HomeArchiveगोखले विधि महाविद्यालयाच्या...

गोखले विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्याला भेट

Details

 
 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
खारघर (नवी मुंबई) येथील गोखले विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रीय अभ्यासाअंतर्गत खारघरच्या पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. याप्रसंगी गोखले विधि महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रुती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापक अनुराग आहेर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
“प्रारंभी खारघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर उपनिरीक्षक हनुमंत ढेरे व महेश मनोरे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तेवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते, हे सांगितले. प्राथमिक तपास अहवाल, तक्रारी ऑनलाईन कशा कराव्यात, तक्रारीनंतर पुढील प्रक्रिया कशी असते, गणपती मंडळे, नवरात्र मंडळे यांना परवानगी किती दिवसांत दिली जाते, याबाबत व अन्य कार्यालयीन कामकाज कसे चालते, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उपनिरीक्षक हनुमंत ढेरे व महेश मनोरे यांना पोलीसठाण्याच्या कामकाजाबाबत काही प्रश्न विचारले. त्याची समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली.”

 

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content