Saturday, October 26, 2024
Homeकल्चर +येत्या सोमवारी मराठी...

येत्या सोमवारी मराठी ‘न्याय रक्षक’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई आणि मुलाची समाजाप्रती एक संघर्षमय कथा ‘न्याय रक्षक’ या कन्नड चित्रपटात दडून आहे. येत्या १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास, या मराठी ओटीटीवर चित्रपटाच्या मराठी रूपांतराचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना आई आणि मुलाच्या विलक्षण नात्याची अनुभूती येणार आहे.

सत्यासाठी जीव देणाऱ्या सत्यवादी आईचा सत्यवादी मुलगा समाजाचा प्रतिनिधी होऊन समाजासाठी लढतो आहे. हा लढा समाजाचं शोषण करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात आहे. प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांच्या होणाऱ्या शोषणापासून अखंड समाजाला वाचवू शकेल का चित्रपटाचा नायक? या प्रश्नाचं उत्तर या चित्रपटात मिळणार आहे.      

प्रत्येक आठवड्याला नव्या चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांचं मनभरून मनोरंजन करत आहोत. या आठवड्यात सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ मराठी भाषेत प्रेक्षकांसाठी सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. रसिकांना चित्रपट नक्कीच आवडेल अशी मनापासून आशा आहे, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सी.इ.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content