Tuesday, April 15, 2025
Homeचिट चॅट.. आणि जेव्हा...

.. आणि जेव्हा टँकरच विमानात सामावतो!

कोविड-19च्या दुसऱ्या लाटेविरुद्ध उभारलेल्या लढ्यात, कोविड रुग्णालये आणि सुविधा केंद्र स्थापन उभारण्यासाठी तसेच कार्यरत असलेली रुग्णालये आणि केंद्रांना पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन कंटेनर (टँकर), सिलेंडर, अत्यावश्यक औषधे, उपकरणे आदींचा पुरवठा करण्यासाठी भारतीय हवाई दल अतिशय तत्परतेने कार्यरत झाले आहे.

देशाच्या विविध भागातून हवाई मार्गाने ही सामग्री घेऊन निर्धारित ठिकाणी पोहोचवण्यासाठी हवाई दलाची विमाने उड्डाणे करत आहेत. यासाठी हवाई दलाच्या मालवाहतूक करणाऱ्या विमानांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. सी-17, सी-130 जे, आयएल-76, एन -32 आणि ऍवरो या मालवाहतूक करणाऱ्या विमानांचा त्यात समावेश आहे.

या कामासाठी चिनूक आणि एमआय-17 ही हेलिकॉप्टर राखीव ठेवण्यात आली आहेत. यामध्ये कोची, मुंबई, वायझॅग आणि बेंगळुरू येथील डॉक्टर आणि परिचारिकांना दिल्लीतील रुग्णालयात सेवेत दाखल होण्यासाठी हवाई मार्गे दिल्लीला पोहोचविण्याच्या कामाचाही समावेश आहे.

अतिशय गरजेच्या असलेल्या ऑक्सिजनचे वितरण वेगाने व्हावे यासाठी, भारतीय हवाई दलाच्या सी-17 आणि आयएल-76 या विमानांमधून मोठे रिकामे ऑक्सिजन टँकर त्यांच्या वापराच्या ठिकाणाहून देशभरातील ऑक्सिजन भरणा केंद्रांवर नेण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त, लेह येथे अतिरिक्त कोविड चाचणी केंद्र उभारण्यासाठी सी-17 आणि आयएल-76 या विमानांनी बायोसॅफ्टी कॅबिनेट्स आणि ऑटोक्लेव्ह यंत्रांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली आहे.

अतिशय तातडीने उड्डाण करण्यासाठी भारतीय हवाई दलाची मालवाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत. 2020मध्ये कोविड-19च्या उद्रेकाच्या सुरुवातीच्या काळात, भारतीय हवाई दलाने कोरोना विषाणू साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी हवाईमार्गे आवश्यक औषधे, वैद्यकीय आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला तसेच परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले होते.

Continue reading

दादर-माटुंगा केंद्रात रंगला संगीत नाट्यमहोत्सव

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी संस्था गेली १६ वर्षे हा महोत्सव आयोजित करत आहे. संगीत अमृतवेल हे खल्वायन, रत्नागिरी निर्मित, आणि डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित, मनोहर...

राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे नेते ग. दि. कुलथे यांचे निधन

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे काल, सोमवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी मुंबईच्या नेरूळ येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून...

‘मिशन मुंबई’च्या चित्रिकरणाला सुरुवात

ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. “मिशन मुंबई” हा शोध, थरारक आणि ॲक्शन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्याच्या घडीला या चित्रपटाला एक्शनपट म्हणता येईल. कारण, यामध्ये सुमधूर संगीतासोबत एक्शनचा भडीमार...
Skip to content