HomeArchiveबीएफएसआय क्षेत्राचा बदलता...

बीएफएसआय क्षेत्राचा बदलता चेहरा!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“बऱ्याच काळापासून भारत आपल्या औपचारिक अर्थव्यवस्थेचे कार्यक्षेत्र वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. सुदैवाने, तंत्रज्ञानाच्या लाटेमुळे हे काम अधिक सोपे झाले. आज भारतात इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येने ५०० दशलक्षांचा आकडा ओलांडला आहे. ही वाढ दोन अंकी दराने सुरू आहे. सिस्कोच्या अहवालानुसार, २०२३पर्यंत हा आकडा ९०७ दशलक्षांपर्यंत पोहोचेल. या परिवर्तनामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत वित्तीय सेवा पोहोचवण्याचा मार्ग मोकळा होईल. म्हणूनच सध्या बीएफएसआय क्षेत्र कसे बदलत आहे, तंत्रज्ञानाची यात काय भूमिका आहे यावर एक नजर टाकुया.”
 
“आज भारतातील सर्वांच्या घरात बँकिंग सेवांचा प्रवेश झाला आहे. या परिवर्तनात २०१४मध्ये सुरू झालेली पंतप्रधान जनधन योजना प्रमुख चालक बनली. याद्वारे आजच्या घडीला ३८.०६ कोटी बँक खाती उघडली गेली आहेत. युपीआय, रूपे डेबिट कार्डसारख्या इतर उपक्रमांमुळेही हा कल वाढला. याच धर्तीवर, भारतनेट मिशनद्वारे दुर्गम भागात इंटरनेटचा प्रवेश होत आहे. त्यामुळेच तंत्रज्ञान प्रणित बीएफएसआय सेवांचा मार्गही सुलभ होत आहे.”
 
भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढतच असल्याने किरकोळ टच पॉइंट्समुळे बँकेत होणारी गर्दी आता फार काळ दिसणार नाही. त्यांच्या स्मार्टफोन अॅप्लिकेशन या डिजिटल स्वरूपात बँका मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतील. आधीसारखेच व्यवहार फार वेळ न घेता पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना सक्षम केले जात आहे. यूपीआयच्या चमत्कारी तंत्रज्ञानामुळे (बँक आणि नॉन बँक प्रदात्यांमधील इंटर ऑपरेबिलिटीसह) व्यवहारांसाठीची किंमत आणि टर्न अराउंड वेळही कमी केला आहे. दुर्गम भागातील एईपीएस (आधार सक्षम पेमेंट प्रणाली) द्वारे भारताने बायोमॅट्रिक व्यवहारांमध्येही वाढ केली आहे. एईपीएसमध्ये दरमहा २०० दशलक्षहून अधिक व्यवहार होतात.
 
“यापूर्वी भारतीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात एफडी, आरडी आणि रिअल इस्टेट यासारख्या पारंपरिक गुंतवणुकीच्या प्रकारावर अवलंबून होते. दैनंदिन जीवनात डिजिटल तंत्रज्ञानाच्या लाटेमुळे बदल घडत असताना गुंतवणुकीचे स्वरूपही बदलले. २ टीअर आणि ३ टीअर शहरांमधील किरकोळ गुंतवणूकदारदेखील म्युच्युअल फंड आणि समभाग यासारख्या प्रगत गुंतवणूक उत्पादनांचा वापर करत आहेत. एलएसई गुंतवणुकदारांचीही गेल्या दशकात हळू हळू ११ टक्क्यांच्या सीएजीआरसह वाढ झाली. त्यांची संख्या सध्या २.७८ कोटी आहे. दुसरीकडे, सध्या बीएसईमध्ये सुमारे ४.५८ कोटी गुंतवणूदार आहेत. हा आकडा मागील वर्षात २६ टक्क्यांनी वाढला आहे. याची प्रमुख कारणे म्हणजे, ट्रेडिंग अॅप्लिकेशन्स तसेच रोबो अॅडव्हायजर्स (माहिती विश्लेषक आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससचा वापर करून वैयक्तिक गुंतवणुकीचा सल्ला देणारे इन्व्हेस्टमेंट इंजिन) यांचा वापर करून गुंतवणूक करणे सोपे झाले आहे.”
 
“स्वीकार हा डिजिटल सेवांच्या प्रवेशासाठी कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. सुदैवाने, भारतात आम्ही आघाडीवर एक सकारात्मक मार्ग पाहिला आहे. काही ठळक घटनांनीही या वळणाला आकार दिला आहे. उदा. नोंटबंदीनंतर डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास वेग मिळाला. कोव्हिड-१९ च्या काळातही असाच कल दिसून आला. कोव्हिड-१९चा उद्रेक शिगेवर असताना, एईपीएसचा उपयोग दुर्गम भागातील लोकांना त्यांच्या घरून रक्कम मिळवण्यासाठी झाला. अशा घटनांमध्ये एफआयची तंत्रज्ञानविषयक सक्षमता बाजारातील ट्रेंडला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.”
 

Continue reading

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का?’ अव्वल!

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा...

भारतातल्या लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत!

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी भक्कमपणे उभारले. पण आज विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून भारतातील राजकीय परिस्थितीकडे पाहताना  लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत असल्याचे दृष्टीस पडत आहे.  देशाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे...

विनय आपटे प्रतिष्ठानच्या स्पर्धेत ‘मुक्ता’ सर्वप्रथम!

विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पायपिट फिल्म्स्च्या मुक्ता, ह्या लघुपटला प्रथम परितोषिक मिळाले. 15 हजार रु. रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 25 वर्षांवरील खुल्या गटात दुसरा क्रमांक सिंड्रेला, ह्या लघुपटाला तर तिसरा क्रमांक ब्लॅक...
Skip to content