HomeArchive'अभिनंदन'चे अभिनंदन!

‘अभिनंदन’चे अभिनंदन!

Details
‘अभिनंदन’चे अभिनंदन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुटका करण्यात येणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकच्या संसदेत केली आहे. अटक झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात अभिनंदन यांची होत असलेली मुक्तता अभिनंदनीय आहे. अभिनंदन यांचे मन:पूर्वक अभिनंदन. खरं म्हणजे भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यापासून इम्रान खान यांनी समझोत्याच्या गोष्टी सुरू केल्या होत्या. युद्ध सुरू झाल्यास त्याचे भयंकर परिणाम होतील. दोन्ही देशांच्या हाती मग पुढची परिस्थिती राहणार नाही, असेही ते म्हणाले होते. पाकिस्तानला युद्ध नको असल्याचे संकेतच त्यांनी दिले होते. आता भारतीय वैमानिकाला मुक्त करण्याची घोषणा करून पाकिस्तानने नांगी टाकली आहे. इम्रान खान यांनी ही, नाइलाजाने का होईना, घेतलेली सकारात्मक भूमिका दोन्ही देशांच्या दृष्टीने हितकारक आहे. पाकिस्तानला युद्ध परवडणारे नाही हे ओळखूनच भारतीय वैमानिकाला मुक्त करण्याचा समजूतदारपणा इम्रान खानने दाखविला आहे. पाकिस्तानने भारतापुढे अक्षरश: शरणागती पत्करली आहे. पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी भारताने युद्ध सुरू होण्याआधीच जिरवली आहे. त्याबद्दल जाँबाज भारतीय जवानांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. तथापि, आता भारतातील सत्ताधारी पक्षाने परिपक्वता दाखविण्याची खरी गरज आहे.

गेल्या दोन दिवसांत ज्या घटना घडल्या त्या शोभनीय नव्हत्या. दुर्दैवाने भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात भारताचा एक वैमानिक पाकिस्तानात कैद झाल्यानंतर त्याला सोडवून भारतात सुखरूप परत आणणे हा भारत सरकारचा अग्रक्रमाचा कार्यक्रम असायला हवा होता. पण, तसे घडले नाही. भाजपचा आणि भाजपच्या नेत्यांचा डोळा सतत येत्या मे मध्ये होत असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांवर आहे. त्यामुळे ते प्रचारात गढून गेले होते. भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाला अटक होऊन दोन दिवस झाल्यानंतरही भाजपचा भर निवडणूक प्रचारावरच होता. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संवाद होता, अशी फुशारकी वर भाजपने मारली होती. एकीकडे भारताचे जवान शहीद होत असताना, देशात युद्धाचे वारे वाहत असताना, सर्वसामान्य माणूस जीव मुठीत धरून जगत असताना भाजप मात्र या वातावरणाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करीत असल्याचे धक्कादायक चित्र गेल्या दोन दिवसात दिसले. भाजपचे नेते निर्लज्जपणे निवडणुकीतील विजयाची स्वप्ने पाहात असल्याचेही आढळून आले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी तर निर्लज्जपणाचा कळसच केला. ते म्हणाले, `मंगळवारी पाकिस्तानातील जैश-ए-महम्मदच्या दहशतवादी केंद्रांवर भारताने हवाई हल्ला चढविल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशात लाट आली आहे. येत्या निवडणुकीत भाजप कर्नाटकातील लोकसभेच्या 28 पैकी 22 जागा नक्कीच जिंकेल′. येडियुरप्पा यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली. त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

एकिकडे मोदी पक्ष कार्यकर्त्यांशी निवडणूक प्रचाराबाबत सर्वात मोठा व्हिडिओ संवाद साधत असताना, येडियुरप्पा मोदींची लाट आल्याचे स्वप्न पाहत असताना, दुसरीकडे काँग्रेसने मात्र गुरूवारी होणार असलेली आपल्या वर्कींग कमिटिची बैठक पुढे ढकलली. दिल्लीला राज्याचा दर्जा मिळावा म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आमरण उपोषण करणार होते. पण देशापुुढील संकट लक्षात घेऊन त्यांनीदेखील आपले आंदोलन पुढे ढकलले. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती विरोधी पक्षांपासून अलीकडे दुरावल्या आहेत. पण भाजपच्या प्रचारात गढलेल्या मोदींवर हल्ला चढविण्यात त्यादेखील मागे राहिल्या नाहीत. मायावती यांच्याशी हातमिळवणी करून आगामी लोकसभा निवडणुक लढवित असलेले समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांंनीदेखील मोदींवर निशाना साधला आहे. सारांश, पंतप्रधान मोदी आणि भाजप यांचा निवडणूक प्रचार म्हणजे प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. तो तिरस्कारणीय आणि निषेधार्ह आहे. आता भारतीय वैमानिकाच्या मुक्ततेनंतर मोदी आणि कंपनीला चेव आल्यास नवल नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी शहीदांच्या बलिदानाचे पावित्र्य कायम राखावे. त्याचे मार्केटिंग करू नये हीच आमची संबंधितांना कळकळीची विनंती.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content