Homeन्यूज अँड व्ह्यूजकेंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या...

केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांचा समावेश?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित असतानाच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. या चर्चेत केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांचा समावेश करण्याचे निश्चित झाल्याचे कळते.

एका वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट होणे अपेक्षित आहेत. यात काही जणांना घरी बसवले जाण्याची शक्यता असून काही जणांची खाती बदलली जाणार आहेत. या प्रक्रियेत शिवसेनेच्या एका कॅबिनेट तर एका राज्यमंत्र्याला मंत्रिमंडळात घेतले जाईल, असे बोलले जाते.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाची शासकीय पूजा केली. यानंतर त्यांनी तेट दिल्ली गाठली. रात्री त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर या सर्व हालचालींना वेग आल्याचे बोलले जाते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content