Homeडेली पल्सभारताच्या सशस्त्र सैन्यदलामध्ये...

भारताच्या सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी व्हायचंय…

भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारीपदाकरीता होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण होणार असून प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास व भोजनाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी १० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी सैनिक वेलफेअर विभाग, पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावरून एसएसबी-६४ कोर्सचे प्रवेशपत्र व परिशिष्टे डाउनलोड करून पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे.

एसएसबी प्रशिक्षण कोर्ससाठी यापैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक-

कम्बाईड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-यूपीएससी) किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (एनडीए-यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण असणे व एसएसबी मुलाखतीसाठी पात्रता मिळालेली असणे आवश्यक आहे.

एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडसह उत्तीर्ण असणे तसेच एसएसबी या पदासाठी एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरकडून शिफारस असणे आवश्यक. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबीसाठी मुलाखतीचे कॉललेटर असणे आवश्यक.

विद्यापीठ प्रवेश प्रणाली (यूईएस)साठी एसएसबी कॉललेटर असणे किंवा शिफारस यादीत नाव असणे आवश्यक.

अधिक माहितीसाठी- प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी खालील माध्यमांतून कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.

ईमेल: training.pctenashik@gmail.com दूरध्वनी: 0253-2451032, व्हॉट्सअ‍ॅप: 9156073306.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content