HomeArchiveअबकी बार फिर...

अबकी बार फिर सुधीर मुनगंटीवार!

Details
अबकी बार फिर सुधीर मुनगंटीवार!

    02-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
 
हेमंत जोशी..
hemant.offtherecord@gmail.com
 
  
दीड-दोन वर्षांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांची प्रकृती कुठल्याशा कारणाने बऱ्यापैकी काळजी करण्यासारखी ठीक नव्हती. शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर काही महिने त्यांना बोलण्यावर आणि धावपळ करण्यास मनाई केलेली होती. पण, सुधीरभाऊंनी फारसे मनावर घेतले नाही. मला आठवते ८-१० दिवसांतच ते असे काही बोलायला लागले, काम करायला लागले की जणू काही गंभीर घडलेच नाही. कुठून येते ही एनर्जी? त्यावर केवळ परमेश्वराचे आशीर्वाद हे फारतर म्हणता येईल. स्वस्थ बसायचेच नाही. म्हणणारे उगाच म्हणतात, आम्ही विदर्भातले पक्के आळशी नि तंबाखू चोळत टाईमपास करणारे. मुनगंटीवार, फडणवीसांचे आराम न करणे बघून मी तर गमतीने असे म्हणेन की पश्चिम महाराष्ट्रातले शंभर पुरूष मिळून जेवढे काम होत असेल तेवढे तर एकटे सुधीरभाऊ करतात. त्यामुळे आमच्या विदर्भात शंभर घरांमागे एका जरी पुरूषाने काम केले तरी ते पुरेसे असते, एवढी प्रचंड गती सुधीरभाऊंसारखे विकासकामांना देत असतात.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजराथी आहेत. गुजराथी जसा त्यांचा व्यापार तोलूनमापून करतात तशी एखाद्याची स्तुतीदेखील त्यांच्या मनाला पटले तरच करून मोकळे होतात. मन की बातमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या वृक्ष लागवडीचे तोंड भरून कौतुक केले ते उगाच नव्हे. आकडेवारी आणि वृक्षरोपणाचे पुरावे बघून म्हणे त्यांनी जातीने कार्यक्रम आयोजकांना सांगितले की त्यांना मन की बातमध्ये त्यांच्या लाडक्या सुधीरचे तोंडभरून कौतुक करायचे आहे. जे आजपर्यंतच्या वनमंत्र्यांना सुचले नाही ते महान कार्य सुधीरभाऊंनी केले. त्यांनी भूकतहान विसरून या पाच वर्षांत त्यांच्या वन खात्यातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करवून देऊन राज्यातल्या कानाकोपऱ्यात अफाट वृक्षलागवडीचे काम केले, जे पुरावे बघून त्यांचे कार्य लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदविले गेले. असे वनमंत्री विधानसभेत जायला हवेत की वाईट प्रवृत्तीने पाठिंबा दिलेले उमेदवार राज्य, राष्ट्र पोखरण्यासाठी विधानसभेत जायला हवेत, हे तुम्हीच आता ठरवायला हवे.
 
 

 
 
  
आधी हाडाचे संघ स्वयंसेवक. नंतर ऐन तारूण्यात भाजपा कार्यकर्ता म्हणून विविध आंदोलनात स्वतःला झोकून देणारे, त्यांचे काम, कार्य, त्यांची जिद्द, तडफ बघून त्यांचा उत्साह त्यांच्यातले नेतृत्त्वगुणविशेष बघून विविध पदांवर त्यांची नेमणूक होणे म्हणजे अगदी तरूण वयापासून सुधीरभाऊ केवळ चंद्रपूरपुरते मर्यादित न राहता अख्ख्या राज्याला नवा उमदा धडाकेबाज नेता म्हणून माहित होणे, त्यांचे लहान वयात भाजपासारख्या बलाढ्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होणे, कमी वयात आधी राज्यमंत्री नंतर थेट राज्याचे अर्थमंत्री होणे, मला वाटते सामाजिक जाणिवेतून, सततच्या समाजपयोगी कार्यातून व्यासपीठावरील आपल्या विचारातून, लाभलेल्या अलौकिक बुद्धिमत्तेतून त्यांना हे यश मिळत गेले. त्यांच्यावर जरी गडकरी यांचे कार्यकर्ते असा शिक्का बसलेला असला तरी जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे उभरते नेतृत्त्व म्हणून जसे ग्रीप घेते झाले, सुधीरभाऊंनी इगो किंवा सिनियर आहे, अशा भ्रामक कल्पना बाजूला ठेवून फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फडणवीसांना प्रत्येकवेळी मानसन्मान देत त्यांना आपले नेते मानले. पाच वर्षे त्या पद्धतीनेच मुनगंटीवार वागले.
 
 
राज्याच्या मुख्यमंत्र्याला प्रत्येक खात्याचा सखोल अभ्यास करावा लागतो, माहिती पाठ असावी लागते. त्याखालोखाल अर्थमंत्र्यांनादेखील प्रत्येक खात्याची अतिशय बारीकसारीक माहिती ठेवावी लागते. अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे शासकीय पैशांचे वाटप जे फक्त आणि फक्त त्यांच्या हाती असते आणि देवेंद्र फडणवीसांनी तर मुनगंटीवार यांना पूर्णतः स्वातंत्र्य दिले होते. विश्वास ठेवून त्यांच्यावर अर्थ खात्याची जबाबदारी सोपविली होती. तुम्हाला एकदा तरी या पाच वर्षांत असे आठवते का की अर्थमंत्री म्हणून भाऊंच्या नावाने बोंबाबोंब आहे. असे कधीही घडले नाही. फडणवीसांनंतर राज्यातील प्रत्येक विभागाची सखोल माहिती घेणारे, प्रत्येक खात्याचा अभ्यास असणारे, अभ्यास करणारे, विविध खात्यांवर पकड ठेवणारे ते अर्थमंत्री आहेत. त्यातून त्यांनी नेमक्या अडचणी आणि समस्या आधी जाणून घेतल्या. शिस्तीत पैसे वाटप केले. कौतुकास पात्र ठरले.
 ”

 
 
 
 
हेमंत जोशी..
hemant.offtherecord@gmail.com
 
  
“दीड-दोन वर्षांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांची प्रकृती कुठल्याशा कारणाने बऱ्यापैकी काळजी करण्यासारखी ठीक नव्हती. शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर काही महिने त्यांना बोलण्यावर आणि धावपळ करण्यास मनाई केलेली होती. पण, सुधीरभाऊंनी फारसे मनावर घेतले नाही. मला आठवते ८-१० दिवसांतच ते असे काही बोलायला लागले, काम करायला लागले की जणू काही गंभीर घडलेच नाही. कुठून येते ही एनर्जी? त्यावर केवळ परमेश्वराचे आशीर्वाद हे फारतर म्हणता येईल. स्वस्थ बसायचेच नाही. म्हणणारे उगाच म्हणतात, आम्ही विदर्भातले पक्के आळशी नि तंबाखू चोळत टाईमपास करणारे. मुनगंटीवार, फडणवीसांचे आराम न करणे बघून मी तर गमतीने असे म्हणेन की पश्चिम महाराष्ट्रातले शंभर पुरूष मिळून जेवढे काम होत असेल तेवढे तर एकटे सुधीरभाऊ करतात. त्यामुळे आमच्या विदर्भात शंभर घरांमागे एका जरी पुरूषाने काम केले तरी ते पुरेसे असते, एवढी प्रचंड गती सुधीरभाऊंसारखे विकासकामांना देत असतात.”
 
 
“पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजराथी आहेत. गुजराथी जसा त्यांचा व्यापार तोलूनमापून करतात तशी एखाद्याची स्तुतीदेखील त्यांच्या मनाला पटले तरच करून मोकळे होतात. मन की बातमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या वृक्ष लागवडीचे तोंड भरून कौतुक केले ते उगाच नव्हे. आकडेवारी आणि वृक्षरोपणाचे पुरावे बघून म्हणे त्यांनी जातीने कार्यक्रम आयोजकांना सांगितले की त्यांना मन की बातमध्ये त्यांच्या लाडक्या सुधीरचे तोंडभरून कौतुक करायचे आहे. जे आजपर्यंतच्या वनमंत्र्यांना सुचले नाही ते महान कार्य सुधीरभाऊंनी केले. त्यांनी भूकतहान विसरून या पाच वर्षांत त्यांच्या वन खात्यातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करवून देऊन राज्यातल्या कानाकोपऱ्यात अफाट वृक्षलागवडीचे काम केले, जे पुरावे बघून त्यांचे कार्य लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदविले गेले. असे वनमंत्री विधानसभेत जायला हवेत की वाईट प्रवृत्तीने पाठिंबा दिलेले उमेदवार राज्य, राष्ट्र पोखरण्यासाठी विधानसभेत जायला हवेत, हे तुम्हीच आता ठरवायला हवे.”
 
 

 
 
  
“आधी हाडाचे संघ स्वयंसेवक. नंतर ऐन तारूण्यात भाजपा कार्यकर्ता म्हणून विविध आंदोलनात स्वतःला झोकून देणारे, त्यांचे काम, कार्य, त्यांची जिद्द, तडफ बघून त्यांचा उत्साह त्यांच्यातले नेतृत्त्वगुणविशेष बघून विविध पदांवर त्यांची नेमणूक होणे म्हणजे अगदी तरूण वयापासून सुधीरभाऊ केवळ चंद्रपूरपुरते मर्यादित न राहता अख्ख्या राज्याला नवा उमदा धडाकेबाज नेता म्हणून माहित होणे, त्यांचे लहान वयात भाजपासारख्या बलाढ्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होणे, कमी वयात आधी राज्यमंत्री नंतर थेट राज्याचे अर्थमंत्री होणे, मला वाटते सामाजिक जाणिवेतून, सततच्या समाजपयोगी कार्यातून व्यासपीठावरील आपल्या विचारातून, लाभलेल्या अलौकिक बुद्धिमत्तेतून त्यांना हे यश मिळत गेले. त्यांच्यावर जरी गडकरी यांचे कार्यकर्ते असा शिक्का बसलेला असला तरी जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे उभरते नेतृत्त्व म्हणून जसे ग्रीप घेते झाले, सुधीरभाऊंनी इगो किंवा सिनियर आहे, अशा भ्रामक कल्पना बाजूला ठेवून फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फडणवीसांना प्रत्येकवेळी मानसन्मान देत त्यांना आपले नेते मानले. पाच वर्षे त्या पद्धतीनेच मुनगंटीवार वागले.”
 
 
“राज्याच्या मुख्यमंत्र्याला प्रत्येक खात्याचा सखोल अभ्यास करावा लागतो, माहिती पाठ असावी लागते. त्याखालोखाल अर्थमंत्र्यांनादेखील प्रत्येक खात्याची अतिशय बारीकसारीक माहिती ठेवावी लागते. अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे शासकीय पैशांचे वाटप जे फक्त आणि फक्त त्यांच्या हाती असते आणि देवेंद्र फडणवीसांनी तर मुनगंटीवार यांना पूर्णतः स्वातंत्र्य दिले होते. विश्वास ठेवून त्यांच्यावर अर्थ खात्याची जबाबदारी सोपविली होती. तुम्हाला एकदा तरी या पाच वर्षांत असे आठवते का की अर्थमंत्री म्हणून भाऊंच्या नावाने बोंबाबोंब आहे. असे कधीही घडले नाही. फडणवीसांनंतर राज्यातील प्रत्येक विभागाची सखोल माहिती घेणारे, प्रत्येक खात्याचा अभ्यास असणारे, अभ्यास करणारे, विविध खात्यांवर पकड ठेवणारे ते अर्थमंत्री आहेत. त्यातून त्यांनी नेमक्या अडचणी आणि समस्या आधी जाणून घेतल्या. शिस्तीत पैसे वाटप केले. कौतुकास पात्र ठरले.”
 

सुधीर मुनगंटीवारपंतप्रधान नरेंद्र मोदीलिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सवनमंत्रीस्वयंसेवक.भाजपा कार्यकर्ताचंद्रपूरदेवेंद्र फडणवीस

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content