Homeचिट चॅटबालगीतांकडे मुलांना वळविण्याचा...

बालगीतांकडे मुलांना वळविण्याचा अनोखा उपक्रम

जॉनी जॉनी यस पापा..’च्या जमान्यात मुलांनाया बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया..’ या बालगीतांकडे खेचून आणणारा उपक्रम चेंबूर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये साकारला जाणार आहे. ५ जानेवारीला सकाळी ११ वाजता. मंगेश पाडगावकर, ग. ह. पाटील, विजया वाड, निशिगंधा वाड, डॉ. विनोद इंगळहळ्ळीकर, एकनाथ आव्हाड अशा ३० प्रथितयश कवितांना गीतांचा साज दिला जाणार असून खासदार अरविंद सावंत या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.

डॉ. विजया वाड, आशाताई कुलकर्णी, विश्वनाथ खंदारे यांच्या पुढाकाराने याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. विनोद इंगळहळ्ळीकरदेखील यावेळी भेट देतील. आपल्या मराठी साहित्यकांनी लहान मुलांसाठी समृद्ध केलेली साहित्यिक परंपरा परत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अनोखा उपक्रम असून त्यातून साहित्याचा अनुभव घेण्याबरोबरच ती जोपासण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. अधिकाधिक साहित्यरसिकांनी तसेच बालकांनीही यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन डॉ. विजया वाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content