Thursday, December 12, 2024
Homeडेली पल्सवझीरएक्सने टॅक्सनोड्सबरोबरची भागिदारी...

वझीरएक्सने टॅक्सनोड्सबरोबरची भागिदारी वाढवली!

भारतातील अग्रगण्य क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज प्लॅटफॉर्म असलेल्या वझीरएक्सने, एक वर्षाच्या यशस्वी सहकार्यानंतर क्रिप्टो टॅक्स फायलिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टॅक्सनोड्ससह भागिदारीचे नूतनीकरण केले आहे. करदायित्व पूर्ण करण्याचे अचूक आणि त्रासमुक्त मार्ग उपलब्ध करण्यात टॅक्सनोड्स निपुण आहेत व या भागिदारीमुळे त्यांच्या वापरकर्त्यांचे करभरणा अनुभव सोपे करण्याच्या वझीरएक्सच्या वचनबद्धतेस बळकटी मिळाली आहे. गेल्या वर्षात त्यांच्या भागिदारीच्या या संपूर्ण कालवधीत अनेक लक्षणीय उद्दिष्टे साध्य झाली आहेत जी या सहकार्याच्या सखोल प्रभावाची द्योतक आहेत.

हे सहकार्य १०००पेक्षा अधिक भारतीय शहरांना समाविष्ट करण्यापर्यंत विस्तारले आहे. त्यामुळे कराशी संबंधित जबाबदार्‍या सांभाळण्यासाठी समान सुविधांची सुनिश्चिती होते. या संयुक्त सेवा उपक्रमाचा सर्वात अधिक वापर करणार्‍याची संख्या असणारी शहरे मुंबई, पाटणा, लखनौ, इंदूर, जयपूर, हैद्राबाद आणि अहमदाबाद आहेत.

वझीरएक्स

ग्राहकांसाठी निर्माण केलेल्या सुलभ इंटरफेसच्या माध्यमातून क्रिप्टो करगणना आणि प्राप्तीकर परतावा फाइल करण्याच्या कामात सरासरी ७-८ तासांची लक्षणीय बचत झाली असे याचा वापर करणारे सांगतात. वापरकर्ते त्यांचे व्यवहारतपशील विनासायास अपलोड आणि त्यांचे शेड्युल्ड व्हीडीएकराचे रिपोर्ट्स ३० मिनिटांपेक्षा कमी वेळात प्राप्त करू शकले. वझीरएक्स व टॅक्सनोड्स यांनी माहितीपर सत्रांची मालिका चालवली आणि संदर्भ मिळवणे सुलभ करण्यासाठी अनुबोधपर ब्लॉग्स प्रकाशित करणे चालू ठेवले. यामुळे सहभागींना क्रिप्टो करनिर्धारणातील बारकावे जाणून घेण्यात मदत झाली.

वझीरएक्सचे उपाध्यक्ष राजगोपाल मेनन यांनी सांगितले की, टॅक्सनोड्सबरोबरील आमची भागिदारी म्हणजे भारतीय वापरकर्त्यासाठी क्रिप्टो निर्विघ्न बनवण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे. करपरतावा फाईल करताना वझीरएक्सच्या वापरकर्त्यांना सर्वात उत्तम साधने देणे ही या मागील कल्पना आहे.

टॅक्सनोड्सचे संस्थापक अविनाश शेखर यांनी सांगितले की, लागोपाठ दुसर्‍या वर्षात वझीरएक्सबरोबर आमची यशस्वी भागिदारी विस्तारित करण्यात आम्हाला आनंद होत आहे. भारतीय क्रिप्टो वापरकर्त्यांसाठी गेल्या वर्षातील सहयोग महत्त्वाचा ठरला आणि यामुळे कर फाईल करण्याचा अनुभव खूप सोपा झाला. यावर्षी, वर्तमान करनिर्धारण वर्षासाठी त्यांच्या क्रिप्टो करांच्या संदर्भात वझीरएक्सच्या वापरकर्त्यांना आणखी समावेशक मदत देण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या हेतूने, त्या यशास आणखी उन्नत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. कार्यक्षम आणि कायद्याला अनुसरून असणारे कर फायलिंग करण्यासाठी आवश्यक साधने आणि नैपुण्य यांच्या आधारे भारतीय क्रिप्टो समुदायास सबल करण्यासाठी टॅक्सनोड्स निरंतर कटीबध्द आहे.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content