बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर/दक्षिण उद्यान विभागामार्फत माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत कांदिवली (पूर्व) लोखंडवाला येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे मनोरंजन मैदान येथे काल अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.

वटपौर्णिमेचे औचित्य साधून लोखंडवाला परिसरातील स्थानिक महिला वर्गामार्फत वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून त्या झाडाचे पूजन करण्यात आली. याच कार्यक्रमात वड, निम, बकूळ प्रजातीची एकूण 50 झाडे लावण्यात आली.

आज महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आर दक्षिण विभागातील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख पार्क येथे वुई ऑल कनेक्ट, या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने ताम्हण, बहावा, सीता अशोक प्रजातीची 50 झाडे लावण्यात आली.
