Monday, December 23, 2024
Homeटॉप स्टोरीविधानसभा निवडणुकीतही उद्धव...

विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे दाबणार पंजाचे बटन?

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा धर्म पाळताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्तरमध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नावासमोरील पंजाचे बटण दाबल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही ठाकरे परिवार काँग्रेसच्याच डॉ. उज्ज्वला जाधव यांच्यासमोरील पंजाचे बटन दाबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने पंजाला साथ दिली आणि प्रा वर्षा गायकवाड यांनी प्रथितयश वकील उज्ज्वल निकम यांचा प्रचंड मताधिक्याने पराभव केला. निकमांचा पराभव करुन ही यशाची उज्ज्वल परंपरा आता वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात डॉ. उज्ज्वला जाधव यांच्या नावासमोरील पंजाचे बटण दाबून उद्धव ठाकरे पुढे कायम राखणार काय, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

उद्धव ठाकरे

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. महिलांना राजकरणात महत्त्वाचे स्थान देण्याची काँग्रेसची परंपरा आहे. काँग्रेसने प्रथम मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीत प्रा. वर्षा गायकवाड यांच्यासारख्या सक्षम आणि सुशिक्षित महिलेला मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देऊन इतिहास घडविला. या आधीही या भीमकन्येला मंत्रीपद देऊन सत्तेत वाटा दिला आणि आता तर खासदार बनवून लोकसभेतही पाठविले. मुंबईत काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रा. गायकवाड यांनी खूप मेहनत घेतली. उज्ज्वल निकम यांना हरवून आपली क्षमता सिद्ध केली.

लोकसभा निवडणुकीत उत्तरमध्य मुंबईतून निवडणूक लढताना बऱ्याच नवीन कार्यकर्त्यांना आपल्याबरोबर जोडून घेण्यात त्या यशस्वी झाल्या. त्याचेच एक उदाहरण म्हणजे त्यांनी जोडलेला आंबेडकरी चवळीतील नामवंत महिला चेहरा, ज्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या आणि मुंबई विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून कार्यरत राहिलेल्या वांद्रे निवासी डॉ. उज्ज्वला जाधव. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवशीच राजीव गांधी भवन येथील कार्यालयात मोठा पुष्पहार घालून आणि केक कापून वर्षाताईंनी त्यांचा कांग्रेस मध्ये प्रवेश करवून घेतला आणि त्यांच्या हाती काँग्रेसचा झेंडा दिला.

उद्धव ठाकरे

गेल्याच महिन्यात काँग्रेसने कार्यकर्त्यांना पक्षाचे छापील फॉर्म देऊन १० ऑगस्टपर्यंत विधानसभा निवडणुकीकरीता उमेदवारीअर्ज मागविले होते. या प्रक्रियेत डॉ. उज्ज्वला जाधव यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागितली आहे. वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झीशान सिद्धिकी यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्धिकी जाहीररीत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारसोबत गेले. तेव्हापासून झीशान सिद्धिकीही काँग्रेसच्या नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणे शक्य नाही, अशी चर्चा आहे. कलिना कॅम्पस, मुंबई विद्यापिठाच्या माध्यमातून सर्वांना परिचित असणाऱ्या डॉ. उज्ज्वला जाधव या एलीट वर्गात मोडणाऱ्या तसेच राजकारणाची आणि समाजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या सुशिक्षित, सर्व बाजूने सक्षम महिला कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून डॉ. जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात वांद्रे पूर्वची जागा काँग्रेसलाच सुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतही वांद्रे पूर्वचे निवासी उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार पुन्हा एकदा पंजाला साथ देईल, असे बोलले जाते.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content