Saturday, October 26, 2024
Homeचिट चॅटग्लोरियस, भाटिया, राजावाडी,...

ग्लोरियस, भाटिया, राजावाडी, वेंगसरकर फाऊंडेशनची विजयी सलामी

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात जेतसन चीच्या २९ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ग्लोरियस क्रिकेट क्लबने प्रकाश पुराणिक स्मृती करंडक महिलांच्या टी-२० स्पर्धेत पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा सहा विकेटनी पराभव केला. अन्य सामन्यात भाटिया, राजावाडी आणि वेंगसरकर फाऊंडेशन या संघांनीही दमदार विजयासह स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत मजल मारली.

 माहिम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब आणि शिवाजी पार्क जिमखान्याच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या  क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक यांच्या कर्तृत्त्वाला मानाचा मुजरा करण्यासाठी दोन्ही दिग्गज संस्थांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या प्रकाश पुराणिक स्मृती करंडक महिला टी-२० स्पर्धेचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अजिंक्य नाईक, अ‍ॅपेक्स कमिटीचे दीपक पाटील, अभय हडप, नीलेश भोसले तसेच आयोजक माहिम ज्युवेनाईल आणि शिवाजी पार्क जिमखान्याचे विजय येवलेकर, सुनील पाटील, राजन गुप्ता, विकास खानोलकर, महेश शेट्ये, संजीव खानोलकर, सुनील रामचंद्रन, सुशांत मांजरेकर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या (शिवाजी पार्क) चार मैदानांवर एकाच वेळी सुरू झालेल्या क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस जेतसन चीने गाजवला. पय्याडे स्पोर्टस् क्लबने जिया मांद्रवाडकरच्या नाबाद ५४ धावांच्या फटकेबाज खेळीच्या जोरावर ५ बाद ११५ अशी मजल मारली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात जेतसन चीने रिद्धी सिंगसह चौथ्या विकेटसाठी ४१ धावांची भागी रचून संघाला विजयासमीप आणले होते. तेव्हाच रिद्धी बाद झाली, पण जेतसनने ६ चेंडूंत ७ धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूपर्यंत ताणलेल्या सामन्यात संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जेतसनच ग्लोरियसच्या विजयाची शिल्पकार ठरली.

उद्घाटनीय सामना राजावाडी स्पोर्टस् क्लबने राणीसारखा जिंकला. क्षमा पाटेकरच्या ३७ चेंडूंतील ५८ धावांच्या झंझावाती खेळीमुळे राजावाडीने ६ बाद १४६ अशी जबरदस्त मजल मारली होती तर मानसी बोडके आणि वृषाली भगतने प्रत्येकी २ विकेट घेत दहिसर स्पोर्टस् क्लबचा ५६ धावांत खुर्दा पाडत ९० धावांच्या दणदणीत विजयाची नोंद केली. क्षमाच संघाच्या विजयाची खरी मानकरी ठरली.

संक्षिप्त धावफलक

पय्याडे स्पोर्ट्स क्लब: २० षटकांत ५ बाद ११५ (आयुषी सिंग २०, जिया मांद्रवाडकर ना.५४ ; इरा जाधव २३ धावांत १, अक्षरा पिल्ले ३२ धावांत १)

ग्लोरियस क्रिकेट क्लब: २० षटकात ४ बाद ११६ (इरा जाधव ३४, जेतसन ची ना.२९; विधी मथुरिया १७ धावात २, रिद्धी कोटेचा २७ धावात १),

राजावाडी क्रिकेट क्लब: २० षटकात ६ बाद १४६ (किमया राणे ३४,क्षमा पाटेकर ना.५८; धनश्री परब २९/२) दहिसर स्पोर्ट्स क्लब : १९.२ षटकांत सर्वबाद ५६ (स्नेहा रावराणे १५, तन्वी गावडे १५; मानसी बोडके १०/२, वृषाली भगत ३/२)

भाटिया स्पोर्ट्स क्लब: २० षटकात १ बाद १३७ (स्नेहल सिंग २२, राधिका ठक्कर ना.६८, सौम्या सिंग ना.३०; फातिमा फिरदोशी २५ धावांत १)

स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब: २० षटकांत ७ बाद ९५ (सिद्धी आरेकर २४, खुशी गिरी २१; सौम्या सिंग १० धावांत ३)

दिलीप वेंगसरकर फाउंडेशन: २० षटकात ३ बाद १४९ (श्वेता कलपती५३, कृतिका कुमार२३, सिमरन शेख ना.४१; उन्नती घरत २७/२) स्पोर्टिंग युनियन क्लब : २० षटकांत ९ बाद ९७ (स्वरा खेडेकर २०; लकिशा लब्धे २०/२, समृद्धी राऊळ १५/३, प्राप्ती निब्दे ९/२)

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content