मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा २०२३ सालचा गानसरस्वती पुरस्कार ग्वाल्हेर-जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका गौरी पाठारे यांना जाहीर झाला आहे. दरवर्षी हा पुरस्कार ५० वर्षांखालील शास्त्रीय कंठ संगीताच्या प्रथितयश कलाकारास दिला जातो.
स्व. पं. जितेंद्र अभिषेकी, विदुषी पद्मा तळवलकर, पं. अरुण द्रवीड यांच्य त्या शिष्या आहेत. गानसरस्वती पद्मविभूषण स्व. किशोरी आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे ज्येष्ठ शिष्य पं. अरुण द्रवीड यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केला आहे. पुरस्काराविषयीची अधिक माहिती www.gspuraskar.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पुरस्कार वितरण दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात रविवार, दि. १० मार्च २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता शानदार सोहळ्यात करण्यात येईल. यावेळी गौरी पाठारे यांचे गायनदेखील सादर होईल. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.