होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटचे चॅन्सेलर आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रामध्ये “व्हॅक्सीन्स इन्जेक्टिंग होप” या आंतरराष्ट्रीय प्रवास प्रदर्शनाचे काल उद्घाटन केले.
लंडनच्या सायन्स म्युझियमच्या ग्लोबल एन्गेजमेंटच्या संचालक हेलेन जोन्स, लंडनच्या वेलकम ट्रस्टच्या ट्रान्झिशन अँड लेगसीच्या सहाय्यक संचालक फिलोमिना गिबन्स, नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्च आयोगाच्या इंडिया ब्रिटिश कौन्सिलच्या संचालक ऍलिसन बॅरेट एमबीई, डॉ. मुफ्फजल लकडावाला, संचालक, डिपार्टमेंट ऑफ जनरल सर्जरी अँड मिनिमल ऍक्सेस सर्जिकल सायन्सेस, सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि प्रो. एमेरिटस, बी. वाय. एल. नायर रुग्णालय आणि समरेन्द्र कुमार, कोलकात्याच्या नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियमचे उपमहासंचालक यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ झाला.
उद्घाटनाचे भाषण करताना पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी या प्रदर्शनाची प्रशंसा केली ज्यामध्ये विषाणूचा उदय होण्याच्या केवळ एका वर्षाच्या आत अतिशय प्रतिरोधक विषाणू असूनही त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याची क्षमता असलेल्या लसींच्या विविध आवृत्त्या तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी जागतिक स्तरावर नवोन्मेषी तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्यामुळे लसींच्या विकासामध्ये जी अभूतपूर्व गती प्राप्त झाली ती अधोरेखित करण्यात आली आहे.
युकेच्या सायन्स म्युझियम ग्रुपच्या सहकार्याने नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स(एनसीएसएम) च्या चमूने आयोजित केलेल्या या प्रदर्शनातून जागतिक कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी आधुनिक काळातील लसींच्या निर्मितीच्या मंत्रमुग्ध करणारी गाथा सांगितली जात आहे. याची विभागणी नव्या विषाणूचे आगमन, नव्या लसीची रचना, चाचण्या, परिणाम आणि मान्यता, मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि उत्पादनाच्या वेगात वाढ, लसींना बाजारात आणणे आणि कोविडसोबत राहणे अशा वेगवेगळ्या विभागात करण्यात आली असून या प्रदर्शनातून शास्त्रीय सिद्धांत, मानवी कथा आणि लसींच्या विकासामध्ये जागतिक स्तरावर झालेले प्रयत्न यांचा मागोवा घेण्यात आला आहे.
या अधिवेशनात एक कलाकृतीदेखील मांडण्यात आली आहे. ब्रिटिश कौन्सिलने ठेवलेली ही कलाकृती असून थ्रू द लेन्स नावाच्या या कलाकृतीमध्ये लसींच्या ऐतिहासिक आणि समकालीन पैलूंचे प्रतिबिंब पाहायला मिळते. भारतीय शिल्पकार सुशांक कुमार आणि लंडनचे नाटककार निगेल डाऊनसेंड यांच्या परस्पर सहकार्याने केलेले प्रयत्नदेखील या कार्यक्रमात अधोरेखित होतात. युकेच्या सायन्स म्युझियम ग्रुपच्या सहकार्याने नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स(एनसीएसएम)ने युकेचे वेलकम, भारतातील आयसीएमआर, एनआयव्ही, पुणे, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया, सीएसआयआर, एआयआयएमएस, एनआयबीएमजी, कल्याणी आणि इतर विविध संशोधन आणि वैज्ञानिक संघटनांच्या मदतीने हे प्रदर्शन तयार केले आहे.
यानंतर हे प्रदर्शन विश्वेश्वरय्या इंडस्ट्री अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियम, बेंगळूरु (7 सप्टेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025) आणि सायन्स सिटी कोलकाता (एप्रिल 12, 2025 ते सप्टेंबर 30, 2025) येथे भरवले जाणार आहे.