Homeपब्लिक फिगरअंधेरीतील कामगार हॉस्पिटल...

अंधेरीतील कामगार हॉस्पिटल ६ महिन्यांत सुरू होणार?

मुंबईतल्या अंधेरी येथील अद्ययावत कामगार हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाणार नाही. पुढील तीन महिन्यांत रूग्णालयाचा बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी) सुरू करू व सहा महिन्यांत पूर्ण हॉस्पिटल सुरू केले जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी दिली आहे.

कामगारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अंधेरीतील कामगार हॉस्पिटलप्रश्नी राजेश शर्मा यांनी आवाज उठवला होता. हे हॉस्पिटल उद्योगपतींच्या घशात घालू नका व एका महिन्यात हॉस्पिटल सुरू करा, अन्यथा तीव्र लढा दिला जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. याची केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी तत्काळ दखल घेऊन आज एका बैठकीचे आयोजन केले होते. यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निर्देशानुसार बैठक घेतली. या बैठकीत ESICचे डायरेक्टर जनरल डॉ. राजेंद्र कुमार, राज्य सरकार व केंद्र सरकारचे उच्च अधिकारी, राजेश शर्मा व काँग्रेसच्या उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस उपस्थित होते.

काही तांत्रिक अडचणीमुळे हॉस्पिटल सुरू होण्यास विलंब होत आहे. परंतु यातून लवकरच मार्ग काढून पुढील तीन महिन्यात OPD विभाग सुरू करु व सहा महिन्यांत हॉस्पिटलच्या सर्व सेवा सुरू केल्या जातील, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या या हॉस्पिटलमध्ये ५०० बेड्स व मेडिकल कॉलेज होते. या रुग्णलयात OPD, IPD (350 बेड्स), ICU आणि सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरू होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटरसह सर्व सोयीसुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते. OPD विभागात दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते. ब्लड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातील कामगार अंधेरीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत होते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या. परंतु १७ फेब्रुवारी २०१८ रोजी या रुग्णालयात आगीची दुर्घटना घडून १३ जणांचा मृत्यू झाला व १५० जण जखमी झाले. तेव्हापासून हे रुग्णालय बंद आहे. अंधेरीतील हे हॉस्पिटल लवकर सुरू करावे अशी कामगारांची मागणी आहे. सरकारने आता आश्वासन दिले असले तरी हे हॉस्पिटल सुरू होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल, असे राजेश शर्मा म्हणाले.

Continue reading

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...

बंगालमध्ये राजकीय ‘ग्रँड स्लॅम’! लिएंडर पेसला भाजपमध्ये ‘स्पेस’!!

भारताचा दिग्गज टेनिसपटू आणि 'कोलकाता बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिएंडर पेस याने मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून राजकीय खळबळ उडवली. बंगाली माध्यमांच्या मते, २०२१मध्ये गोव्यात ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश करणाऱ्या पेसने आता 'घासफूल'...

केरळमध्ये डाव्या आघाडीच्या सरकारसाठी मोदी प्रयत्नशील!

केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी कन्नूर येथील जाहीर सभेत सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळमध्ये डाव्या आघाडीचे...
Skip to content