HomeArchiveआर्थिक सुधारणेच्या चिंतेने...

आर्थिक सुधारणेच्या चिंतेने सोन्याला झळाळी!

Details
 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“कोव्हिड-१९चे वाढते रूग्ण आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरण यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले की, स्पॉट गोल्डने उच्चांकी व्यापार केला तर कच्चे तेल व बेस मेटलने नकारात्मक चित्र दर्शवले. कच्च्या तेलाच्या मागणीतील घसरणीमुळे किंमतही घसरली. तर अमेरिका-चीनमधील तणावामुळे धातूंच्या किंमतीवर परिणाम झाला.”
 
सोने: अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे स्पॉट गोल्डचे दर ०.८ टक्क्यांनी वाढले. कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत अखंड वाढ होत असल्याने आर्थिक सुधारणेची आशा मावळत असून त्यामुळेच पिवळ्या धातूची मागणी वाढली.
 
अमेरिकेतील रोजगारातील वाढ खुंटल्याने तसेच कायमस्वरूपी नोकऱ्या गमावल्यामुळे बाजारपेठेच्या भावनांवर आणखी परिणाम झाला. यामुळेही आर्थिक सुधारणा लवकर होण्याच्या आशा मावळत असल्याचे संकेत मिळाले. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेने कमकुवत कामगार बाजाराचे संकेत दिले. बेरोजगारीच्या वाढत्या आकडेवारीमुळे सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याची मागणी वाढली. सोन्याचे दर आजच्या सत्रात एमसीएक्सवर चांगले व्यवहार करतील.
 
कच्चे तेल: मागील आठवड्यात साथीचे वाढते प्रमाण आणि घटती मागणी यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडच्या दरात ६ टक्क्यांची घट झाली. अमेरिकेच्या तेलसाठ्यात वाढ आणि डॉलरचे मूल्य वधारल्यामुळे तेलाचे दर घसरले.
 
“४ सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात, अमेरिकी एनर्जी इनफॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (इआयए)च्या अहवालानुसार, तेलसाठ्यात २.० दशलक्ष बॅरलची वाढ झाली. कच्च्या तेलाच्या मागणीतील घट लक्षात घेता, क्रूडचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने ऑक्टोबर महिन्यासाठी आशियासाठी अधिकृत विक्री किंमत (ओएसपी) कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेलाच्या किंमती घटल्या. सध्याच्या तेल बाजाराच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ओपेक व सहयोगींची १७ सप्टेंबर रोजी बैठक होईल. ऑगस्टपासून तेलाची वाढलेली मागणी लक्षात घेता, ओपेकने दररोज ७.७ बॅरलपर्यंत उत्पादन कपात केली आहे.”
 
अमेरिकेतील आखाती उत्पादनावर वादळाचे संकट आल्यामुळे क्रूडचे नुकसान कमी होईल. आजच्या व्यापारी सत्रात तेलाच्या किंमती एमसीएक्सवर दुर्लक्षित राहतील.
 
बेस मेटल्स: वाढत्या कोव्हिड-१९च्या रुग्णसंख्येमुळे तसेच अमेरिका आणि चीन या दोन जागतिक महासत्ततांमधील वाढत्या तणावामुळे मागील आठवड्यात एलएमई बेस मेटलने लाल रंगात स्थान मिळवले होते.
 
या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकी निवडणुकांनंतर चीनशी असलेले सर्व संबंध संपुष्टात आणण्याच्या सूचना अमेरिकी अध्यक्षांनी दिल्या आहेत. त्यामुळे दोन देशांमधील संबंध बिघडू लागल्याने औद्योगिक धातूंचे दर घसरले.
 
“धातूचा सर्वात मोठा ग्राहक असललेल्या चीनमध्ये ऑगस्ट २०२०मधील निर्यात वाढली असून त्यामुळे धातूच्या किंमतीतील नुकसान मर्यादित राहिले. चीनचे शुद्धीकरण केलेले झिंक उत्पादन २.८ टक्क्यांनी वाढले असून ते ४५०,००० टनांवर पोहोचले. निकेल उत्पादन १५ टक्क्यांनी वाढले.”
 
एलएमई कॉपरचे दर ०.७७ टक्क्यांनी घसरले. एलएमई अधिकृत गोदामातील तांबे यादीमुळे हे नुकसान झाले. चीनमधील वाढत्या मागणीमुळे तसेच एलएमई तांब्याच्या तेलसाठ्यात घट झाल्याने तांब्याच्या दरांना आधार मिळाला. आजच्या सत्रात एमसीएक्सवर तांबे जास्त व्यापार करण्याची शक्यता आहे.

Continue reading

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...

८४ सामने-वेळापत्रक जाहीर! ‘आयपीएल’चा महासंग्राम उद्यापासून!

क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२६च्या संपूर्ण वेळापत्रकाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत देशभरात १० संघांमध्ये तब्बल ८४ सामन्यांचा महासंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर...

महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन’?

पश्चिम आशियातील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशभरात एकच खळबळ उडाली. "ऊर्जा संकट गहिरे होतेय, सरकार कठोर उपाययोजना करणार" या आशयाचे संदेश सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि त्यातूनच पुन्हा लॉकडाऊन येणार, अशी बेछूट अफवा काही...
Skip to content