HomeArchive‘आरबीआय मोरॅटोरिअम’विषयी ग्राहकांना...

‘आरबीआय मोरॅटोरिअम’विषयी ग्राहकांना मार्गदर्शन

Details

 
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
 
“आरबीआयच्या मोरॅटोरिअमवर भारतातील रिटेल ग्राहकांना प्रशिक्षण व माहिती देण्याकरिता स्पोक्टो, या आघाडीच्या डेटा अॅनालिटिक्सवर आधारीत बँकिंग आणि वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीने पुढाकार घेतला आहे. बीटूसी प्लॅटफॉर्म-क्रेडिट मॉनिटरचा लाभ घेत स्पोक्टो ग्राहकांना मोरॅटोरिअम स्वीकारण्यातील गुंतागुंत आणि त्याचा परिणाम समजून घेण्यास मदत करत आहेत. याद्वारे त्यांना माहितीवर आधारीत निर्णय घेता येईल.”
 
“तंत्रज्ञानाचा आधार घेत स्पोक्टोने एक संवाद साधणारा चॅटपॉट तयार केला असून तो ग्राहकांना बँक, त्यांची उत्पादने आणि उर्वरीत रक्कमेविषयी माहिती देतो. तसेच मोरॅटोरिअमचा फायदा घेणे किंवा तो नाकारण्याचे काय परिणाम होतील, याबद्दल सांगतो. यासाठी ग्राहकांना आपल्या आर्थिक स्थितीची फार माहिती द्यावी लागत नाही. काही ठोस माहितीआधारे मोरॅटोरिअम स्वीकारण्याचा एकूण परिणाम काय होईल, हे सांगितले जाते.”
 
“क्रेडिट मॉनिटरचा बोलका चॅटबॉक्स विविध परिस्थितींचा विचार करून डेटा अॅनालिटिक्स आणि एआयचा वापर करून परिणाम सांगतो. उदाहरणार्थ, एखाद्या वेतनदार व्यक्तीला २० लाखांपेक्षा कमी मूळ वेतन असेल आणि उदाहरणार्थ, २० लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या वेतनदार व्यक्तीचा दहा वर्षांपेक्षा कमी कार्यकाळ राहिला असेल, कोव्हिड-१९ च्या काळात त्याची वेतनकपात होणार असेल तर त्याने किंवा तिने मोरॅटोरिअमचा लाभ घ्यावा आणि नंतर अरिअर्स किंवा बोनसचा वापर करून डिफॉल्ट इंटरेस्ट भरावे, असा सल्ला दिला जातो. याच प्रकारे, क्रेडिट कार्ड/ वाहन कर्जासह ३० वर्षांखालील अविवाहित व्यक्तीस वेतन कपात होणार नसेल तर त्याने याचा लाभ न घेण्याचा सल्ला दिला जाईल. कारण त्यांच्याकडे पुरेशी बचत असेल.”
 

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content