Homeमाय व्हॉईससातव्या आर्थिक जनगणनेपासून...

सातव्या आर्थिक जनगणनेपासून प. बंगालचा ‘किनारा’!

सातव्या आर्थिक जनगणनेसाठी प्रत्यक्ष जमिनीवरील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. सातव्या, आर्थिक सर्वेक्षणाच्या संदर्भात, 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्राथमिक निकषांना मान्यता दिलेली नाही तर दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत मान्यतेसाठीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे, सातव्या आर्थिक जनगणनेच्या देशव्यापी निकालाला अंतिम स्वरूप देता आले नाही. सातव्या आर्थिक जनगणनेत सहभागी न झालेले पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

बंगाल

मंत्रालय आणि पश्चिम बंगाल सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये विविध स्तरांवर अनेक सल्लामसलत आणि संवाद झाले असले तरी ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

कृषी, वनीकरण, मासेमारी, खाणकाम आणि उत्खनन क्षेत्राची आकडेवारी पश्चिम बंगाल सरकारकडून प्राप्त केली जात आहे आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजासाठी उत्पादन आणि सकल मूल्यांच्या संकलनासाठी वापरली जाते.

सातव्या आर्थिक जनगणनेत सहभागी झालेल्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा तपशील खालीलप्रमाणे आहेः

  1. अंदमान आणि निकोबार बेटे
  2. आंध्र प्रदेश
  3. अरुणाचल प्रदेश
  4. आसाम
  5. बिहार
  6. चंदीगड
  7. छत्तीसगड
  8. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
  9. दिल्ली
  10. गोवा
  11. गुजरात
  12. हरियाणा
  13. हिमाचल प्रदेश
  14. जम्मू आणि काश्मीर
  15. झारखंड
  16. कर्नाटक
  17. केरळ
  18. लडाख
  19. लक्षद्वीप
  20. मध्य प्रदेश
  21. महाराष्ट्र
  22. मणिपूर
  23. मेघालय
  24. मिझोराम
  25. नागालँड
  26. ओडिशा
  27. पुडुचेरी
  28. पंजाब
  29. राजस्थान
  30. सिक्किम
  31. तामिळनाडू
  32. तेलंगणा
  33. त्रिपुरा
  34. उत्तर प्रदेश
  35. उत्तराखंड

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content