Homeमुंबई स्पेशलमुंबईच्या कोस्टल रोडसाठी...

मुंबईच्या कोस्टल रोडसाठी आणखी 181 दिवस?

मुंबईतल्या किनारी रस्त्याचे म्हणजेच कोस्टल रोडचे काम विहित वेळेत होण्याची शक्यता मावळली असून या प्रकल्पावर काम करणाऱ्या लार्सन अँड टुब्रो कंपनीने काम पूर्ण करण्याकरीता मुंबई महापालिकेकडे आणखी 181 दिवसांची मुदत मागितल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कामास 25 मे 2023, 26नोव्हेंबर 2023 आणि 2 एप्रिल 2024 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आजतागायत 91 टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लार्सन अँड टुर्बोतर्फे 23 जुलै 2024 रोजी लेखी पत्र पाठवून 181 दिवसाची मुदतवाढ मागितली आहे. यासाठी 8 कारणे पुढे करण्यात आली आहे. मात्र, लार्सन अँड टुर्बोला मुदतवाढ देताना पालिका पर्यायाने राज्य सरकार कंपनीकडून किती विलंबशुल्क घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोस्टल रोड

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे 91 टक्के काम पूर्ण झालेले असून संपूर्ण प्रकल्प सुरू होण्यास मे 2024 ची मुदत देण्यात आली आहे. आता कंत्राटदाराने 181 दिवसाची अजून मुदत मागितली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यास मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. त्यांनी मुंबई महापालिकेकडे किनारा रस्ता प्रकल्प अंतर्गत प्रकल्प पूर्ण करण्याची मूळ तारीख आणि सद्यस्थितीची माहिती मागितली होती. पालिकेने गलगलींना कळविले की भाग 4 चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 12 ऑक्टोबर 2022 होती. या कामास 25 मे 2023, 26 नोव्हेंबर 2023 आणि 2 एप्रिल 2024 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आजतागायत 91 टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

यापूर्वी भाग 1चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 12 ऑक्टोबर 2022 होती. या कामास 9 जून 2023, 10 सप्टेंबर 2023 आणि 22 में 2025 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. भाग 2चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 15 ऑक्टोबर 2022 होती. या कामास 6 ऑक्टोबर 2023, 7 ऑक्टोबर 2023 आणि 25 ऑक्टोबर 2024 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली.

गलगली यांच्या मते 2025पर्यंत काम पूर्ण होणार नाही. निवडणूक लक्षात घेता राज्य सरकारने घाईगडबडीत कामाचे उद्घाटन करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content