HomeArchive‘ग्लोबल पॅगोडा’ ५...

‘ग्लोबल पॅगोडा’ ५ ते ७ डिसेंबर बंद!

Details

 
केएचएल न्यूज ब्युरो

hegdekiran17@gmail.com

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४वा महापरिनिर्वाण दिन येत्या रविवारी म्हणजेच दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या ‘आर मध्य’ विभागाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे मोठ्या संख्येने अनुयायी डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र, ‘कोविड–१९’चा प्रादुर्भाव लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून ५ ते ७ डिसेंबर २०२० दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे. तरी, अनुयायांनी ५ ते ७ डिसेंबर २०२०दरम्यान ग्लोबल पॅगोडा येथे येऊ नये आणि कोरोना रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका उपायुक्त (परिमंडळ-७) विश्वास शंकरवार व ‘ग्लोबल पॅगोडा’चे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केले आहे.
 
डॉ. आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ‘आर-मध्य’ विभाग कार्यालयात विविध संघटनांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. शंकरवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला ‘आर मध्य’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, ‘ग्लोबल पॅगोडा’चे व्यवस्थापक एस. एस. शिंदे, संबंधित सहाय्यक पोलिस आयुक्त एस. डी. वडके, वरिष्ठ पोलिस निरिक्षक एस. एम. नारकर, पदनिर्देशित अधिकारी गोंधळी यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि ‘ग्लोबल पॅगोडा’चे संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
 
या बैठकीत ‘कोविड–१९’चा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून यावर्षी शनिवार, दिनांक ५ डिसेंबर २०२० ते सोमवार, दिनांक ७ डिसेंबर २०२० या तीन दिवशी ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. तरी, कृपया अनुयायांनी या तीन दिवसांदरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुनच अभिवादन करावे, असे आवाहन यानिमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
 
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन थेट प्रक्षेपण
 
दरम्यान, डॉ. आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे करण्यात आलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्थेची अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल आणि सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नुकतीच संयुक्त पाहणी केली. महापरिनिर्वाण दिनी म्हणजे रविवार, ६ डिसेंबर २०२० रोजी चैत्यभूमी येथे होणार्‍या शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये केले जाणार आहे. सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी यूट्यूब: bit.ly/abhivadan2020yt / फेसबूक: bit.ly/abhivadan2020fb / ट्विटर: bit.ly/abhivadan2020tt या लिंकचा उपयोग करता येईल.
 
दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. मात्र यानिमित्त, छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे दरवर्षी पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधा यंदा कोरोना पार्श्वभूमीवर दिल्या जाणार नाहीत. या नागरी सेवा-सुविधा अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत तर काही विशेष सुविधा यंदा दिल्या जाणार आहेत.
 
यंदा कोरोना विषाणू संक्रमण पाहता, मोठ्या संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे न येता आपापल्या घरी राहून तसेच स्थानिक परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन यापूर्वीदेखील करण्यात आले आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येतादेखील अनुयायांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.
 
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून महापरिनिर्वाणदिनी सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर दहा मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे.
 ”
“भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४वा महापरिनिर्वाण दिन येत्या रविवारी म्हणजेच दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या ‘आर मध्य’ विभागाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे मोठ्या संख्येने अनुयायी डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र, ‘कोविड–१९’चा प्रादुर्भाव लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून ५ ते ७ डिसेंबर २०२० दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे. तरी, अनुयायांनी ५ ते ७ डिसेंबर २०२०दरम्यान ग्लोबल पॅगोडा येथे येऊ नये आणि कोरोना रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका उपायुक्त (परिमंडळ-७) विश्वास शंकरवार व ‘ग्लोबल पॅगोडा’चे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केले आहे.”
 
“डॉ. आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ‘आर-मध्य’ विभाग कार्यालयात विविध संघटनांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. शंकरवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला ‘आर मध्य’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, ‘ग्लोबल पॅगोडा’चे व्यवस्थापक एस. एस. शिंदे, संबंधित सहाय्यक पोलिस आयुक्त एस. डी. वडके, वरिष्ठ पोलिस निरिक्षक एस. एम. नारकर, पदनिर्देशित अधिकारी गोंधळी यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि ‘ग्लोबल पॅगोडा’चे संबंधित कर्मचारी उपस्थित होते.”
 
“या बैठकीत ‘कोविड–१९’चा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून यावर्षी शनिवार, दिनांक ५ डिसेंबर २०२० ते सोमवार, दिनांक ७ डिसेंबर २०२० या तीन दिवशी ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. तरी, कृपया अनुयायांनी या तीन दिवसांदरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुनच अभिवादन करावे, असे आवाहन यानिमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.”
 
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन थेट प्रक्षेपण
 
“दरम्यान, डॉ. आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे करण्यात आलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्थेची अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल आणि सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नुकतीच संयुक्त पाहणी केली. महापरिनिर्वाण दिनी म्हणजे रविवार, ६ डिसेंबर २०२० रोजी चैत्यभूमी येथे होणार्‍या शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये केले जाणार आहे. सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी यूट्यूब: bit.ly/abhivadan2020yt / फेसबूक: bit.ly/abhivadan2020fb / ट्विटर: bit.ly/abhivadan2020tt या लिंकचा उपयोग करता येईल.”
 
“दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. मात्र यानिमित्त, छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे दरवर्षी पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधा यंदा कोरोना पार्श्वभूमीवर दिल्या जाणार नाहीत. या नागरी सेवा-सुविधा अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत तर काही विशेष सुविधा यंदा दिल्या जाणार आहेत.”
 
“यंदा कोरोना विषाणू संक्रमण पाहता, मोठ्या संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे न येता आपापल्या घरी राहून तसेच स्थानिक परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन यापूर्वीदेखील करण्यात आले आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येतादेखील अनुयायांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.”
 
“दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून महापरिनिर्वाणदिनी सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर दहा मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे.”
 

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content