Homeहेल्थ इज वेल्थमुंबई गोवर उद्रेक...

मुंबई गोवर उद्रेक नियंत्रण मॉडेल संपूर्ण भारतामध्ये राबवणार?

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने नियमित लसीकरण बळकटीकरणासाठी तसेच गोवर रूबेला दूरीकरण करण्याचे उद्दिष्ट बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे. यादृष्टीने पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील आरोग्य अधिकारी यांच्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे दिल्ली तसेच महाराष्ट्र स्तरावरील विशेषज्ञ डॉक्टर यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेत मुंबई गोवर उद्रेक नियंत्रण मॉडेल संपूर्ण भारतामध्ये राबविण्याविषयीचे मत तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. वर्ष २०२४-२०२५मध्ये गोवर रूबेला लसीकरण ९५% पूर्ण करण्याचे उद्दिष्ट या कार्यशाळेत ठेवण्यात आले आहे. 

प्रत्येक वर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा २०२४ या वर्षाचे आरोग्य दिनाचे घोषवाक्य ‘माझं आरोग्य, माझं अधिकार’ हे आहे. ‘माझं आरोग्य, माझं अधिकार’ या घोषवाक्यानुसार  प्रौढांच्या आरोग्याप्रमाणे लहान बाळांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मुलांचे लसीकरण करणे आवश्यक आहे, असे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे.

या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी जागतिक तसेच भारतीय स्तरावरील नियमित लसीकरण आणि गोवर रूबेला उद्रेकाविषयी आकडेवारी सादर करून त्यावर चर्चा केली. तसेच २०२२-२३मध्ये मुंबई गोवर उद्रेक नियंत्रण मॉडेलचे कौतुकदेखील डॉक्टरांनी केले. कार्यशाळेमध्ये सहा विविध विषयांवर विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये  लसीकरणास नकार, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सामाजिक संवाद कौशल्य, सूक्ष्मकृती आराखडा, लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या कार्यक्षेत्रात लसीकरण वाढवण्याबाबतची कृती, जोखीमग्रस्त भागात लसीकरण वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहा गट बनवणे, या विषयांचा समावेश होता.

या कार्यशाळेमध्ये नियमित लसीकरणाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वर्ष २०२४-२०२५ वर्षांमध्ये गोवर रूबेला लसीकरण ९५% पूर्ण करण्याच्या दिशेने करावयाच्या कार्यवाहीबाबत जागतिक आरोग्य संघटना तसेच महानगरपालिकेतील अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमुळे सर्व आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन एका नवीन दिशेकडे पाऊल टाकण्यात येईल, असा विश्वास सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content