Homeचिट चॅटउदयोन्मुख उद्योजक वैभव...

उदयोन्मुख उद्योजक वैभव केळुसकर यांचे निधन

पालघरमधल्या बोईसर येथील एका रासायनिक कारखान्याचे संचालक, उदयोन्मुख उद्योजक वैभव विजय केळुसकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील उद्योजक विजय केळुसकर यांचे ते पुत्र होत. काही वर्षांपूर्वी त्यांनी या कारखान्याची सूत्रे आपले वैभव व विनय या दोन्ही मुलांच्या हाती सोपविली. या कारखान्याची भरभराट घडवून आणण्यासाठी दोन्ही मुलांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. वैभव केळुसकर बोरीवली-बोईसर ये-जा करून कारखाना सांभाळत होते. अचानक वैभव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

काही वर्षांपूर्वी विजय केळुसकर यांच्या विनय या वैभवपेक्षा लहान मुलाचेही अचानक देहावसान झाले. हाताशी आलेली दोन्ही मुले ईश्वराने हिरावून नेल्यामुळे बोईसर, पालघर आणि बोरीवली पूर्व येथील नागरिकांमध्ये दुःख व्यक्त होत आहे. केळुसकर यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कशेणे आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून केळुसकर परिवार जय महाराष्ट्र नगर येथे वास्तव्यास आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content