फोर्ब्सच्या अव्वल १० जणांच्या यादीत सर्वात तरूण असलेली अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपला वाढदिवस साजरा केल्यानंतर लगेचच राजस्थानातल्या श्रीनाथजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी तिने चार लाखांचा पिवळ्या रंगाचा पटियाला सूट परिधान केला होता, असे बोलले जाते.
सर्वात जास्त मेहेनताना घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उर्वशी सध्या ५५० कोटींचे साम्राज्य उभारण्यात यशस्वी झाली आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे ७० लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. सध्या तिच्याकडे अक्षय कुमारचा वेलकम ३, बॉबी देओलचा एनबीके १०९, सनी देओलचा बाप, रणदीप हुडाबरोबरचा इन्स्पेक्टर अविनाश २सारखे चित्रपट आहेत. याशिवाय लवकरच ती जेएनयू नामक एका बायोपिकमध्येही दिसणार आहे. त्यात ती राजनेत्याचाय भूमिकेत असेल. एका व्हिडिओत ती ‘जलेबी’फेम जेसन डेरुलोबरोबरही दिसणार आहे.