Homeन्यूज ॲट अ ग्लांसहरयाणाततल्या प्रचारात विनेश...

हरयाणाततल्या प्रचारात विनेश फोगट काँग्रेसच्या व्यासपीठावर?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरलेली कुस्तीपटू विनेश फोगटला हरयाणा विधानसभा निवडणुकीत आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविल्याचे चित्र दिसत आहे.

दोनच दिवसांपूर्वी हरयाणा विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी पॅरिस ऑलिम्पिकसाठी गेलेली विनेश फोगट परतली. १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे ५० किलो वजनी कुस्तीच्या गटाच्या फायनल लढतीतून ती बाद झाली होती. यामुळे तिला कोणतेही पदक मिळाले नाही. तरीही आमच्यासाठी तूच विनर आहे, अशी भूमिका केंद्र सरकारपासून सर्व भारतीयांनी घेतली आणि त्याच थाटात दिल्ली विमानतळावर विनेशचे स्वागत करण्यात आले.

विनेश

दिल्ली विमानतळावरून हरयाणातल्या तिच्या घरापर्यंत भव्य अशी विनेशची स्वागतयात्रा काढण्यात आली. यावेळी तिच्याबरोबर स्वागतरथावर कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया होते. भारतीय कुस्ती महासंघाचे वादग्रस्त माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दिल्लीत झालेल्या आंदोलनात हेच तीन कुस्तीपटू एकत्र होते. काल विनेशच्या स्वागतयात्रेतही हेच तीन कुस्तीपटू एकत्र दिसले. मात्र, यावेळी या तिघांसोबत काँग्रेसचे हरयाणातले खासदार दीपेंद्र हुड्डाही हजर होते. हरयाणात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांना स्वागतरथावर स्थान मिळाल्यामुळे नजीकच्या काळात निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या व्यासपीठावर विनेश फोगट दिसणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content