Wednesday, February 5, 2025
Homeडेली पल्सबांबू लागवडीसाठी वापरणार...

बांबू लागवडीसाठी वापरणार मानवविरहित यंत्र 

बांबू लागवडीसाठी खड्डे खोदणे व बांबू कापणे या कामांसाठी मानवविरहित यंत्राचा वापर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे महाराष्ट्राचे कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.

कृषी मंत्र्यांच्या मुंबईत मंत्रालयातील दालनात पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सची बैठक झाली. डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ इनव्हा ॲग्रो मेक प्रा.लि.चे वेंकट राव, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे सरदार बलमल सिंह यावेळी उपस्थित होते.

राज्यातील पडीक जमिनीवर २१ लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी भारतातील पहिली इलेक्ट्रिक टूल बार यंत्रणा वापरण्यात येणार आहे. एक एकर क्षेत्रात एक व्यक्ती दोन ते तीन दिवसात फक्त १२ ते १३ खड्डे काढू शकतो. मात्र या इलेक्ट्रीक टूल बार, या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे ४५० बांबू लागडवडीसाठी खड्डे खोदता येतील. या यंत्रासोबत बांबू कापण्यासाठी मनुष्यबळदेखील आवश्यक आहे. हे लक्षात घेता यामध्ये डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्रामार्फत अधिक संशोधन करून बांबू कापण्यासाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे, अशा सूचना पटेल यांनी केल्या.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content