Homeहेल्थ इज वेल्थदुर्धर कंबरदुखी दूर...

दुर्धर कंबरदुखी दूर करण्यासाठी योगाभ्यास प्रभावी!

दुर्धर कंबरदुखी दूर करण्यासाठी योगाभ्यासाचा प्रभावी उपयोग होत असल्याचे अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. योगाभ्यासाच्या परिणामांचा अभ्यास करणारे संशोधक, ज्यांनी वेदनेचे प्रमाण, वेदना सहन करण्याची क्षमता आणि शरीराची लवचिकता, यांचेही मोजमाप केले होते. त्यांना अभ्यासाअंती असे आढळले आहे की, योगाभ्यासामुळे पाठ-कंबरदुखीचे दुर्धर दुखणे असलेल्या रूग्णांची वेदना कमी झाली. वेदना सहन करण्याची क्षमता वाढली आणि शरीराची लवचिकताही वाढली आहे.

योगाभ्यासाबाबत आतापर्यंत करण्यात आलेले अध्ययन, रुग्णांचे अनुभव आणि त्यांना होणारी वेदना तसेच आजारामुळे आलेली अक्षमता यात योगाभ्यासामुळे झालेली सुधारणा आणि त्यामुळे त्यांच्या जीवनमानात झालेले सकारात्मक बदल, यावर आधारित असते. नवी दिल्लीतील एम्स येथील शरीरशास्त्र विभागाच्या अतिरिक्त प्राध्यापिका डॉ. रेणू भाटिया यांनी आपले सहकारी डॉ. राजकुमार यादव आणि डॉ. कुमार व्ही., यांच्यासह कंबरदुखीच्या जुनाट दुखण्यावर योगाभ्यासाचा काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी संशोधन केले.

कंबरदुखीचे दुर्धर दुखणे असलेल्या 100 रुग्णांबाबत हे अध्ययन करण्यात आले. हे सर्व  रुग्ण पन्नाशीच्या वयातील होते आणि त्यांना किमान तीन वर्षांपासून हा त्रास होता. या सर्वांना चार आठवडे पद्धतशीर योगाभ्यास करायला सांगितला गेला. त्यानंतर, क्वांटिटेटीव्ह सेन्सरी टेस्टिंगच्या मदतीने तपासले असता, कोल्ड पेन सहन करण्याची क्षमता आणि कोल्ड पेन सहिष्णूता दोन्हीमध्ये वाढ झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच रूग्णांमधील कॉर्टिकोमोटर एक्झिटेबिलिटी आणि लवचिकतेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे लक्षात आले.

या संशोधकांनी वेदना, सेन्सरी परसेप्शन आणि कॉर्टिकल एक्झिटेबिलिटी निकषांसाठी वस्तुनिष्ठ मोजमाप केले. या सर्व रूग्णांमध्ये सर्वच निकषांवर महत्त्वाचे बदल झाल्याचे त्यांना आढळले. सर्व प्रकारच्या निकषांमध्ये योगाभ्यासाने लाभ झाल्याचे आढळले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय पुरस्कृत ‘योग आणि ध्यानधारणेमागील विज्ञान आणि तंत्रज्ञान’ (SATYAM) संस्थेने या अध्ययनासाठी सहकार्य केले असून ‘जर्नल ऑफ मेडिकल सायन्स एंड क्लिनिकल रिसर्च’मध्ये अलीकडेच हे अध्ययन प्रकाशित करण्यात आले आहे. वेदना आणि कॉर्टिकोमोटर एक्झिटेबिलिटी निकषांच्या मूल्यांकनामुळे, योगाभ्यासाच्या लाभांचे शास्त्रीय पुरावे उपलब्ध झाले असून, त्याचा उपयोग अशा आजारांच्या रुग्णांना उपचारात्मक पद्धतींची शिफारस करण्यासाठी होऊ शकेल. तसेच रुग्णाच्या आजाराचे निदान आणि वेळोवेळी केल्या जाणाऱ्या तपासणीच्या वेळीदेखील त्याचा उपयोग होऊ शकेल. तसेच या रूग्णांसाठीच्या आणि फायब्रोमायलाग्लीयाच्या रुग्णांसाठी योगाभ्यासाचे प्रोटोकॉलदेखील या संशोधक चमूने तयार केले आहेत.

दुर्धर कंबरदुखीचा त्रास  असलेल्या रुग्णांना चार आठवडे योगाभ्यास करुन त्यांच्या दुखण्यात तसेच दुखण्यामुळे निर्माण झालेली शारीरिक अक्षमता यात  सुधारणा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांच्या मणक्यांची लवचिकता आणि कॉर्टिकोमोटर एक्झिटेबिलिटी लक्षणीयरीत्या वाढल्याचेही आढळले आहे. या आजाराच्या रुग्णांनी घरी दीर्घकाळ योगाभ्यास करण्याची शिफारसदेखील या अध्ययनात करण्यात आली आहे. ही एक विनाखर्चिक उपचारपद्धती आहे, ज्यामुळे  वेदना कमी होतातच, पण एकूण जीवनमानात आणि आरोग्यातही सुधारणा होते.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content