला आहे. चव्हाण चरणी चोरलेले चित्र वाहिले गेले आहे (?)

ते काहीही असो. चव्हाण सेंटरने सदर तैलचित्र जतन केल्यामुळेच आज ते टिकून आहे. खेदजनक गोष्ट अशी की, आचरेकर, गायतोंडे यांच्यासारख्या महान कलाकारांची अनेक तैलचित्रे काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. त्यांच्या कुटुंबियांची उदासीनतादेखील त्यास कारणीभूत ठरली आहे. आज आचरेकर कुटूंबीय जर त्या अमूल्य तैलचित्रावर दावा सांगत असेल तर तो निखालास खोटा आहे. सदर तैलचित्र जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सने विधिमंडळाला दिले होते. ते चव्हाण सेंटरने जपून ठेवले याबद्दल या संस्थेचे मन:पूर्वक आभार आणि अभिनंदन! या वादावर येथेच पडदा टाकला जावा, हे उत्तम!

फोटो कॅप्शन : 1988 साली विधान भवनात भरलेल्या प्रदर्शनात झळकलेले पद्मश्री एम. आर. आचरेकर यांचे संयुक्त महाराष्ट्र निर्मिती सोहळ्याचे हेच ते ऐतिहासिक तैलचित्र.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content