Homeहेल्थ इज वेल्थअनुवांशिक केसगळतीवर 'एक्सोजेन'ची...

अनुवांशिक केसगळतीवर ‘एक्सोजेन’ची मात्रा?

होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असलेल्या डॉ. बत्राज हेल्थकेअरने एक्झोसोम आधारित फॉर्म्युलेशनच्या साथीने अनुवांशिक केसगळतीवरील उपायांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी तयार केलेल्या एक्सोजेन, ही विशिष्ट जागेवर काम करणाऱ्या हेअर ट्रीटमेंटची संकल्पना बाजारात आणली आहे.

एक्सोजेन केसांच्या पुनर्संचयनाच्या पद्धतींमधील अद्ययावत प्रगत पद्धतीचे प्रतिनिधीत्व करते, ज्यात केस नव्याने उगवण्यासाठी २ बिलियन पेशींचा एक पोटंन्ट फॉर्म्युला वापरला जातो. अवघ्या तीन महिन्यांमध्ये दिसून येईल असा बदल घडवून आणण्याची या पद्धतीची क्षमता प्रयोगसिद्ध आहे. हा फॉर्म्युला स्टेम सेल्सना नैसर्गिक पुनर्वाढीसाठी चेतना देतो. फॉलिकल्सची जोपासना करतो. टाळूच्या त्वचेचा दाह होण्याचे प्रमाण कमी करतो आणि रक्तप्रवाहामध्ये सुधारणा घडवून आणतो, जे अधिक मजबूत आणि दाट

एक्सोजेन

केसांसाठी आवश्यक असते. या प्रक्रियेमध्ये वाढीस पोषक घटकांनी समृद्ध असलेले एक्झोसोम टाळूच्या त्वचेवर सोडले जातात, जे तिथून प्रवास करतात आणि खराब झालेल्या केसांच्या पेशींना जाऊन चिकटतात. अत्यंत खोलवर पाझरतात आणि केसांना दुरुस्त व आजारमुक्त करणाऱ्या अत्यावश्यक पोषक घटकांना तेथवर पोहोचते करतात.

डॉ. बत्रा’ज हेल्थकेअरचे व्हाइस चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर आणि ट्रायकॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनचे पहिले भारतीय अध्यक्ष डॉ. अक्षय बात्रा म्हणाले की, एक्सोजेन ही जगातील सर्वात प्रगत एक्झोसोम आधारित उपचारपद्धती बाजारात दाखल करणे हा आम्हाला हर्षोल्हसित करणारा अनुभव आहे. ही टार्गेटेड थेरपी आणि त्यातील पुनर्निर्मितीसाठीचे औषध केसांच्या वाढीला चालना देतात आणि केसांच्या फॉलिकल्सना नव्याने सक्रीय करतात. एक्सोजेन ही सर्वात वेगाने काम करणारी उपचारपद्धती आहे, जी अगदी अनुवांशिक केसगळतीला सामोऱ्या जाणाऱ्यांसाठीची सर्वोत्कृष्ट परिणाम देते.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content